इस्राईलकडून-गाझा सीमेवर इस्राईलचे रणगाडे गाझावर सातत्याने हल्ले चढवत आहे.
Follow us
इस्राईलकडून-गाझा सीमेवर इस्राईलचे रणगाडे गाझावर सातत्याने हल्ले चढवत आहे. (Phtoto Credit : PTI)
इस्राईलच्या एअर स्ट्राईकमध्ये उद्ध्वस्त झालेली इमारत. या हल्ल्यांमध्ये आतापर्यंत शेकडो नागरिकांनी जीव गमावलाय. यात अनेक लहान मुलांचाही समावेश आहे. (Phtoto Credit : PTI)
इस्राईलच्या हल्ल्यानंतर मंगळावारी (18 मे 2021) गाझातील रफाह या शहरात रंगाच्या कारखान्याला आग लागली. ही आग विझवण्यासाठी अग्निशामक बंबाची मदत घेताना नागरिका. (Phtoto Credit : PTI)
इस्राईलने आतापर्यंत गाझावर अनेक हल्ले केले. यात गाझातील अनेक निवासी इमारती जमिनदोस्त झाल्या. गाझातील ही अशीच एक इमारत आणि या उद्ध्वस्त इमारतीजवळून जाणारा एक पॅलेस्टेनिय नागरिक. (Phtoto Credit : PTI)
इस्राईलने आतापर्यंत गाझावर अनेक हल्ले केले. यात गाझातील अनेक निवासी इमारती जमिनदोस्त झाल्या. गाझातील ही अशीच एक इमारत आणि या उद्ध्वस्त इमारतीजवळून जाणारा एक पॅलेस्टेनिय नागरिक. (Phtoto Credit : PTI)
इस्राईलच्या हल्ल्यात उद्ध्वस्त झालेल्या गाझातील इमारतीची पाहणी करताना एक पॅलेस्टेनियन नागरिक. या हल्ल्यात ही सहा मजली इमारत उद्ध्वस्त झाली. (Phtoto Credit : PTI)
गाझातील आरोग्य मंत्रालयाच्या जवळ असलेल्या एका व्यावसायिक इमारतीवर इस्राईलने हल्ला केल्यानंतर आपला जीव वाचवण्यासाठी पळताना पत्रकार आणि इतर नागरिक. (Phtoto Credit : PTI)
रामल्लाह शहराच्या प्रवेशाच्या ठिकाणी इस्राईलचे पोलीस आणि पॅलेस्टेनियन नागरिकांमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. यात एका आंदोलकाचा मृत्यू झाला, तर जवळपास 70 जण जखमी झाले, अशी माहिती पॅलेस्टेनियन सरकारने दिलीय. तर इस्राईलने आपले दोन जवान जखमी झाल्याचं म्हटलंय. (Phtoto Credit : PTI)

नेब्लूस शहराच्या हावरा चेकपॉईंट येथे पॅलेस्टेनियन नागरिक आणि इस्राईलच्या जवानांमध्ये संघर्ष झाला. यावेळी सैनिकांनी फेकलेल्या अश्रुधुराच्या नळकांड्या पुन्हा जवानांकडेच फेकताना पॅलेस्टेनियन आंदोलक. (Phtoto Credit : PTI)
जेरुसलेममधील अनेक पॅलेस्टेनियन नागरिक इस्राईलच्या हल्ल्यांचा निषेध करत आंदोलन करत आहेत. अशाच एका आंदोलकाला ताब्यात घेताना इस्रालचे जवान. जेरुसलेममध्ये पॅलेस्टेनियन आणि इस्राईलच्या सुरक्षा दलांमध्ये अनेक ठिकाणी हिंसक संघर्ष पाहायला मिळत आहे. (Phtoto Credit : PTI)