Israel Hezbollah War : इस्रायलची 3 लेअर सिस्टीम हिजबुल्लाहने कशी भेदली ?
हिजबुल्लाहच्या हल्ल्यात 100 हून अधिक इस्रायली सैनिक जखमी झाले आहेत. गोलाणी ब्रिगेडच्या मुख्यालयावरील रक्ताचे डाग या भीषण हल्ल्याची ग्वाही देतात. हल्ल्याच्या वेळी लष्करप्रमुख हरजी हलेवी तळावर होते, असा दावा हिजबुल्लाने केला आहे. हलेवी सैनिकांसोबत जेवत होते. हिजबुल्लाने या ऑपरेशनला खैबर असे नाव दिले होते.
इस्रायलवर आत्तापर्यंतचा सर्वात मोठा आणि विध्वंसक हल्ला झाला आहे. खास प्लानिंग करून हिजबुल्लाहने हा हल्ला घडवला. 13 ऑक्टोबर रोजी झालेल्या ड्रोन हल्ल्यात इस्रायलचे मोठे नुकसान झाले. 100 हून अधिक जवान जखमी, लष्करप्रमुखांच्या जीवाला धोका असल्याचीही माहिती आहे. मात्र इस्रायलची 3 लेअरची डिफेन्स सिस्टीम भेदून एवढा मोठा हल्ला करण्यात हिजबुल्लाह यशस्वी कसा ठरला, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. हिजबुल्लाहचे ड्रोन इस्रायलच्या एलिट फोर्सच्या तळापर्यंत कसे पोहोचले? हिजबुल्लाला इस्रायली संरक्षण यंत्रणेविरुद्ध काही विशेष तंत्रज्ञान मिळाले आहे का? यामागे कोण आहे ते जाणून घेऊया…
गेल्या वर्षभराहून अधिक काळ सुरू असलेल्या युद्धात इस्रायलवर एवढा मोठा हल्ला कधीच झाला नव्हता. 13 ऑक्टोबरची संध्याकाळ जसजशी गडद होत गेली तेव्हाच संधी साधून हिजबुल्लाहने इस्रायलवर ड्रोन हल्ला केला. आकाशात एक ड्रोन दिसला आणि लोकांची धावपळ उडाली. इस्रायलचा गोलानी ब्रिगेडचा तळ या ड्रोनचे लक्ष्य ठरला. एक स्फोट आणि भयानक विध्वंस झाला.
इस्त्रायली एलिट फोर्सचे मुख्यालय हादरलं
हिजबुल्लाहच्या हल्ल्यात 100 हून अधिक इस्रायली सैनिक जखमी झाले. गोलाणी ब्रिगेडच्या मुख्यालयावरील रक्ताचे डाग या भीषण हल्ल्याची ग्वाही देतात. या हल्ल्यात 5 इस्रायली सैनिकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून 9 सैनिक गंभीर जखमी झाले आहेत. हिजबुल्लाहच्या ड्रोन हल्ल्यामुळे इस्रायलचे इतके मोठे नुकसान कधीच झाले नव्हते.
हैफाच्या दक्षिणेस बेन्यामीना येथील गोलानी ब्रिगेड तळावर हिजबुल्लाहच्या ड्रोनचा हल्ला झाला. तेव्हा त्या बेसवर जेवण सुरू होतं. या कार्यक्रमात 500 इस्रायली सैनिक सहभागी झाले होते. रात्रीच्या जेवणाच्या वेळी हिजबुल्लाहने ड्रोन हल्ला केला. ड्रोनच्या स्फोटानंतर त्या बेसवर अक्षरश: अफरातवर माजली, एकच गोंधळ सुरू झाला. ज्यांच्या हातात जेवणाची प्लेट होती, त्यांना हातात स्ट्रेचर घेऊन जखमींच्या मदतीसाठी धाव घ्यावी लागली.
जखमींच्या मदतीसाठी रुग्णवाहिका तातडीने दाखल झाली. तर गंभीर जखमी जवानांना रुग्णालयात नेण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. गंभीर जखमी जवानांना रामबम रुग्णालयात दाखल करण्यात आले. एकाच हल्ल्यात इस्रायलचे इतके मोठे नुकसान कधीच झाले नव्हते. गेल्या एका वर्षात हिजबुल्लाहच्या हल्ल्यात 30 पेक्षा कमी लोक मारले गेले, परंतु या एका ड्रोन हल्ल्याने इस्रायली एलिट फोर्सचे मुख्यालय अक्षरश: हादरले.
जबरदस्त प्लानिंगनंतर हिजबुल्लाहने केला हादरवणारा हल्ला
हल्ल्याच्या वेळी लष्करप्रमुख हरजी हलेवी तळावर होते, असा दावा हिजबुल्लाने केला आहे. हल्ला झाला तेव्हा हलेवी सैनिकांसोबत जेवत होते. हिजबुल्लाहच्या ड्रोन हल्ल्यात इस्रायलचे लष्करप्रमुखही जखमी झाले होते, मात्र हल्ल्यानंतर काही तासांनी हरजी हालेवी गोलानी ब्रिगेडच्या तळावर पोहोचले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी करत माहिती घेतली. इस्रायलच्या लष्करप्रमुखांसोबतच संरक्षण मंत्री योव गॅलांट हेही हल्ल्याच्या ठिकाणी पोहोचले होते. हिजबुल्लाहच्या हल्ल्यात इस्रायलचे लष्करप्रमुख सुरक्षित आहेत, मात्र इस्रायलच्या संरक्षण शक्तीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. हिजबुल्लाने जबरदस्त प्लानिंगनंतर ही कारवाई केली.
खैबर असं नाव हिडबुल्लाहने या ऑपरेशनला दिलं होतं. खैबर म्हणजे किल्ला. इस्त्रायली लष्कराच्या किल्ल्यावर, महत्वाच्या जागेवर ड्रोन हल्ला करून हिजबुल्लाहने इस्रायलला नामोहरम करण्याचा प्रयत्न केला आहे.या हल्ल्यात हिजबुल्लाहने वापरलेले ड्रोन इराणने बनवले असून या ड्रोनचे नाव मिरसाद 2 आहे. हिजबुल्लाला मिळालेल्या या हायटेक ड्रोनमागे रशियन आणि इराणची युती असण्याचीही शक्यता व्यक्त होत आहे.
2 वर्षांपूर्वीपर्यंत इराणकार्बन फायबर हल्ला करणारे ड्रोन बनवत नव्हते. पण रशियाकडून ड्रोन बनवण्यासाठी कार्बन फायबरचा वापर केला जातो. रशियानेच कार्बन फायबर असलेले ड्रोन आणि अपग्रेडेड कंट्रोल सिस्टीम इराणला दिली असण्याची शक्यता आहे. यानंतर हे ड्रोन हिजबुल्लाला देण्यात आले असावेत, अशी शक्यता व्यक्त होत आहे. हिजबुल्लाहने 10 ऑक्टोबरलाच ऑपरेशन खैबरचे संकेत दिले होते. 1
हल्ल्यापूर्वी झाली होती रेकी
हिजबुल्लाने हुदहुद ड्रोनच्या सहाय्याने इस्रायली पोझिशन्सची तपासणी केली होती. या व्हिडिओमध्ये गोलाणी ब्रिगेडचे मुख्यालयही टार्गेट दाखवण्यात आले होते. तीन दिवसांच्या आतच हिजबुल्लाहने गोलानी ब्रिगेडच्या मुख्यालयावर अचूक ड्रोन हल्ला केला आणि या हल्ल्यात इस्रायलचे आतापर्यंतचे सर्वात मोठे नुकसान झाले.