Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Treasure Discovered in Turkey : तुर्कीला सोन्याचं घबाड सापडलं, 99 हजार किलो सोन्याचा खजिना, किंमत तब्बल….

तुर्कीमध्ये सापडलेला सोन्याचा खजाना यासाठी चर्चेत आहे. कारण या सोन्याची किंमत जगातील अनेक देशांच्या GDPहून जास्त आहे.

Gold Treasure Discovered in Turkey : तुर्कीला सोन्याचं घबाड सापडलं, 99 हजार किलो सोन्याचा खजिना, किंमत तब्बल....
Follow us
| Updated on: Dec 24, 2020 | 2:13 PM

नवी दिल्ली: अनेक पुरातन वास्तू, घर, वाडा यांमध्ये सोन्याची हंडी सापडल्याच्या गोष्टी आपण ऐकतो. पण तुर्कीमध्ये सोन्याचं मोठं घबाडंच सापडल्याची बातमी आहे. तुम्ही या सोन्याचं वजन आणि त्याची किंमत ऐकून हैराण व्हाल. कारण, मिळालेल्या माहितीनुसार तुर्कीमध्ये सापडलेल्या सोन्याचं वजन तब्बल 99 टन इतकं आहे. तर या सोन्याची किंमत तब्बल 6 अब्ज डॉलर म्हणजे भारतीय चलनानुसार 44 हजार कोटी रुपये आहे. (99 tons of gold found in Turkey)

तुर्कीमध्ये सापडलेला हा सोन्याचा खजाना यासाठी चर्चेत आहे. कारण या सोन्याची किंमत जगातील अनेक देशांच्या GDPहून जास्त आहे. वर्ल्डोमीटरने दिलेल्या माहितीनुसार मालदीवचा GDP 4.87 अब्ज डॉलर, लायबेरिया – 3.29 अब्ज डॉलर, भूतान – 2.53 अब्ज डॉलर, बुरुंडी – 3.17 अब्ज डॉलर, लेसोथो – 2.58 अब्ज डॉलर हा या देशांचा GDP आहे. तर तुर्कीमध्ये सापडलेल्या सोन्याची किंमत या पेक्षा कितीतरी पटींनी जास्त आहे.

तुर्कीच्या अर्थव्यवस्था वाढण्यास मदत

सोन्याचा हा खजाना तुर्कीमधील सोगट या पश्चिम-मध्य भागात सापडला आहे. अॅग्रीकल्चरल कोऑपरेटिव्ह ऑफ तुर्की आणि गुब्रेटस फर्टिलायझर प्रॉडक्शनचे प्रमुख असलेल्या Fahrettin poyraz यांनी ही माहिती दिली आहे. सोन्याचा हा खजाना दोन वर्षात उत्खनन करुन काढला जाईल. या खजान्यामुळे तुर्कीची अर्थव्यवस्था वाढवण्यास मदत होईल, अशी माहिती त्यांनी दिली आहे. गुब्रेटस फर्टिलायझर प्रॉड्यूसर फर्म या कंपनीनं 2019 मध्ये एका दुसऱ्या कंपनीकडून ही साईट मिळवली होती. तुर्कीमध्ये सापडलेल्या सोन्याच्या खाणीची बातमी पसरल्यानंतर गुब्रेटसचे शेअर्स तब्बल 10 टक्क्यांनी वधारले आहेत.

भारतात सोने पुन्हा एकदा स्वस्त

ब्रिटनमध्ये कोरोनाचे नवे ट्रेन्स सापडल्यानं सोन्याचे (Gold Price) भाव पुन्हा एकदा वधारले होते. त्यामुळे सलग सहा दिवस सोन्याचे दर वाढत होते. पण आज सोन्याचे दर घसरलेत. जळगावमध्ये सोन्याचे दर 330 रुपयांनी घसरले असून, सोने प्रतितोळा 51,295 रुपयांवर आलेत. तर चांदीच्या दरातही 2000 रुपयांची घसरण झाली असून, चांदीची किंमत प्रतिकिलो 68,619 रुपयांवर आलीय.

दरम्यान मंगळवारचे सोन्याचे दर 51,625 रुपये प्रतितोळा होते. तर चांदीचा दरही प्रतिकिलो 70619 रुपयांवर होता. कोरोनाची लस बाजारात येत असल्याच्या बातम्यांमुळे लोकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झालीय. त्यामुळे सोन्याचे दर घसरत असल्याचं जाणकारांचं मत आहे.

आता सोन्याचा भाव प्रतितोळा 51 हजारांच्या आसपास आहे. पुढच्या दिवाळीपर्यंत हा भाव प्रतितोळा 80 हजार रुपयांपर्यंत जाण्याचीही शक्यता आहे. कोरोनाची लस अजून बाजारात दाखल झालेली नाही. जेव्हा ही लस बाजारात दाखल होईल, लस लागू होईल, यास किमान 2021 उजाडेल. त्यामुळे तोवर सोने तेजीत राहणार आहे. कोरोनाची लस बाजारात आल्यानंतर सोन्याचे दर प्रतितोळा बाजारपेठेत 45 आणि 50 हजारांपर्यंत जाणार आहेत.

संबंधित बातम्या:

Gold Silver Price : सोन्या-चांदीच्या किंमतीत पुन्हा घट, जाणून घ्या आजचे दर

Gold Price Today: कोरोनाच्या नव्या ट्रेन्सनं सोन्याला झळाळी; जाणून घ्या तोळ्याचा भाव

99 tons of gold found in Turkey

बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट
बोलायला फोन, स्वतंत्र जेवण अन्..., देशमुखांच्या आरोपींचा राजेशाही थाट.
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.