HIDE AND SEEK बॉयफ्रेंडला बॅगेत लपवून विसरली, श्वास गुदमरून झाला मृत्यू
अमेरिकेच्या फ्लोरीडात एक कपल हाईड अॅण्ड सिक खेळण्यात रंगले होते. एका मोठ्या ब्रीफकेसमध्ये तिचा मित्र लपला आणि बियरच्या नशेत ती शोधायचे विसरून गेली आणि त्याचा मृत्यू झाला.
फ्लोरीडा : बॉयफ्रेंड सोबत HIDE AND SEEK खेळताना अमेरीकेतील फ्लोरीडा ( FLORIDA ) राज्यात एक विचित्र प्रकार घडला आहे. एक महिला आपल्या बॉयफ्रेंडसोबत हाईड सिक खेळत होती. दोघांनी बियरचे सेवन केले होते. बॉयफ्रेंड एका मोठ्या आकाराच्या बॅगेत लपला. त्यानंतर बराच वेळ तो आत राहीला. त्याचा गुदमरून मृत्य झाला. तिला तिचा पार्टनर बराच वेळ लपला आहे, हे नशेमुळे कळलेच नाही. त्याला हलगर्जीमुळे तिला पोलीसांनी मृत्यूस जबाबदार तिच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.
अमेरिकेच्या फ्लोरीडात एक कपल हाईड अॅण्ड सिक खेळण्यात रंगले होते. एका मोठ्या ब्रीफकेसमध्ये लपवले आणि बियरच्या नशेत ती विसरून गेली. तिला काही तासांनंतर वारंवार मोबाईल रिंग वाजत राहिल्याने जाग आली तोपर्यंत तिचा प्रियकर गुदमरून त्याचा मृत्यू झाला. तिला वाटले की तिचा प्रियकर खाली जिन्यावरून कुठेतरी गेला असावा त्यामुळे तिने दृर्लक्ष केले.
2020 च्या या प्रकरणात या महिलेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होत आरोपपत्र दाखल झाले आहे. सराह बून हीला फेब्रुवारी 2020 मध्ये अटक झाली. जोर्ज टोरेस आणि सराह बियर पिऊन लपाछपी खेळत असताना हा अपघात झाला. या घराच्या सीसीटीव्हीत तिचा मित्र जोर्ज आपल्याला गुदमरायला होत आहे. प्लीज याच्यातून मला बाहेर काढा असा ओरडत असल्याचे स्पष्टपणे ऐकायला येत आहे. परंतू नशेमध्ये असलेल्या सराह हीला ते ऐकायलाच आले नाही आणि ती झोपून राहीली. शेवटी गुदमरून त्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आले आहे.