कसं हसावं ? यासाठी तासाची फी आहे इतकी, मास्क हटल्यानंतर तरूण-तरूणींची क्लासेससाठी गर्दी

आरशात स्वत:चे प्रतिबिंब पाहून डझनावारी तरूण-तरूणी वरचा ओठ अधिक उचलून आपल्या दंत पंक्ती अधिक दिसाव्यात यासाठी गालाला दोन्ही बाजूंनी स्ट्रेच करीत बोटांनी ओठ उचलत प्रॅक्टीस करीत आहेत...हे दृश्य सध्या या देशात कॉमन झालं आहे.

कसं हसावं ? यासाठी तासाची फी आहे इतकी, मास्क हटल्यानंतर तरूण-तरूणींची क्लासेससाठी गर्दी
faceImage Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Jun 07, 2023 | 6:46 PM

मुंबई : ‘सांगा कसं जगायचं कण्हत.. कण्हत की गाणं म्हणत’ अशी कवी मंगेश पाडगावकर यांची सुंदर कविता आहे. या कवितेत पुढे ओळी आहेत की, ‘डोळे भरून तुमची आठवण, कोणीतरी काढतंच ना?, ऊन ऊन दोन घास, तुमच्यासाठी वाढतंच ना ?, शाप देत बसायचं की दुवा देत हसायचं, तुम्हीच ठरवा! एखाद्याचं गालावरचं प्रसन्न हसूच त्याचं अर्धे काम करुन टाकते असे म्हणतात. मोकळं खळखळून हसणं हे सर्व आजारावरचं औषध आहे असं म्हटलं जातं. माणूस जेव्हा गंभीर असतो तेव्हा चेहऱ्याच्या सर्वाधिक स्नायूंवर ताण असतो. आणि मोकळं ढाकळं हसु गालावर असेल तर सर्वात कमी स्नायू वापरले जातात. मात्र, कोरोनानंतर गालावरचा मास्क हटल्याने आता तरूण-तरूणी चेहऱ्यावर बहारदार हसु येण्यासाठी तगडी फि भरून चक्क क्लासेस लावत आहेत.

आरशात स्वत:चे प्रतिबिंब पाहून डझनावारी तरूण-तरूणी वरचा ओठ अधिक उचलून आपल्या दंत पंक्ती अधिक दिसाव्यात यासाठी गालाला दोन्ही बाजूंनी स्ट्रेच करीत बोटांनी ओठ उचलत प्रॅक्टीस करीत आहेत…हे दृश्य सध्या जपानच्या टोकीयो आर्ट स्कूलमध्ये दिसत आहे. कसं हसावं याचं मार्गदर्शन येथे दिले जात आहे. जपान या अति पूर्वेकडील देशात आता पाश्चिमात्य हॉलीवूडच्या अभिनेत्यांप्रमाणे स्मायलिंग हवे यासाठी तरूण-तरूणी झटत आहेत. या क्लासच्या इन्स्ट्रक्चर कैको कवानो यांनी सांगितले की, कोरोनाची लाट जगभरात आली, त्यानंतर मास्क गेला परंतू चांगले कसं हसावं मागणी वाढल्याने हे क्लासेस सुरु केल्याचे कवानो म्हणतात.

आपल्या शालेय कोर्सचा एक भाग म्हणून जॉब मार्केटमध्ये शिरकाव करण्यापूर्वी आपले व्यक्तीमत्व चांगल्या हसण्याने आणखी खुलावे यासाठी आपण हा कोर्स लावल्याचे हिमावरी योशिदा ( वय 20 ) हीने म्हटले आहे. कोरोनाकाळात मास्कमुळे आपल्या चेहऱ्याचे स्नायू हललेच नाहीत त्यामुळे हा एक चांगला व्यायाम देखील असल्याचे ती म्हणते. कवानो हीची कंपनी इगायोकी स्माईल एज्यूकेशन हीची कोरोनानंतर चार पट वाढ झाली आहे. आपला ग्राहक वाढवू इच्छीणारे सेल्ममन, स्थानिक प्रशासन त्यांच्या नागरीकांना या क्लासेससाठी पाठवित असून एका तासाच्या ट्यूशनची फि 7,700 येन ( 4,537 भारतीय रुपये )  इतकी आहे.

मास्क कायम राहीला 

कोरोनाआधी देखील जपानमध्ये मास्क घातला जात होता. कारण येथे हे फिव्हरची साथ सुरू होती. त्यामुळे आजारी पडू नये म्हणून लोक मास्क मध्येच वावरत होते. परंतू सरकारने जेव्हा मार्चमध्ये निर्बंध हटविल्याचे जाहीर केले तरी काही लोकांनी मास्क काढला नाही. पब्लिक ब्रॉडकास्टर एनएचके यांनी केलेल्या एका पाहणीत 55 टक्के लोकांनी सांगितले की निर्बंध हटल्यानंतरही त्यांनी दोन महिने मास्क कायम ठेवला होता तर केवळ 8 लोकांनीच मास्क घालणे बंद केल्याचे म्हटले.

हे आहेत हसण्याचे धडे  

हॉलिवूड स्मायलीग टेक्निक, हसताना चंद्रकोरी प्रमाणे डोळे करणे, गोलाकार गाल करणे, हसताना मोत्यांसारखे वरचे आठही दात दिसावे असा तोंडाला आकार देणे, अशा अभ्यासासाठी विद्यार्थी लॅपटॉपवर प्रॅक्टीस करीत आहेत. कवानो मजेत म्हणते की सांस्कृतिकदृष्ट्या जपानी लोक पाश्चात्यापेक्षा अधिक मोकळेपणे हसू शकत नाहीत, कारण हा देश आयलॅंड आहे. त्यामुळे सुरक्षेच्या भीतीमुळे त्यांना हसणं थोडं जड जात असावे, एखाद्याला बंदुकीच्या धाकावर हसवू तर शकत नाही ना ! हसणं हे सूचित करतं की माझ्याकडे गन नाही, माझ्या पासून तुला काही धोका नाही.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.