डोनाल्ड ट्रम्प यांच्या दिमतीला असणारे ‘एअर फोर्स वन’ किती ताकदवान आहे पाहा ?

अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून रिपब्लिकन पार्टीचे डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाला आहे.लवकरच ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेणार आहेत. त्यांच्या दिमतीला आता एक खास विमान असणार आहे. पाहूयात विमानाची काय आहेत वैशिष्ट्ये ...

डोनाल्ड ट्रम्प यांच्या दिमतीला असणारे 'एअर फोर्स वन' किती ताकदवान आहे पाहा ?
Follow us
| Updated on: Nov 06, 2024 | 6:04 PM

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदावर पुन्हा एकदा डोनाल्ड ट्र्म्प विराजमान होणार आहेत. या निवडणूकीकडे सर्व जगाचे लक्ष लागले होते. या विजयानंतर फ्लोरिडा येथे आपल्या समर्थकांना संबोधित केले. यावेळी त्यांची पत्नी मेलानिया ट्र्म्प या देखील हजर होत्या. या विजयावर ट्र्म्प यांनी सांगितले की हे अमेरिकेसाठी सुवर्णयुग असेल. आज दिवस आपल्या आयुष्यातील सर्वात मोठा महत्वाचा दिवस आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विजयाबद्दल ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काही दिवसांपूर्वी प्रचार करीत असताना गोळीबार देखील झाला होता. आता त्यांच्या सुरक्षेसाठी खास विमान असणार आहे. या विमानातून ते कोणत्याही देशाचा प्रवास करु शकणार आहे. तर या विमानाला काय म्हणतात. हे विमान किती सुरक्षित असते ते पाहूयात

विमानात काय खास?

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्या विमानातून प्रवास करत असतात त्याला एअर फोर्स वन नावाने ओळखले जाते. एअर फोर्स वन एक बोईंग 747-200B मालिकेतील विमान आहे. ज्याचा टेल कोड 28000 आणि 29000 आहे. या विमानात 87 टेलीफोन असतात. ज्याची आवश्यकता अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना कोणत्याही आपातकालिन परिस्थितीत पडू शकते. 232 फूट लांबीच्या या विमानात चार जेट इंजिन्स आहेत. जे विमानाला 630 मैल प्रति तासाच्या वेगाने उडवू शकतात.

या विमानाला असे बनविले आहे की ते हवेत देखील इंधन भरु शकते. एअर फोर्स वन केवळ विमान नसून चालता फिरता दूतावास किंवा कार्यालय आहे. या विमानात एक कॉन्फ्रेस रुम आणि एका डॉक्टरची देखील व्यवस्था केलेली असते. ते कोणत्याही प्रकारची शस्रक्रिया करण्यात तज्ज्ञ असतात. तसेच किचन असते ज्यात 100 लोकांचे एकाच वेळी जेवण बनविण्याची व्यवस्था असते.

याविमानात तीन मजले असतात. एकूण 4,000 चौरस फूटाची जागा असते. एअर फोर्स वनमध्ये राष्ट्राध्यक्षा सोबत प्रवास करणाऱ्यासाठी एक क्वार्टर असते. ज्यात वरिष्ठ सल्लागार, सिक्रेट सर्व्हीसचे अधिकारी, पत्रकार आणि अन्य लोकांचा समावेश असतो.

एअरफोर्स वनची सुरक्षा –

अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचे विमान अत्यंत सुरक्षित असते. या विमानाच्या मागे नेहमी एक दुसरे विमान उडत असते. त्याला डुम्सडे प्लेन म्हणतात. डुम्स डे विमानात न्युक्लिअर बंकर आणि कंमाडर सेंटर असते. या विमानाची खासियत म्हणजे ते कोणतोही न्युक्लिअर हल्ला रोखण्यात समर्थ असते.एअर फोर्स वन देखील उच्च सुरक्षेने परिपूर्ण असते. परंतू सुरक्षेच्या कारणावरुन ही माहिती गुप्त ठेवण्यात आलेली आहे.

Non Stop LIVE Update
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड
महाराष्ट्रात महायुतीची लाट नाही त्सुनामी, भाजपन स्वतःचा मोडला रेकॉर्ड.
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल
लाडक्या बहिणी वनसाईड महायुतीच्या बाजूने, सत्तेच्या दिशेने वाटचाल.
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?
मलिक बाप-लेक पिछाडीवर,अणूशक्तीनगर-मानखुर्द शिवाजीनगरमध्ये कोण आघाडीवर?.
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?
परळीत कोणाच्या घड्याळ्याची टीक-टीक वेगानं, राष्ट्रवादीत गुलाल कोणाचा?.
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?
कोपरी-पाचपाखाडीतून कोण आघाडीवर? एकनाथ शिंदे गड राखणार की...?.
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?
छगन भुजबळांना मोठा धक्का, EVM मोजणीत पिछाडीवर, येवल्यात गुलाल कोणाचा?.
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?
माहिम मतदारसंघातील तिरंगी लढतीत आमित ठाकरे आघाडीवर, बाजी मारणार?.