रोवलेट : अमेरिकेच्या (America) डलास परिसरात शुक्रवारी एका हेलिकॉप्टरचा अपघात (Helicopter Crash) झाला. या हेलिकॉप्टरमध्ये दोन जण प्रवास करत होते. हेलिकॉप्टरचा अपघात झाल्यानंतर त्याला आग (Fire) लागली. या दुर्घटनेत दोनही प्रवाशांचा जळून मृत्यू झाला आहे. रोवलेटमध्ये असलेल्या एका धावपट्टीवर हे हेलिकॉप्टर उतरण्याच्या तयारीत होते. त्याचवेळी हा अपघात झाला. या अपघाताबाबत बोलताना स्थानिक पोलिस अधिकाऱ्याने म्हटले आहे की, हे हेलिकॉप्टर रोवलेटच्या धावपट्टीवर उतरण्याच्या तयारीत होते. त्याचदरम्यान हवेतच हेलिकॉप्टरचा पंखा तुटला. हेलिकॉप्टरचा पंखा तुटल्याने हेलिकॉप्टर नियंत्रणाबाहेर गेले आणि अपघात झाला. या अपघातानंतर हेलिकॉप्टरला आग लागली. या आगीत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान विमान प्रशासन आणि राष्ट्रीय वाहतूक बोर्डाकडून संबंधित अपघाताची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, अमेरिकेच्या डलास परिसरात शुक्रवारी हा अपघात झाला. अपघात ग्रस्त हेलिकॉप्टरमध्ये दोन प्रवासी प्रवास करत होते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार या हेलिकॉप्टरचा पंखा तुटला. पंखा तुटल्याने हेलिकॉप्टर नियंत्रणाबाहेर गेले, अपघातानंतर हेलिकॉप्टरला आग लागली. वेळेत बाहेर न पडता आल्याने या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताची चौकशी विमान प्रशासन आणि राष्ट्रीय वाहतूक बोर्डाकडून सुरू आहे.
हेलिकॉप्टरराच्या या भिषण अपघाताची दृष्य कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. हे हेलिकॉप्टर अवघ्या काही वेळातच धावपट्टीवर उतरणार होते. मात्र हवेतच त्याचा पंखा तुटल्याने हेलिकॉप्टर अनियंत्रित झाले आणि खाली कोसळले. खाली कोसळताना या हेलिकॉप्टरने पेट घेतला. ही दृष्य कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
London | लंडनमध्ये भारतीय वंशाच्या तरुणीची हत्या, 22 वर्षीय बॉयफ्रेण्डला अटक