हाय रे पाकिस्तान; केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरची अमेरिकेत घोर नाचक्की, झाले असे काही की…

State Bank of Pakistan Governor : स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर जमील अहमद हे सध्या अमेरिकेत पोहचले आहेत. वॉशिंग्टन डीसी येथील IMF आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीत ते सहभागी होण्यासाठी पोहचले आहेत. पण तिथल्या विमानतळावर त्यांच्या सोबत जे झाले त्यामुळे पाकिस्तानात वादाचा धूर निघाला आहे...

हाय रे पाकिस्तान; केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरची अमेरिकेत घोर नाचक्की, झाले असे काही की...
पाहुण्याला असा कसा पाहुणचार?
Follow us
| Updated on: Oct 29, 2024 | 10:42 AM

जागतिक मंचावर पाकिस्तानची पुन्हा नाचक्की झाली आहे. यावेळी पाकिस्तानच्या केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरची फार फसगत झाली. त्यांना जो सन्मान मिळणे अपेक्षित होते. तो तिथे मिळाला नाही. उलट भारताच्या गव्हर्नरचा अमेरिकेत बोलबाला राहिला. स्टेट बँक ऑफ पाकिस्तानचे गव्हर्नर जमील अहमद सध्या अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमध्ये IMF आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीसाठी पोहचले आहे. पण त्यांना तिथल्या विमानतळावर कोणताही राज शिष्टाचार मिळाला नाही. इतर देशांच्या केंद्रीय बँकांच्या गव्हर्नरला असा सन्मान मिळाला. पण पाकिस्तान बँकेच्या गव्हर्नरला तिथल्या सुरक्षा नियमानुसार सर्व सामान्य प्रवाशाप्रमाणे तपासण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ आणि छायाचित्र प्रसारित झाल्यानंतर पाकिस्तानमधून धूर आण हश्या सोबतच निघाला.

विमानतळावर गव्हर्नरची तपासणी

समाज माध्यमावर याविषयीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पाकिस्तानच्या युट्यूब चॅनल्स आणि वृत्तवाहिन्यांवर याविषयीचे वृत्त दाखवण्यात आले आहे. त्यानुसार गव्हर्नर जमीन अहमद यांना सुरक्षा यंत्रणांच्या तपासणीतून जावे लागले. पाकिस्तानच्या केंद्रीय बँकेचे जमील अहमद यांना राजशिष्टाचार मिळतो. त्यांचा प्रोटोकॉल असतो. पण अमेरिकेतील विमानतळावर त्यांना असा सन्मान देण्यात आला नाही. उलट त्यांचे बॅग्स आणि त्यांची तपासणी करण्यात आली. त्यांनी पण या कोणतीही कटकट न घालता या प्रक्रियेला होकार दिला.

हे सुद्धा वाचा

वास्तविक कोणत्याही देशाच्या केंद्रीय बँकेच्या गव्हर्नरसाठी दुसऱ्या देशात गेल्यावर एक प्रोटोकॉल असतो. जमील अहमद हे अमेरिकेत आयएमएफच्या बैठकीसाठी पाहुणे म्हणून गेले आहेत. तरीही तिथल्या सुरक्षा यंत्रणेने त्यांच्या पदाचा मान राखला नाही. त्यांना प्रोटोकॉल नाकारला. यामुळे पाकिस्तानमध्ये चर्चेला उधाण आले. काही पाकिस्तानींनी त्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तर काहींनी पाकिस्तानची जागतिक पातळीवर किती पत घसरली यावरून सरकारची फिरकी घेतली आहे.

शक्तिकांत दास यांच्या पदरात पुरस्कार

दुसरीकडे भारताच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना दुसऱ्यांदा सलग सेंट्रल बँक रिपोर्ट कार्ड 2024 मध्ये ए+ ग्रेड पुरस्कार मिळाला. वॉशिंग्टन येथे हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. जागतिक आव्हानं पेलताना भारतीय केंद्रीय बँकेने ताकदीनिशी भारतीय अर्थव्यवस्थेला त्यांच्या नेतृत्वात उभारी दिल्याबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. त्यामुळे जागतिक मंचावर भारताची मान उंचावली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.