इंधन संपले, GPS बिघडले, भारतीय कार चालकाचा सौदीत मृत्यू, कार वाट चुकून थेट वाळवंटात…

रुबा अल-खली वाळवंट अत्यंत प्रतिकूल हवामानासाठी कुप्रसिद्ध आहे. येथे जो जातो तो परत येत नाही असे म्हटले जाते...पाणी आणि अन्नपाण्यावाचून तडफडून मृत्यू

इंधन संपले, GPS बिघडले, भारतीय कार चालकाचा सौदीत मृत्यू, कार वाट चुकून थेट वाळवंटात...
GPS glitches and car runs out fuel indian worker died in saudi
Follow us
| Updated on: Aug 26, 2024 | 5:00 PM

जीपीएस लोकेशनमुळे अनेकदा कार चालक वाट चुकल्याच्या अनेक घटना घडलेल्या आहेत. यापूर्वी दक्षिण भारतातील केरळात जीपीएस यंत्रणेवर विसंबल्याने कार चालक थेट नदीच्या पात्रात गेल्याच्या घटना घडल्या आहेत. परंतू कारचे इंधन संपल्याने जीपीएस बंद पडले, त्यामुळे वाट चुकल्याने मृत्यू ओढल्याची घटना सौदी अरबमध्ये घडली आहे. सौदीत अरेबियातील राहणाऱ्या भारतीय तंत्रज्ञांचा कारचे इंधन संपल्याने GPS बंद पडल्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हा 27 वर्षीय भारतीय तंत्रज्ञ त्याच्या सहकाऱ्यासह एका कारमधून सौदीतील रुबा अल-खली वाळवंटात चुकल्याने दोघांचा देखील मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

मूळचे तेलंगणातील करीमनगरात राहणारे शाहबाज खान हे सौदीत टॉवर टेक्निशियन म्हणून काम करीत होते. शाहबाज आणि त्यांचे सहकारी पाच दिवसांपूर्वी रुटीन एसाईमेंटसाठी कारने प्रवास करीत होते. त्यावेळी त्यांनी GPS ने त्यांच्या कारची दिशा भरकटवल्याने ते थेट रुबा अल-खली वाळवंटात गेले. तेथे त्यांच्या कारचे इंधन देखील संपल्याने त्यांच्यावर मोठा बाका प्रसंग ओढवला. त्यानंतर सौदी प्रशासनाला दोघाचे निपचित पडलेले मृतदेहच हाती लागले.

मोबाईलचे नेटवर्क बंद पडले

कारचे इंधन संपल्याने जीपीएस यंत्रणेचा वापर करता येत नसल्याने कारची दिशा चुकली आणि शाहबाज खान आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा मृत्यू झाला. जीपीएस शिवाय त्या दोघांना दिशा शोधणे जमले नाही. आणि त्याची कार सौदीतील रुबा अल-खली वाळवंटात अडकली.वाळवंटात त्यांच्या मोबाईलचे नेटवर्क देखील बंद पडले आणि वाळवंटातील प्रचंड तापमान आणि उष्णतेमुळे डिहायड्रेशन होऊन या दोघांचा मृत्यू झाला असावा असे म्हटले जाते.

 अत्यंत प्रतिकूल  वाळवंट

रुबा अल-खली वाळवंटाला एम्प्टी क्वार्टर देखील म्हटले जाते. चार देशांमध्ये पसरलेले हे वाळवंट अत्यंत प्रतिकूल परिस्थितीसाठी कुप्रसिद्ध आहे. वाळवंटात मानवी वस्ती, उंट आणि वन्यजीव नसल्याने हरवलेल्या प्रवाशांना मदत मिळणे किंवा भूप्रदेशात शोधणे जवळजवळ अशक्य असते. पाणी किंवा अन्न नसताना आणि कडक उन्हामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे म्हटले जात आहे. शाहबाज आणि त्याच्या साथीदाराचा अशाप्रकारे मृत्यू ओढवल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.