Indian Spy | भारताच्या गुप्तहेराला जर्मनीच्या न्यायालयाची तुरुंगवासाची शिक्षा, कोण आहे हा गुप्तहेर?
या भारतीय गुप्तहेरावर आरोप आहे की तो जर्मनीतील भारतीयांची हेरगिरी करायचा.
बर्लिन : जर्मनीच्या न्यायालयाने एका भारतीय गुप्तहेराला तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे (German Court Convicts Indian Spy). फ्रँकफर्टच्या एका न्यायालयाने 54 वर्षीय भारतीय नागरिकाला हेरगिरीच्या आरोपाखाली शिक्षा सुनावली आहे आणि त्याच्यावर 2,400 यूरो म्हणजेच 2.16 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. या भारतीय गुप्तहेरावर आरोप आहे की तो जर्मनीतील भारतीयांची हेरगिरी करायचा. फ्रँकफर्ट येथील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्याशी ओळखी वाढवून त्याच्याकडून माहिती काढून घेण्याची जबाबदारी या गुप्तहेरावर होती, असा आरोप आहे (German Court Convicts Indian Spy).
हा गुप्तहेर कोण आणि त्याचा अपराध काय?
या गुप्तहेराचं नाव बलवीर एस आहे. जर्मनीच्या कायद्यानुसार, कुठल्याही आरोपी किंवा पीडिताचं नाव सार्वजनिक करण्याची परवानगी नाही. सहा वर्षांमध्ये हे चौथ्यांदा घडतंय, जिथे जर्मनी प्रशासनाने भारतीय दुतावासाशी संबंधित हेरगिरी प्रकरणात कारवाई केली.
जर्मनी प्रसारमाध्यमांच्या माहितीनुसार, बलवीर एस नावाची व्यकाती जर्मनी येथील शिख आणि काश्मिरी समाजाबाबतच्या गुप्त माहितीला चोरत होता. हायर रिजनल न्यायालयाच्या चौथ्या सिनेटने भारतीय नागरिक बलवीर एसला इंजेलिजेंस सर्व्हिससाठी काम करण्यासाठी शिक्षा सुनावण्यात आली आहे. आदेशानुसार, बलवीर यांना एका वर्षांच्या कारावासासोबत दोन वर्ष आणखी तुरुंगात काढावे लागतील, जो प्रोबेशन पिरिअड असेल. या दरम्यान, त्यांना 2,400 यूरो जमा करावे लागतील. मात्र, गुप्तहेर आणि त्यांच्या वकिलाला पुन्हा अपील करण्याचा अधिकार असेल (German Court Convicts Indian Spy).
आतापर्यंत कोणकोणती प्रकरणं झाली?
>> डिसेंबर 2019 मध्ये फ्रँकफटच्या हायर रिजनल कोर्टाने मनमोहन एस नावाच्या व्यक्तीला गुप्तहेर म्हणून काम करण्याच्या आरोपाखाली एक वर्ष 16 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. त्यांच्यावरही गुप्तहेर म्हणून काम करण्याचा आरोप होता.
>> 2015 मध्ये रंजीत एस नावाच्या व्यक्तीला याच प्रकरणी न्यायालयाने आरोपाखाली तीन वर्ष आणि पाच महिन्यांची शिक्षा सुनावली
>> 2017 मध्ये श्रीलंकेत जन्मलेल्या जर्मन इमिग्रेशन कार्यालयात काम करणाऱ्या एका कामगाराला तीन वर्ष आणि सहा महिन्यांची शिक्षा सुनावण्यात आली होती. हा कामगार भारतीय नागरिकांबाबत माहिती द्यायचा.
माझ्या वडिलांना फाशीपासून वाचव; 11 वर्षांच्या मुलाचे लुईस हॅमिल्टनला पत्र https://t.co/U4Uej8DRjs #lewishamilton #Formula1
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 15, 2020
German Court Convicts Indian Spy
संबंधित बातम्या :
ऑस्ट्रेलियासोबतच्या व्यापारी वादांमुळे चीनच्या समुद्रकिनाऱ्यावर भारतीय जहाजे अडकली
कधी अंतराळातून बर्फाने झाकलेला हिमालय पाहिलाय? नासाने काढलेला हा फोटो पाहून तुम्हीही म्हणाल WOW!