हेजबोलाचा इस्रायलवर रॉकेट हल्ला, चार विदेशी मजूरांसह पाच ठार
हेजबोला या लेबनॉनमधील इराण समर्थित अतिरेकी संघटनेने इस्रायलवर रॉकेट हल्ला केला आहे. या हल्ल्यात इस्रायलमधील चार परदेशी नागरिकांसह पाच जण ठार झाले आहेत.
इस्रायल लेबनॉन येथे असलेल्या हेजबोलाच्या ठिकाणांवर 8 ऑक्टोबर 2024 पासून भीषण हल्ले करीत आहे.याच दरम्यान हेजबोलाने देखील इस्रायलवर भीषण केले आहेत. आता हेजबोलाने केलेल्या ताज्या रॉकेट हल्ल्यात किमान पाच नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक लोक जखमी झालेले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी हेजबोलाने इस्रायलवर आपले हल्ले वाढवले आहेत अशी माहिती इस्रायली अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेजबोलाच्या हल्ल्यात ठार झालेल्या सर्व लोकांची ओळख पटली आहे. लेबनॉनहून झालेल्या हल्ल्यात चार विदेशी नागरिक ठार झाले आहेत आणि एका इस्रायली नागरिकाचा मृत्यू झाला आहे. असे असले तरी इस्रायलच्या अधिकाऱ्यांनी हेजबोलाच्या हल्ल्यात ठार झालेले विदेशी नागरिक नेमके कोणत्या देशाचे आहे हे स्पष्ट केलेले नाही.
काय आहे संपूर्ण प्रकरण
इस्रायलवर गाझापट्टीतून गेल्यावर्षी दिवाळी हल्ला झाल्यानंतर इस्रायलने हमासच्या विरोधात गाझापट्टीत कारवाई सुरु केली आहे. लेबनॉनमधील इराण समर्थित हेजबोला या अतिरेकी संघटनेने देखील इस्रायलवर हल्ले करणे सुरु केले होते. इस्रायलच्या उत्तर सीमेवरील लेबनॉन देशातील इराण समर्थित हेजबोलाही शक्तीशाली संघटना आहे. इस्रायलने हेजबोलाच्या विरोधात मोठी कारवाई केली होती. हेजबोलाच्या मुख्यालयावर हल्ला करीत इस्रायलने हेजबोला प्रमुख हसन नसरल्लाह सह अनेक कमांडोंचा खात्मा केला आहे. त्यानंतर हेजबोला देखील आक्रमक झाला असून इस्रायलवर अधूनमधून हल्ले करीत आहे.