Israel Hamas War : युद्ध पेटले ! हमासचा इस्रायलवर हल्ला, इस्रायलने केल्या सैनिकांच्या सुट्ट्या रद्द
हमासचा सैन्य प्रमुख इस्माईल हेनिया याची इराणची राजधानी तेहरान येथे इस्रायलच्या गुप्तहेरांनी हत्या केल्यानंतर आता इराण बदला घेणार याची भीती सतावत आहे. त्यातच हमासने तेल अवीववर क्षेपणास्रं डागल्याने इस्रायलने आपल्या सैनिकांचा सर्व रजा रद्द केल्या आहेत.
Israel Hamas War : इस्रायलचे गाझापट्टीत युद्ध सुरु असतानाच पुन्हा एकदा हमासने डोके वर काढले आहे. हमासने तेल अवीववर क्षेपणास्रे डागल्यानंतर मोठे स्फोट झाले आहेत. त्यामुळे युद्धाची ठिणगी उडाली आहे. या हल्ल्याची जबाबदारी अल-कस्साम ब्रिगेडने घेतली आहे.हमासच्या अस-कस्साम ब्रिगडने तेल अविव आणि उपनगरांवर दोन क्षेपणास्र डागली आहेत. तेल अवीव हे इस्रायलचे व्यावसायिक आणि सांस्कृतिक केंद्र असल्याने इस्रायल आता या हल्ल्याचा कसा बदला घेणार आणि त्यातच इराण देखील बदल्याने पेटल्याने या क्षेत्रात मोठ्या युद्धाचा भडका उडणार आहे.
इस्रायलचे आर्थिक केंद्र असलेल्या तेल अवीवला हमासने टार्गेट केले आहे. आम्ही तेल अवीववर दोन रॉकेट डागले आणि जोरदार स्फोटांचे आवाज ऐकल्याचे हमासने म्हटले आहे. हमासची सैनिकी शाखा अल-कस्साम ब्रिगेडने तेल अवीव आणि आजूबाजूच्या उपनगरांवर टार्गेट करीत एम 90 क्षेपणास्र डागली असल्याचे मंगळवारी जाहीर केले आहे. हमासने अनेक महिन्यानंतर केलेल्या हल्ल्यानंतर इस्रायली सैन्याने एक रॉकेट तेल अवीव जवळच्या समुद्रात पडल्याचे म्हटले आहे.
इस्रायली सैनिकांची सुट्ट्या रद्द
इस्रायलने त्यांच्या रजेवर गेलेल्या सर्व सैनिकांना तातडीने ड्यूटीवर जॉइंट होण्याचे आदेश दिले आहेत. इराण बदला घेणार असल्याची कुणकुण लागलेल्या इस्रायलने आता आपल्या सैनिकांना तातडीने अझरबैझान आणि जॉर्जिया सोडण्याचा आदेश दिला आहे. इस्रायली सैन्याने इराणला इशारा देताना आम्ही आमच्या शत्रूच्या घोषणा आणि आव्हानाला गंभीरतेने घेतो असे म्हटले आहे.
अमेरिकेने काय म्हटले ?
मध्य पूर्वेत वाढता तणाव पाहून व्हाईट हाऊसने इस्रायलला इराणचा हल्ला होऊ शकतो त्यामुळे सावध आणि सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. तसेच अमेरिकेने आपली विमानवाहू युद्ध नौका देखील भूमध्य समुद्रात बोलावली आहे.