एड्सपासून बचावाची लस तयार…महिलांवर झाला प्रयोग,चाचणीत आले इतके यश

एचआयव्ही विषाणूला रोखणारी लस संशोधकांनी शोधून काढले आहे. ही लस वर्षातून दोनदा घेतल्यास एड्सबाधित व्यक्ती पासून सुरक्षित राहाता येते असे संशोधकांचे म्हणणे आहे. त्यामुळे ही लस महत्वाची ठरणार आहे.

एड्सपासून बचावाची लस तयार...महिलांवर झाला प्रयोग,चाचणीत आले इतके यश
A vaccine to protect against AIDS is ready.
Follow us
| Updated on: Aug 01, 2024 | 11:07 PM

जगभरातील एचआयव्ही ग्रस्तांसाठी महत्वाची बातमी आली आहे. जर वर्षांतून दोनदा हे इंजेक्शन घेतले तर त्याचा बचाव होणार असल्याचे म्हटले जात आहे. संशोधकांनी महिलांवर प्रयोग केले आहेत. न्यू इंग्लंड जर्नल ऑफ मेडिसिनमध्ये या संदर्भात संशोधन प्रकाशित झाले आहे. एड्सवरील हे औषध संशोधकांनी शोधून काढले असून त्याचा इंजेक्शनमधून दोन डोस वर्षाला दिल्यानंतर एचआयव्ही प्रतिबंधक औषधाने महिलांमध्ये 100 टक्के रिझल्ट चांगले आले आहेत. तसेच त्यांच्या आरोग्यावर देखील कोणताही दुष्परिणाम झालेला नाही. वर्षातून दोनदा घ्यावा लागणाऱ्या या व्हॅक्सीनचे नाव लेनकापाविर असे आहे. अमेरिकेतील बायोफार्मास्युटिकल कंपनी जीलेड सायसेन्स यांच्यावतीने प्री-एक्सपोझर प्रोफिलॅक्सिस मेडिसिन म्हणून या औषधाला विकसित केले आहे. हे औषध एचआयव्हीचा वाहक नसलेल्या व्यक्तीच्या संपकार्त न आलेल्या व्यक्तीत संक्रमण रोखण्याचे काम करते.

या लसीची चाचणी करण्यासाठी दक्षिण आफ्रीका आणि युगांडा येथील किशोरवयीन मुली आणि तरुण महिलांना सामील करण्यात आले होते. ज्यांना आपल्या पार्टनरकडून या आजाराचा धोका आहे त्यांच्यावर देखील या औषधाचा चांगला परिणाम होईल असे म्हटले जात आहे. एचआयव्ही किंवा ह्युमन इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस हा संक्रमित व्यक्तीच्या शरीरातून निघणाऱ्या स्रावाद्वारे दुसऱ्याच्या शरीरात जातो. वेळीच उपचार न झाल्यास हा संसर्ग एड्समध्ये परिवर्तित होऊ शकतो किंवा वर्षानुवर्षे इम्युनोडेफिशियन्सी सिंड्रोम अवस्थेला निर्माण करु शकतो.

असा झाला अभ्यास

चाचणीत एचआयव्ही – नेगेटिव्ह होते अशा  5,338 उमेदवारांना यासाठी सामील केले गेले. त्यांची तीन गटात विभागणी केली. यातील पहिल्या 2,134 जणांच्या गटाला 26 आठवड्याच्या अंतरानंतर लेनकापाविर इंजेक्शन दिले गेले. दुसऱ्या 2,136 जणांच्या गटास रोज डेस्कोवी (एफ/टीएएफ) गोळी देण्यात आली. तिसऱ्या 1,068 जणांच्या गटाला प्रति दिन ट्रुवाडा (एफ/टीडीएफ) ही गोळी देण्यात आली. दक्षिण अफ्रीकेच्या केपटाउन यूनिव्हर्सिटीच्या डेसमंड टूटू HIV सेंटर यांच्या सहकार्याने संशोधकांनी केलेल्या संशोधनाकांना एकूण 55 संक्रमण आढळले. लेनकापाविर दिलेल्या गटात शून्य संग्रह, डेसोवी गटात 39 आणि ट्रुवाडा गटाच 16 संक्रमण आढळली. या अभ्यासातून वर्षातून दोनदा लेनकापाविर इंजेक्शन घेणाऱ्या व्यक्तीला कोणतेही एचआयव्ही संक्रमण झाले नाही.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.