कमाल आहे, पोस्ट केल्यानंतर तीस वर्षांनी मिळाले पत्र
पोस्ट कर्मचाऱ्याने हे पत्र अन्य पत्रांसह त्यांच्या दाराच्या फटीत टाकले होते. त्यांना आधी ते ख्रिसमस कार्ड असावे असे वाटले, परंतू जेव्हा त्यांनी नीट वाचले तेव्हा तारीख पाहून त्यांना आश्चर्याचा मोठा धक्का बसला.
लंडन : इंटरनेटआधीच्या ( internet ) जगात पोस्ट (post ) सेवेच्या पत्रांव्दारेच एकमेकांपासून दूर रहाणाऱ्यांना एकमेकांची ख्यालीखुशाली कळायची. पोस्टमन काका पत्र घेऊन आले की लोक उत्सुकतेने ते पत्र वाचायचे. आता पत्र लिहीण्याची सवय देखील इतिहास जमा झाली आहे, इतके आपण मोबाईल फोन आणि ईमेलचे गुलाम झालो आहोत. तर लंडनला एका व्यक्तीने साल 1995 मध्ये लिहीलेले पत्र तब्बल तीस वर्षांनी आपल्या पत्त्यावर पोहचले आहे.
लंडनच्या नॉर्थंबरलँडचे रहिवासी असलेल्या जॉन रेनबो ( 60 ) यांच्या पत्त्यावर सन 1995 मध्ये लिहीलेले पत्र आता तीस वर्षांनी मिळाले असल्याचे बीबीसी या वृत्तसंस्थेने म्हटले आहे. जॉन रेनबो या अनपेक्षित डीलीव्हरीने अवाक झाले असून त्यांच्या आधीच्या घरमालकाच्या वेलेरी जरविस रीड यांच्या नावाने ते आले आहे.
रेनबो आता निवृत्तीचे जीवन जगत आहेत. ते सन 2015 पासून आपल्या पत्नीसह या पत्त्यावर व्यलम येथे रहात आहेत. त्यांनी म्हटले की हे पत्र लिहिणाऱ्याने त्याच्या म्हणाला की हे पत्र 1880 च्या दशकातील कौटुंबिक बाबींबद्दल लिहीले आहे, ज्यात बालपणीच्या आठवणी आहेत आणि लेखकाने त्याची मुले कशी वाढली याबद्दल लिहीले आहे.
हे पत्र त्यांना अन्य पत्रांसह आपल्या दाराच्या फटीतून पोस्ट कर्मचाऱ्याने टाकले. आपण ते नंतर पाहिल्याचे ते म्हणाले. आपणाला आधी वाटले ते ख्रिसमस कार्ड असावे, परंतू जेव्हा आपण नीट वाचले तेव्हा तारीख पाहून आश्चर्याचा धक्काच बसल्याचे त्यांनी म्हटले. वेलेरी जरविस रीड हे या पत्त्यावर 2010 पर्यंत रहात होते. त्यानंतर या घरात अनेक जण राहून गेले. पत्र पाठविणाऱ्याच्या मुलाला त्याच्या वडीलांनी हे पत्र मिसेस जरविस रीड यांच्या पत्राला उत्तर म्हणून पाठवले असावे.
यांच्या नावाने ते आले आहे. रेनबो आता निवृत्तीचे जीवन जगत आहेत. ते सन 2015 पासून आपल्या पत्नीसह या पत्त्यावर व्यलम येथे रहात आहेत. त्यांनी म्हटले की हे पत्र लिहिणाऱ्याने त्याच्या म्हणाला की हे पत्र 1880 च्या दशकातील कौटुंबिक कथांबद्दल आहे, ज्यात बालपणीच्या आठवणी आहेत आणि लेखकाने त्याची मुले कशी वाढली याबद्दल लिहीले आहे.
हे पत्र त्यांना अन्य पत्रांसह आपल्या दाराच्या फटीतून पोस्ट कर्मचाऱ्याने टाकले. आपणाला आधी वाटले ते ख्रिसमस कार्ड असावे, परंतू जेव्हा आपण नीट वाचले तेव्हा तारीख पाहून आश्चर्याचा धक्काच बसल्याचे त्यांनी म्हटले. वेलेरी जरविस रीड हे या पत्त्यावर 2010 पर्यंत रहात होते. त्यानंतर या घरात अनेक जण राहून गेले. पत्र पाठविणाऱ्याच्या मुलाला त्याच्या वडीलांनी हे पत्र मिसेस जरविस रीड यांच्या पत्राला उत्तर म्हणून पाठवले असावे. पत्र पाठविणारे आणि पत्र मिळायला हवे अशा दोन्ही व्यक्ती सध्या जगात नाहीयत..