हमासने इस्राइलमध्ये शिरण्यासाठी दुसऱ्या महायुद्धातील ट्रीक वापरली, कशी भेदली उच्च सुरक्षा यंत्रणा ?
शनिवारी हमासच्या अतिरेक्यांनी इस्राइलची कडेकोट सुरक्षा भेदण्यासाठी दुसऱ्या महायुद्धातील ट्रीकाचा वापर केला आहे. त्यामुळे कोणताही डोंगर न चढता आणि विमानांचा वापर करता अतिरेकी आरामात गाझापट्टीतून आत शिरले.
तेल अवीव | 11 ऑक्टोबर 2023 : इस्राइलवर शनिवारी अतिरेकी संघटना हमासने जो हल्ला केला त्यासाठी घुसखोरीचा वापर केला. यासाठी दुसऱ्या महायुद्धात जर्मनी आणि इतर देशांनी वापरलेली ट्रीक वापरण्यात आली. हमासची मिलिटरी विंग ‘इज्ज अल-दिन अस कसम’ ब्रिगेडने म्युझिक फेस्टीव्हलमध्ये सहभाग घेणाऱ्यांवर आणि गाझापट्टीच्या चारीबाजूंना असलेल्या इस्राइली भागावर हल्ला केला. त्यांनी अचानक केलेल्या हल्ल्याला ‘अल अक्सा फ्लड’ असे नावे दिले आहे.
इस्राइली सैन्याचे प्रवक्ते रिचर्ड हेश्ट यांनी सांगितले की पॅलेस्टीनी सैनिक पॅराशूटने समुद्री रस्त्याने आणि जमीनी मार्गाने घुसले. सोशल मिडीयात असे फोटो आणि व्हिडीओ पाहायला मिळत आहेत ज्यात अल कसम ब्रिगेडचे सैनिक पॅराशूटने आकाशातून खाली उतरल्याचे दिसत आहेत. पॅलेस्टीनी कट्टरवाद्यांनी गाझा आणि इस्राइलच्या सीमेवरील चारदीवारी आणि तारांच्या भिंतीना हवाईमार्गाने पार केल्याचे उघडकीस आले आहे. त्यांनी जी पॅराशूट वापरली त्यात एक किंवा दोन लोकांना बसण्याची व्यवस्था होती. जनरेटर आणि ब्लेडने उडणाऱ्या या पॅराशूट किंवा ग्लायडरने गाझापट्टीतून इस्राईलमध्ये ते आरामात शिरले. तीन चाके असलेल्या त्रिकोणी जागेत बसून ते फायरिंग करताना दिसत आहेत.
दुसऱ्या महायुद्धातील ट्रीक
द्वितीय महायुद्धात शत्रू मुलखात सैनिकांना उतरण्यासाठी मिलीटरी पॅराशूटचा वापर करणे एक सर्वसामान्य बाब होती. जर्मनी आणि मित्र राष्ट्रांनी एकमेकांना विरोधात कारवाई करण्यासाठी पॅराशूट टीमची तैनाती केली होती. शनिवारचा हमासचा हल्ला नोव्हेंबर 1987 मध्ये पॉप्युलर फ्रंट फॉर द लिबरेशन ऑफ पॅलेस्टाईनच्या जनरल कमांडशी संबंधित दोन पॅलेस्टाईन, एक सिरीया, एक ट्युनिशिय यांनी इस्राइलवर केलेल्या ग्लाएडर ऑपरेशनची आठवण करुन देतो.
सैन्याला कसे दिसले नाहीत ?
एका मोटार असलेल्या पॅराशूटचा वापर हमासच्या अतिरेक्यांनी केला. त्यामुळे डोंगर न चढता किंवा विमानांचा वापर न करता ते आरामात सीमा ओलांडून आले. इंजिन पॅराशूटला दर ताशी 56 किमी वेग देते. ते तीन आकाशात 5000 मीटरपर्यंत उडू शकतात. सोशल मिडीयात याचे व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यात एका पॅराशूटमध्ये एक किंवा दोन अतिरेकी उड्डाण घेताना दिसत आहेत. ते वरुन गोळीबार करतानाही दिसत आहेत. हमासने त्यास सक्र स्क्वॉड्रन असे नाव दिले आहे. परंतू साध्या डोळ्यांनी दिसणारे आणि मोबाईलमधून ज्यांचे चित्रीकरण सहज केले ते पॅराग्लायडर इस्राइलच्या सैन्याला कसे दिसले नाहीत याचा खुलासा अद्याप इस्राइलने केलेला नाही.