Sri lanka Crisis : गोटबाया राजपक्षे श्रीलंका सोडून पळाले; श्रीलंकेचा नवा राष्ट्रपती कोण? ‘या’ तीन नावांची चर्चा

श्रीलंकेत आर्थिक संकटासोबतच राजकीय संकट देखील निर्माण झाले आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) हे देश सोडून पळाले आहेत. त्यामुळे आता येत्या 20 तारखेला श्रीलंकेत राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे.

Sri lanka Crisis : गोटबाया राजपक्षे श्रीलंका सोडून पळाले; श्रीलंकेचा नवा राष्ट्रपती कोण? 'या' तीन नावांची चर्चा
Follow us
| Updated on: Jul 13, 2022 | 10:51 AM

कोलंबो : श्रीलंका (Sri lanka Crisis) सध्या एका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. मात्र आता श्रीलंकेत आर्थिक संकटासोबतच राजकीय संकट देखील निर्माण झाले आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे (Gotabaya Rajapaksa) हे देश सोडून पळाले आहेत. ते श्रीलंकेत निर्माण झालेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर आज राजीनामा देणार होते. मात्र त्यापूर्वीच ते देश सोडून पळाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी आणि दोन सुरक्षारक्षक देखील आहेत. गोटबाया राजपक्षे हे मालदीवला (Maldives) गेले आहेत. सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार मालदीवचे लोकसभा अध्यक्ष मोहम्मद नशीद यांनी राजपक्षे यांचे मालदीवमध्ये स्वागत केले. मात्र अद्याप राष्ट्रपतींनी देश सोडला या वृत्ताची श्रीलंकेच्या कुठल्याही अधिकृत संस्थेकडून किंवा वर्तमानपत्रातून माहिती देण्यात आलेली नाही. दरम्यान राष्ट्रपतींनी पलायन केल्यानंतर आता श्रीलंकेतील सर्व पक्ष एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याच्या विचारात आहेत. सर्व पक्षीय सरकार बनवून श्रीलंकेला या आर्थिक संकटातून बाहेर काढण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मात्र आता गोटबाया राजपक्षे यांच्यानंतर श्रीलंकेचा नवा राष्ट्रपती कोण असेल असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यासाठी सध्या तीन नावे समोर आली आहेत.

राष्ट्रपतीपदासाठी तीन नावे चर्चेत

स्थानिक वृत्तपत्र डेली मिररने दिलेल्या माहितीनुसार श्रीलंकेत राष्ट्रपतीपदासाठी तीन जणांची नावे चर्चेत आहेत. त्यामध्ये माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे, श्रीलंका पोदुजाना पेरामुना पक्षाचे खासदार डलेस अलप्परुमा आणि विरोधी पक्षनेता जाजिथ प्रेमदासा यांची नावे चर्चेत आहेत. श्रीलंकेत येत्या वीस तारखेला राष्ट्रपतीपदासाठी निवडणूक होणार आहे. यामध्ये आता कोण बाजी मारणार हे पहाणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे. ज्या उमेदवाराला पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होईल तो उमेदवार श्रीलंकेचा नवा राष्ट्रपती असणार आहे. 1 मे 1993 नंतर प्रथमच श्रीलंकेत राष्ट्रपतीपद रिक्त झाले आहे. राष्ट्रपती आर. प्रेमदासा यांची हत्या करण्यात आल्याने 1993 मध्ये राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी मध्यवधी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. तर आता राजपक्षे यांनी राजीनामा दिल्याने पुन्हा एकदा तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे.

हे सुद्धा वाचा

श्रीलंकेत कडेकोट बंदोबस्त

श्रीलंका गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अखेर शनिवारी नागरिकांच्या संयमाचा बांद फुटला आणि त्यांनी राष्ट्रपती भवनाला घेराव घातला. तसेच पंतप्रधानांचे निवासस्थान देखील जाळले. या सर्व पार्श्वभूमीवर श्रीलंकेत कडकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. श्रीलंकेला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. जागोजागी सैन्य तैनात करण्यात आले आहे. अनेकदा आंदोलक आणि सैनिकांमध्ये चकमकी उडत असल्याचे पहायला मिळत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.