पाकिस्तानमधील वरिष्ठ सभागृहात पहिल्यादाच शिख खासदाराची एन्ट्री, कोण आहेत गुरदीप सिंह?

पाकिस्तानमधील (Pakistan) सत्ताधारी पक्ष ‘पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ’चे (PTI) नेते गुरदीप सिंह (Gurdeep Singh) यांनी शुक्रवारी (12 मार्च) खासदार म्हणून शपथ घेतली.

पाकिस्तानमधील वरिष्ठ सभागृहात पहिल्यादाच शिख खासदाराची एन्ट्री, कोण आहेत गुरदीप सिंह?
Follow us
| Updated on: Mar 13, 2021 | 5:27 PM

इस्लामाबाद : पाकिस्तानमधील (Pakistan) सत्ताधारी पक्ष ‘पाकिस्तान तहरीक-ए-इंसाफ’चे (PTI) नेते गुरदीप सिंह (Gurdeep Singh) यांनी शुक्रवारी (12 मार्च) खासदार म्हणून शपथ घेतली. यासह ते पाकिस्तानच्या संसदेच्या (Pakistan’s Parliament) वरिष्ठ सभागृहातील पहिले पगडीधारी शिख (Turban-clad Sikh) ठरले. सिंह यांनी संसदेच्या वरिष्ठ सभागृहाच्या (Upper House) निवडणुकीत खैबर पख्तूनख्वा (Khyber Pakhtunkhwa) या अल्पसंख्याकांसाठी राखीव जागेवर प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केलाय (Gurdeep Singh elected as first shikh member of Pakistan Parliament upper house).

गुरमीत सिंह यांना या निवडणुकीत 145 पैकी 103 मतं मिळाली. दुसरीकडे त्यांचे विरोधी उमेदवार जमीयत उलेमा-ए इस्लामचे (फजलुर) नेते रणजीत सिंह (Ranjeet Singh) यांना केवळ 25 मतं आणि अवामी नॅशनल पक्षाच्या आसिफ भट्टी (Asif Bhatti) यांना केवळ 12 मतं मिळाली. सिंह यांच्याशिवाय पाकिस्तानच्या संसदेत आणखी 47 खासदारांनी शुक्रवारी पदाची शपथ घेतली. सिंह पाकिस्तानमधील स्वात जिल्ह्यातील (Swat) रहिवासी आहेत. ते पाकिस्तानच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहातील पहिले पगडीधारी शिख ठरलेत.

अल्पसंख्यांक समुहाच्या भल्यासाठी काम करणार : गुरमीत सिंह

शपथ घेतल्यानंतर सिंह म्हणाले, “मला देशातील अल्पसंख्यांक समुहाच्या विकासासाठी काम करायचं आहे. संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचा प्रतिनिधी या नात्याने मला या समुहाची सेवा करण्याची संधी नक्की मिळेल.” याआधी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी अल्पसंख्यांक उमेदवारांची 5 मतं नाकारण्यात आल्याची माहिती दिली होती. खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री महमूद खान (Mehmood Khan) यांनी गुरमीत सिंह यांना 102 मतं मिळतील असा दावा केला होता. प्रत्यक्षात त्यांना एक अधिकचं मत मिळालं.

हेही वाचा :

भारत आणि पाकिस्तानमधील संसदेत काय फरक? राज्यसभा-लोकसभेऐवजी पाकमध्ये ‘या’ संस्था

1000 रुपयांना आलं आणि 30 रुपयाला अंडे, महागाईने पाकिस्तानमध्ये उपासमारीची वेळ

1 अंडे 30 रुपयाला, साखर 81 रुपये किलो, पाकिस्तानात 1 किलो मटणाचा दर किती?

व्हिडीओ पाहा :

Gurdeep Singh elected as first shikh member of Pakistan Parliament upper house

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.