Video : घरातलं वीजबिल कसं कामी करायचं? मौलानानं सांगितली अशी युक्ती; वीज विभागाला बसला 440 होल्टचा झटका
वीजबिल कमी कसं येईल याच विचारात सर्वजन असतात. मात्र यावर एका मौलानानं दिलेलं उत्तर ऐकूण तुम्हाला देखील हसू आवरता येणार नाही.

आता मार्चचा महिला संपत आला असून, एप्रिल महिना सुरू होणार आहे. मार्चपासूनच तापमानात प्रचंड वाढ झाली आहे. उकाडा वाढला आहे. घरात पंखा किंवा कूलर सुरू केल्याशिवाय तुम्ही थांबण्याचा विचारही करू शकत नाहीत. पुढच्या महिन्यामध्ये तर गरमी एवढी वाढू शकते की तुम्हाला एसी देखील लावावा लागेल. तुम्ही तुमच्या घरात पंखा, कूलर आणि एसी लावून गरमीपासून तर वाचू शकता. मात्र प्रश्न असा आहे की त्यामुळे वीजबिलात प्रचंड वाढ होणार आहे. वाढत्या वीज बिलापासून तुम्ही तुमची सुटका कशी कराल? उन्हाळाच्या दिवसांमध्ये वाढतं वीज बिल हे कायमच सर्वांसाठी डोकेदुखी ठरत असतं.
वीजबिल कमी कसं येईल याच विचारात सर्वजन असतात. मात्र यावर आपला शेजारी देश पाकिस्तानने आता तोडगा काढला आहे. तुम्ही विचार करत असाल तोडगा काढला म्हणजे नेमकं काय केलं? पाकिस्तानच्या एका मौलानानं तेथील एका टीव्ही चॅनलला मुलाखत देताना ही युक्ती सांगितली आहे. याचा एक व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
View this post on Instagram
असं करा वीजबिल कमी
व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ पाकिस्तानमधील एका खासगी वृत्तवाहिनीचा आहे. या चॅनललने एका मौलानाला आपल्या चॅनलवर निमंत्रीत केलं होतं. आजाद जमील असं या मौलानाचं नाव आहे. लोकांनी विचारलेल्या प्रश्नांना हा मौलाना उत्तर देत होता. याच शोमध्ये कराचीमधील एका महिलेनं प्रश्न विचारला. घरात वीजबिल जास्त येत, त्याला कमी करण्यासाठी काय केलं पाहिजे. या प्रश्नावर मौलानानं जे उत्तर दिलं त्याचा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. वीज मिटरवर आपल्या हाताने ‘झम-झम’ लिहा वीजबिल कमी होईल असा दावा या मौलानानं केला आहे.
हे काम तुम्हाला महिन्यातून दोनदा करायचं आहे, जर त्यानंतर तुमचं वीजबिल कमी नाही झालं तर मला बोला असं या मौलानानं या महिलेच्या प्रश्नाला उत्तर देताना म्हटलं आहे. हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून, आतापर्यंत साठ लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.