Israel Under Attack : ‘कत्युशा रॉकेट’ किती घातक?, 2 ऱ्या महायुद्धात सोव्हीएतने केला होता प्रथम वापर, हेजबोलाचा जुगाड काय ?
इस्रायलने रविवारी सकाळी दक्षिणी लेबनॉनवर भयानक रॉकेट हल्ला केला आहे. इराणप्रणित अतिरेकी संघटना हेजबोलाने म्हटले आहे की आपण जशास तसे प्रत्युत्तर दिले आहे.
इस्रायलने रविवारी सकाळी दक्षिणी लेबनॉनवर भयानक रॉकेट हल्ले केले आहेत. इस्रायलच्या गोलान हाईट्सच्या अकरा तळांवर हे हल्ले झाले आहेत. बराकी आणि सैन्यतळांवर आतापर्यंत ‘कत्युशा’ रॉकेटच्या मदतीने मोठ्या संख्येने हे हल्ले करण्यात आले आहेत. शत्रूच्या मुख्य ठिकाणांना लक्ष्य केले असून अनेक तळ आणि बराकी उद्धवस्त केल्याचे हेजबोलाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे. इस्रायलची संरक्षक यंत्रणा ‘आयरन डोम’ प्लॅटफॉर्मला देखील लक्ष्य करण्यात आलेले आहे. गेल्या महिन्यात बैरुतच्या दक्षिण उपनगरात झालेल्या हल्ल्यात आमच्या मुख्य कमांडर फौद शुकुर यांच्या हत्येचा बदला आम्ही घेतल्याचे हेजबोलाने म्हटले आहे. या हल्ल्यासाठी कत्युशा रॉकेटचा वापर करण्यात आला आहे.हे रॉकेट दुसऱ्या महायुद्धात सोव्हीएत रशियाने तयार केले होते. आता ते हेजबोलाच्या आर्टीलरीत असलेल्या प्रमुख हत्यारापैकी एक आहे. शिया मिलिशिया हेजबोलाने इस्रायलच्या विरुद्ध आपल्या आक्रमक मोहीमेसाठी कत्युशा रॉकेटचा मोठ्या प्रमाणात वापर केला आहे.
कत्युशा रॉकेट काय आहे.
‘कत्युशा’ शब्द हा एक बोलचालीचा उपनाम आहे. याच नावाच्या युद्धाच्या वेळी गायल्या जाणाऱ्या लोकप्रिय सोव्हीएत गीतातून घेतलेला आहे. सोव्हीएत सैनिकांत हे गीत लोकप्रिय आहे. त्यामुळे या रॉकेट लॉंचरना हे नाव देण्यात आले होते. कत्युशा रॉकेट सिस्टीमचा विकास साल 1930 च्या दशकाच्या अखेरीस सुरु झाला. जेव्हा सोव्हीएत सैन्य इंजिनियर तोफखान्यांची ताकद वाढविण्यासाठी पर्यायांचा विचार सुरु झाला होता. त्यांना एक असे क्षेपणास्र हवे होते जे वेगाने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्फोटकांची वाहतूक करेल. या शोधात या मल्टीपल रॉकेट लॉंचरचा कॉन्सेप्ट समोर आला.
कत्युशा रॉकेटची रेंज –
पहिल्या कत्युशा रॉकेट लॉन्चरचे नाव बीएम-13 होते, सोवियत संघातील रिएक्टीव्ह सायंटिफिक रिसर्च इंस्टीट्यूटमध्ये (आरएनआयआय) जॉर्जी लॅंगमॅक, बोरिस पेट्रोपावलोव्स्की आणि एंड्री कोस्टीकोव्हच्या नेतृत्वाखाली एका टीमने तयार केले होते. या रॉकेटना एम-13 नाव दिले होते, ‘एम’ चा अर्थ ‘Mina’ ( रशियन भाषेत माझा ) होतो, आणि ’13’ रॉकेटच्या कॅलिबर (132 मिमी) दर्शवितो. कत्युशा रॉकेटची रेंज 4 ते 40 किलोमीटर पर्यंत असते.
अमेरिकेचे ट्रक आणि रशियाचे रॉकेट
कत्युशा रॉकेट खूपच साधे असून बिना गाईड वाले आणि सॉलिड फ्यूअल वर चालतात. या रॉकेटना विविध प्लॅटफॉमवर बसविण्यात आले होते. ज्यात अमेरिकेद्वारे लीजवर मिळालेल्या ट्रकवरील कत्युशा रॉकेट प्रसिद्ध आहेत. ट्रक (सर्वात प्रसिद्ध स्टडबेकर यूएस 6 ट्रक). हे ट्रकवर असल्याने कुठेही नेता येतात आणि डागता येतात. रॉकेट लॉन्चर वेगाने एका मागोमाग रॉकेटडागू शकतात, ज्यामुळे आगीचा तुफान तयार करते आणि शत्रूंची तटबंदी भेदू शकते.
कत्युशा रॉकेटचा पहिल्यांदा वापर केव्हा
सोव्हीएत संघाने जर्मनीवरआक्रमण केल्यानंतर, जुलै 1941मध्ये दुसऱ्या महायुद्धात सोव्हीएत सैन्यांनी पहिल्यांदा युद्धात या कत्युशा रॉकेट लॉन्चरचा वापर केला होता.बेलारूसच्या ओरशाजवळ जर्मन तोफखान्या विरोधात कत्युशा रॉकेटचा पहिला वापर झाला होता. कमी कालावधीत मोठ्या प्रमाणात आगीचा भडका उडवून शत्रूला चकीत करण्याची क्षमता या रॉकेटमध्ये असल्यामुळे हे खूपच प्रभावी ठरले होते. संपूर्ण युद्धादरम्यान, ते सोव्हिएत तोफखान्याच्या शक्तीचे प्रतीक बनले आणि सर्व आघाड्यांवर मोठ्या प्रमाणावर वापरले गेले होते.