विना तिकिट-पासपोर्ट जगभर फिरणारी 69 वर्षीय ‘भामटी आजी’, 19 वर्षांनी ‘अशा’ प्रकारे चोरी पकडली

जवळ तिकिट-पासपोर्ट काहीही नसताना एक 69 वर्षीय आजी जग फिरलीय. हे ऐकून तुम्हाला खरं वाटणार नाही, पण हे खरं आहे.

विना तिकिट-पासपोर्ट जगभर फिरणारी 69 वर्षीय ‘भामटी आजी’, 19 वर्षांनी 'अशा' प्रकारे चोरी पकडली
Follow us
| Updated on: Mar 20, 2021 | 5:44 PM

Elderly Woman Took Flights Without Ticket Passport वॉशिंग्टन : विमान प्रवास करायचा म्हटला की पासपोर्टपासून अनेक गोष्टींची जमवाजमव करावी लागते. त्यात हाच प्रवास परदेशात असेल तर मग यापेक्षा अधिक गोष्टींचा विचार करावा लागतो. त्यात तिकिटाच्या पैशांपासून तर वैध कागदपत्रं सोबत ठेवणे अशा सर्व प्रकारची तयारी आली. मात्र, यापैकी जवळ काहीही नसताना एक 69 वर्षीय आजी जग फिरलीय. हे ऐकून तुम्हाला खरं वाटणार नाही, पण हे खरं आहे. या आजींचं नाव मर्लिन हार्टमॅन (Marilyn Hartman) असं आहे. त्या तब्बल 19 वर्षांपासून पासपोर्ट, बोर्डिंग पास आणि तिकिटा शिवाय जग फिरत होत्या (Grandmother travel all over the world without ticket Passport and boarding pass).

अमेरिकेतील 9/11 च्या हल्ल्यानंतर विमानतळांवरील सुरक्षा कडेकोट केलेली असतानाही आजींचा प्रवास सुरुच

आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे अमेरिकेतील 9/11 च्या हल्ल्यानंतर विमानतळांवरील सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडेकोट करण्यात आली होती. विमान प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कसून चौकशी होत असतानाही या आजीबाईंनी आपला प्रवास बिनदिक्कतपणे केला. या आजींनी मागील 19 वर्षांमध्ये 30 वेळा अशाप्रकारचा विमान प्रवास केलाय (Marilyn Hartman Chicago). हे प्रकरण समोर आल्यानंतर विमानतळ सुरक्षा दलं अलर्ट झालीत. या आजींचं वय 70 वर्षे असलं तरी त्यांनी विमानतळ व्यवस्थेतील मोठा दोष उघड केलाय. या घटनेने विमानतळ सुरक्षा व्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उभं केलंय. इतके वर्ष या आजींनी सुरक्षा रक्षकांना चकवा कसा दिला? असाही प्रश्न विचारला जातोय.

आजींनी सुरक्षा रक्षकांना चकवा कसा दिला?

आजी म्हणाल्या, “मी प्रवास करताना इतर प्रवाशांसोबत उभी राहायचे. त्यांच्यासोबत प्राथमिक ओळख करुन बोलत असे. त्यामुळे सुरक्ष रक्षकांना मी त्यांच्यासोबत आहे असं वाटायचं. अनेकदा बोर्डिंग पास खाली पाडून त्याचाच उपयोग करायचे. विमानात जोपर्यंत जागा मिळत नसे तोपर्यंत मी विमानाच्या टॉयलेटमध्ये थांबायचे. विमानातही तपासणीला आल्यावर मी इतरांशी बोलण्यात गुंग राहायचे.”

आजीबाईंना अगदी आरामात जागा मिळायची

या आजीबाईंनी पकडण्यात आल्यावर त्या म्हणाल्या, “मी अन्य प्रवाशांसोबत पुढे यायची आणि मला आरामात जागाही मिळायची. मला कुणी ओळखलं आणि विचारलं तर मी अगदी नम्रपणे त्यांना सांगायची की मी कुणालाही त्रास देणार नाही.” पोलिसांनी त्यांना विचारलं की तुम्ही विमानतळ सुरक्षा रक्षकांना चकवा देऊन विमानात कशा बसायच्या? त्याला उत्तर देताना आजीबाईंनी हे अनेक खुलासे केलेत. या आजी अमेरिकेतील शिकागोमध्ये राहतात. त्या पेंशनर आहेत. मात्र, आता पकडल्यानंतर या आजींना त्यांच्या या कारनाम्यासाठी शिक्षाही होणार आहे (Marilyn Hartman Case). या आजीला शिकागो आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक करण्यात आली. तेव्हा आजी एका दुसऱ्या विमान प्रवासासाठी निघाली होती.

आजीबाई मानसिक रुग्ण, याआधी 18 महिन्यांचा तुरुंगवासाची शिक्षा

मर्लिन आजींना स्वतःचं घर नाही. त्या मागील बऱ्याच काळापासून मानसिक रुग्ण आहेत. अमेरिकेत मानसिक रुग्णांना तुरुंगवासाची शिक्षा दिली जात नाही. मात्र, या प्रकरणात अपवाद होण्याची शक्यता आहे. न्यायाधीशांनीच तसा संकेत दिलाय.

हेही वाचा :

Photo: भटकंती करायची आहे?, जपून! कोरोनामुळे ‘या’ देशांमध्ये प्रवासावर बंदी

Foreign Tour: ‘या’ 7 देशांमध्ये रुपयाला आहे मोठी किंमत, तुम्हीही करू शकता या देशांची सफर

Photo: आता ‘या’ देशात व्हिसाशिवाय कधीही, केव्हाही बिनधास्त प्रवास करा; वाचा सविस्तर

व्हिडीओ पाहा :

Grandmother travel all over the world without ticket Passport and boarding pass

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.