अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प समर्थकांचा धुडगूस, पोलिसांच्या गोळीबारात चौघांचा मृत्यू
बलाढ्य लोकशाही असलेल्या अमेरिकेच्या संसदेवर हल्ला झाल्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. (Donald Trump Supporter Protest)
वॉशिंग्टन: अमेरिकेन संसदेच्या परिसरात अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांच्या समर्थकांनी प्रचंड धुडगूस घातला. कॅपिटल हिलवर (Capital Hill) झालेल्या या हल्ल्यात चार जणांचा मृत्यू झाला आहे. जगातील सर्वात बलाढ्य लोकशाही असलेल्या अमेरिकेच्या संसदेवर हल्ला झाल्याने संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. अमेरिकेतील जॉर्जिया राज्यातील मतमोजणीवरुन डोनाल्ड ट्रम्प यांचे समर्थक आक्रमक झाले होते. ट्रम्प समर्थकांनी मतमोजणी रोखण्याचा प्रयत्न करत कॅपिटल बिल्डींगमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांनी त्यांना थाबवण्याचा प्रयत्न केला, असता ट्रम्प समर्थक आक्रमक झाले आणि हिंसेला सुरुवात झाली. या घटनेत आतापर्यंत 4 जणांना जीव गमवावा लागला आहे. वॉशिंग्टनमधील वातावरण तणावपूर्ण असल्यामुळे 15 दिवसांसाठी आणीबाणी लावण्यात आली आहे. (Four person died during police firing at Donald Trump supporters protest)
डोनाल्ड ट्रम्प सातत्यानं निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप करत आहेत. अमेरिकेतील सत्तांतर जवळ आले असताना ट्रम्प यांचा समर्थकांद्वारे दबाव वाढवण्याचा प्रयत्न आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी समर्थकांना शांततेत आंदोलन करण्याचं आवाहन केले होते. मात्र , ट्रम्प समर्थक आक्रमक झाले आणि त्यांनी कॅपिटल बिल्डींगमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. अखेर जमावाला रोखण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. या घटनेनंतर वॉशिंग्टन डीसीच्या महापौरांनी आणीबाणी लागू करण्याचा निर्णय घेतला.
उपराष्ट्रपती माईक पेन्स यांचा ट्रम्प यांना विरोध
अमेरिकेचे उपराष्ट्रपती माईक पेन्स यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. माईक पेन्स यांच्या स्टाफला व्हाईट हाऊस मध्ये प्रवेश करण्यापासून रोखणयात आलं आहे. माईक पेन्स यांनी 2020 च्या निवडणुकीत बायडन यांचा विजय झाला आहे. हा निर्णय बदलणं योग्य नसल्याची भूमिका माईक पोन्स यांनी घेतलीय. तर, हा निर्णय ट्रम्प समर्थकांना आवडलेला नसून ते नाराज झाले आहेत. उपराष्ट्रपती माईक पेन्स जो बायडन यांच्या विजयाची अधिकृत घोषणा करणार आहेत.
कॅपिटल बिल्डींमध्ये लॉकडाऊन
ट्रम्प समर्थकांच्या हिसांचारानंतर कॅपिटल हिल्स परिसरात लॉकडाऊन लावण्यात आलं आहे. पोलीस आणि ट्रम्प समर्थक यांच्यातील झडपेनंतर नॅशनल गार्डसना कॅपिटल बिल्डींगकडे रवाना करण्यात आलं. अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना संविधानाचं रक्षण करण्याचं आवाहन केलं आहे. बायडन यांनी या घटनेचा निषेध केला असून हा राजद्रोह असल्याचं म्हटलं आहे.
बायडन यांचं ट्विट
I call on President Trump to go on national television now to fulfill his oath and defend the Constitution by demanding an end to this siege.
— Joe Biden (@JoeBiden) January 6, 2021
संबंधित बातम्या:
अमेरिकेत संसदेवर हल्लाबोल, डोनाल्ड ट्रम्प यांचे ट्विटर अकाऊण्ट लॉक, कायमस्वरुपी बंदीचा इशारा
(Four person died during police firing at Donald Trump supporters protest)