एक हिरोईन, एका राष्ट्राध्यक्षाची गर्लफ्रेंड, दुसऱ्या सत्ताधीशाची बायको, अफेअर्सची चर्चा जगभर

फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सरकोजी (France Nicolas Sarkozy) जोपर्यंत सत्ते होते, तोपर्यंत ते आपल्या राजकीय निर्णयांशिवाय हटके लाईफ-स्टाईलमुळेही चर्चेत होते.

एक हिरोईन, एका राष्ट्राध्यक्षाची गर्लफ्रेंड, दुसऱ्या सत्ताधीशाची बायको, अफेअर्सची चर्चा जगभर
Carla Bruni_Nicolas Sarkozy France
Follow us
| Updated on: Feb 02, 2021 | 3:47 PM

पॅरिस : फ्रान्सचे माजी राष्ट्राध्यक्ष निकोलस सरकोजी (France Nicolas Sarkozy) जोपर्यंत सत्ते होते, तोपर्यंत ते आपल्या राजकीय निर्णयांशिवाय हटके लाईफ-स्टाईलमुळेही चर्चेत होते. सरकोजी यांनी जॅक शिराक यांच्यानंतर अध्यक्षपदाचा भार खांद्यावर घेतला होता. राजकीय कारकिर्दीत सरकोजी लाईम-लाईटमध्ये राहिले. सरकोजी आणि माजी सुपर मॉडेल कार्ला ब्रुनी (Carla Bruni ) यांची लव्ह स्टोरी फ्रान्समध्ये आजही चर्चित आहे. (France Nicolas Sarkozy and Carla Bruni lovestory)

दोनवेळा लगीनगाठ बांधलेले सरकोजी आणि ब्रुनी यांची पहिली भेट एका डिनर पार्टीत झाली होती. पहिल्याच भेटीत ते एकमेकांच्या प्रेमात पडले. कार्ल ब्रुनी या सुपरमॉडल होत्याच, शिवाय फ्रेंच गायक आणि गीतकार म्हणूनही त्यांचं नाव गाजलं.

सरकोजी यांचा पत्नींना तलाक

निकोलस सरकोजी हे 2007 मध्ये फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांनी दोन लग्न केली होती. त्यांचं पहिलं लग्न मेरी डॉमनिक कुलियोली यांच्यासोबत 23 सप्टेंबर 1982 रोजी झालं होतं. मात्र 1996 मध्ये दोघंही वेगळे झाले. त्यानंतर सरकोजी यांची भेट मॉडेल असलेल्या सेसलिया सिग्नार यांच्याशी झाली. सेसलिया यांनी 1988 मध्ये सरकोजी यांच्याशी लग्न करण्यासाठी आपल्या पतीला सोडचिठ्ठी दिली. 1996 मध्ये सरकोजी यांनी पहिल्या पत्नीपासून दूर झाल्यानंतर सेसलिया यांच्याशी लग्न केलं. त्यानंतर वर्षभरात 23 एप्रिल 1997 रोजी सरकोजी आणि सेसलिया यांनी लुईस या मुलाला जन्म दिला.

सेसलियाचं दुसऱ्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध

सरकोजी आणि सेसलिया यांचं सर्वकाही सुखात सुरु होतं. 2002 ते 2005 या दरम्यान दोघेही अनेक कार्यक्रमांना एकत्रच हजेरी लावत. मात्र मे 2005 मध्ये सेसलिया या मोरक्को या देशाचा नागरिक रिचर्ड एटीसच्या प्रेमात पडल्या. इतकंच नाही तर त्यांनी निकोलस सरकोजी यांना सोडून दिलं, असं वृत्त स्वित्झर्लंडमधील एका वर्तमानपत्रात छापून आलं. या वृत्ताने प्रचंड संतापलेल्या सरकोजींनी वृत्तपत्रावर खटला भरला.

त्याचदरम्यान सरकोजी हे एक पत्रकार एन फुलदा यांना डेट करत होते. 15 ऑक्टोबर 2007 रोजी सरकोजी यांची राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर, त्यांनी सेसलिया यांच्यासोबत तलाक घेतला. सेसलिया लाईमलाईट आयुष्यासोबत अॅडजस्ट करु शकत नाही, तिला हे आयुष्य नको आहे, त्यामुळे आम्ही वेगळं झालो असे सरकोजी यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं.

राष्ट्राध्यक्ष महालात विवाह

नोव्हेंबर 2007 मध्ये सरकोजी आणि कार्ला ब्रुनी यांची भेट झाली होती, त्यावेळी सरकोजी यांचं वय 50 वर्ष होतं. तर कार्ला ब्रुनी या 39 वर्षांच्या होत्या. दोघांच्या वयात 11 वर्षांचं अंतर होतं. सरकोजींनी कार्ला ब्रुनी यांच्यासोबत 2 फेब्रुवारी 2008 रोजी लग्न केलं. हे लग्न राष्ट्राध्यक्षांचं निवासस्थान अॅलेसी पॅलेसमध्ये झालं होतं. हे ब्रुनी यांचं पहिलं तर सरकोजी यांचं तिसरं लग्न होतं.

ब्रुनी यांनी या लग्नानंतर फ्रान्सचं नागरिकत्व स्वीकारलं होतं. लग्नानंतर सरकोजी आणि ब्रुनी हे अधिकृतपणे ‘फर्स्ट कपल’ म्हणून देशांचे दौरेही करत होते. ऑक्टोबर 2011 मध्ये दोघांनी एका मुलीला जन्म दिला.

ट्रम्प यांच्यासोबतही ब्रुनी यांचं अफेयर?

सरकोजी यांची पत्नी कार्ला ब्रुनी यांच्या आईने एका वृत्तपत्राला मुलाखत दिली होती. कार्ला ब्रुनी आपली खरी लव्हस्टोरी निकोलस सरकोजी यांच्यासोबत जगत आहे. लग्नापूर्वी ब्रुनी आणि सरकोजी हे इजिप्तमध्ये एकत्र दिसले होते. तेव्हापासूनच त्यांच्या अफेयरची चर्चा होती. मात्र ब्रुना यांच्या अफेयर्सची चर्चा केवळ सरकोजी यांच्यापर्यंत नव्हती तर ती अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंतही होती.

(France Nicolas Sarkozy and Carla Bruni lovestory)

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.