Israel Hamas War | गाझावर केव्हाही होऊ शकतो ग्राऊंड अटॅक, इस्रायली संरक्षणमंत्र्यांनी सैनिकांना दिली फायनल कमांड
इस्रायल हमासवर मोठा हल्ला करण्याची तयारी करीत आहे. त्यासाठी इस्रायलच्या सैनिकांनी गाझापट्टीला चारबाजूंनी घेरले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि संरक्षण मंत्री सैनिकांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढवित आहेत.
नवी दिल्ली | 20 ऑक्टोबर 2023 : इस्रायल आणि हमास दरम्यानचे युद्ध सुरु आहे. इस्रायल गाझापट्टीतील हमासच्या केंद्रांवर हवाई हल्ले करीत आहे. इस्रायलच्या सैन्याने गाझापट्टी भोवती चारबाजूंनी घेराव घातला आहे. इस्रायलचे सैन्य तेल अवीवमधून केवळ एका आदेशाची वाट पहात आहे. त्यानंतर हमासवर मैदानी हल्ला करण्यात येणार आहे. दरम्यान, इस्रायलचे संरक्षणमंत्री योव गॅलेंट यांनी गाझा जवळील सैनिकांना भेटून त्यांचे मनोधैर्य वाढविले आहे. यावेळी त्यांना सज्ज रहाण्याचे आदेश देत केव्हाही हमास नियंत्रित पॅलेस्टिनी क्षेत्रात घुसण्यास सज्ज राहण्यास सांगण्यात आले आहे.
इस्रायल हमासवर मोठा हल्ला करण्याची तयारी करीत आहे. त्यासाठी इस्रायलच्या सैनिकांनी गाझापट्टीला चारबाजूंनी घेरले आहे. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आणि संरक्षण मंत्री सैनिकांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढवित आहेत. इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलेंट यांनी सैनिकांना भेटून ही लढाई कठीण आणि मोठी होणार असली तरी शेवटी विजय आपलाच होणार असल्याचे म्हटले आहे. त्यांनी सैनिकांना सांगितले की लवकरच त्यांनी गाझात घुसण्याचे आदेश मिळतील. आपण गाझाला आतापर्यंत लांबून पाहीले आता जवळून पाहण्याची संधी मिळेल असे गॅलेंट यांनी सैनिकांना म्हटले आहे.
नेतान्याहू म्हणाले तीव्र हल्ला करू
इस्लायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी सीमा क्षेत्राचा दौरा करीत मोर्चावरील तैनात सैनिकांची भेट घेतली आहे. त्यांनी सैनिकांना सांगितले की इस्रायल मोठ्या विजयाकडे कूच करीत आहे. नेतन्याहू यांनी सैनिकांना आपण संपूर्ण ताकदीने हल्ला करुन जिंकू असे म्हटले आहे. आपण शत्रूवर मोठा हल्ला करणार असल्याने विजय आपलाच आहे, संपूर्ण देश इस्रायली सैनिकांच्या पाठीशी ठाम उभा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. इस्रायली डीफेन्स फोर्सचे ( IDF ) दक्षिण कमांडचे चीफ मॅनेजर जनरल यारोन फिंकेलमॅन यांनी म्हटले आहे की जमीनी लढाई मोठी आणि प्रदीर्घ असेल. आम्हाला युद्धासाठी क्रुर शत्रूने मजबूर केले आहे. त्यांनी आमचे मोठे नुकसान केले आहे. परंतू आम्ही त्यांना रोखले आहे. आपण त्यांच्यावर जोरदार प्रहार करीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आतापर्यंत प्रचंड हानी
7 ऑक्टोबरनंतर हमासच्या हल्ल्यानंतर गाझापट्टीमध्ये युद्ध सुरु आहे. हमास रॉकेटने हल्ले करीत आहे. तर इस्रायल सैनिक हमासच्या अड्ड्यांना नष्ट करीत आहे. आतापर्यंत 4900 लोकांचा मृत्यू झाला आहे. इस्रायलचे 1400 लोक मारले गेलेत तर इस्रायच्या हल्ल्यात 3500 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. तर 13 हजार लोक जखमी झाले आहेत.