भारतीय वंशाची अंतराळवीर सुनीता विल्यम्स अंतराळात अडकली आहे. तिच्या सोबत तिचा सहकारी बुच विल्मोर हे सुद्धा गेल्या दोन महिन्यापासून अंतराळात अडकून आहेत. अंतराळाशी संबंधित विषयाचे अभ्यासक आणि अमेरिकेचे माजी सैन्य कमांडर रूडी रिडोल्फी यांनी सुनीता आणि विल्मोर यांच्याबाबतच्या तीन भयानक शक्यता वर्तवल्या आहेत. जर खराब अंतराळ यानातून या दोघांनी परत येण्याचा प्रयत्न केल्यास त्यांचा घर्षणाने उत्पन्न होणाऱ्या उष्णतेने वाफ बनून मृत्यू होऊ शकतो, असं रुडी यांनी म्हटलं आहे. रुडी यांनी अत्यंत चिंता करणारी शक्यता वर्तवल्याने संपूर्ण जगातील नागरिकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे.
डेली मेलला रुडी रिडोल्फी यांनी मुलाखत दिली आहे. यावेळी त्यांनी सुनीता आणि विल्मोर यांच्याबाबतच्या तीन शक्यता वर्तवल्या आहेत. बोइंग स्टारलाइनरला सुरक्षितपणे पृथ्वीवर आणण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या एक योग्य अँगलवर आणावे लागेल. जोपर्यंत कॅप्सुल वायूमंडळात प्रवेश करण्यासाठी योग्य अँगलमध्ये आहे, तोपर्यंत सर्व ठिक होईल. जर ते योग्य नसेल तर ते जळून जाईल. किंवा परत अंतराळात परत जातील. या परिस्थिती त्यांच्याकडे केवळ 96 तासाच्या ऑक्सिजनचा साठा असेल. त्यामुळे त्यांचं वाचणं कठिण होऊन जाईल.
स्टारलाइनर अंतराळ यानाचे अंतराळात उडणे सर्वात वाईट स्थिती असेल. कारण तेव्हा ते अंतराळात बाष्पीकृत होतील. दोन्ही परिस्थितीत त्यांच्या जीवाला धोका होईल. जर त्यांनी अत्यंत वेगाच्या अँगलने वायूमंडळात प्रवेश केला तर वायू आणि स्टारलाइनरच्या घर्षणाने अंतराळवीरांचा जळून मृत्यू होण्याचीही शक्यता असते.
जर थ्रस्टर फेल झालं तर स्पेसक्राफ्टमध्ये केवळ 96 तासाचे ऑक्सिजन आणि पॉवर राहील. स्टारलाइनरच्या सर्व्हिस मॉड्यूलच्या रीएंट्रीवेळी अत्यंत तेज अँगलवर कॅप्सुल ठेवली तर झालेल्या टक्करीमुळे हीट शील्ड फेल होऊ शकते. त्यामुळे कॅप्सुल वायू मंडळातच जळू शकते. त्यामुळे कॅप्सुलमधील अंतराळवीरांची वाचण्याची शक्यता कमी राहील.
स्टारलाइनरमध्ये त्याच्या सर्व्हिस मॉड्यूलमध्ये मोठी समस्या आहे. तेच या शीपचं कंट्रोल सेंटर आहे. सर्व्हिस मॉड्यूलमध्ये थ्रस्टर्स वॉटर, अंतराळवीरसाठी ऑक्सिजन आणि पॉवर कंट्रोल करते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व्हिस मॉड्यूल पृथ्वीवर पुन्हा एन्ट्री करण्यासाठी एका निश्चित अँगलवर आहे.
रिडॉल्फी यांच्या सांगण्यानुसार, जर रीएंट्रीच्यावेळी अँगल उथळ उसेल तर कॅप्सुल पृथ्वीच्या वायुमंडळात येण्यासाठी वेगाने उसळू शकतो. त्यामुळे तो परत माघारी जाऊ शकतो. म्हणजेच सुनीता आणि विल्मोर ऑर्बिटमध्येच कुठे तरी फसून राहतील. त्यामुळे नासाला त्यांना शोधण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो.
स्टारलाइनरचे अनेक थ्रस्टर्स आधीच फेल गेलेले आहेत. त्यामुळे परत येण्याच्यावेळी अजून अधिक थ्रस्टर्स फेल होण्याची शक्यता आहे. असं झालं तर केवळ अपुऱ्या ऑक्सिजनसाठ्यासह सुनीता आणि विल्मोर यांना अंतराळात राहावं लागेल. त्यांच्याकडे केवळ 96 तासाचं ऑक्सिजन असेल. त्यांना पृथ्वीवर या 96 तासातच यावं लागेल. नाही तर त्यांच्या जीवाला धोका होईल.