बीजिंग | 10 जानेवारी 2024 : लग्न आणि संसाराचं स्वप्न अनेक जण पाहतात. बऱ्याचं लोकांचं स्वप्न खरं होतं, पण काहींना नात्यात विश्वासघात सहन करावा लागतो. विश्वासाला तडा गेला की माणूस तुटतो आणि तो संसारही. घटस्फोटाशी निगडीत एका प्रकरणात जेव्हा पतीने पत्नीशी संबंधित काही गोष्टी उलगडून सांगितल्या तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले, अनेक जण हैराण झाले. त्या व्यक्तीने सांगितलं की त्याच्या लग्नाला 16 वर्ष उलटून गेली आहेत, त्यांना चार मुलीही आहेत. पण तो त्यांचा पिता नसून त्या मुलींचा बाप कोणी औरच निघाल्याचे उघड झाले. हे ऐकून अनेक जण हैराण झाले.
16 वर्षांच्या संसारात पत्नी त्या इसमाला धोका देत होती. त्याने यासंबंधीचे पुरावेही कोर्टाकडे सोपवले. विश्वासघाताचं हे प्रकरण चीनमधील जियांग्शी प्रांतातील आहे. त्यावर गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात न्यायालयात सुनावणी झाली. चेन जिशियान नावाच्या व्यक्तीने आपल्या पत्नीविरुद्ध घटस्फोटाची याचिका दाखल केली होती. यु असे पत्नीचे नाव आहे. साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टनुसार, चेन आणि त्यांच्या वकिलाने काही पुरावे सादर केले. चेन जिशियानच्या पत्नीने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांच्या शहराबाहेर जाऊन एका मुलीला जन्म दिल्याचे त्यामध्ये म्हटले होते.
डिलीव्हरीच्या वेळेस आला मुलीचा बाप
तिच्या डिलीव्हरीच्या वेळेस हॉस्पिटलमध्ये त्या मुलीचे वडील आले. पण तो चेन जिशियाने नव्हे तर कोणी औरच होता. त्याचे नाव वू असं असल्याचं रुग्णालयातील कागदपत्रांवरून स्पष्ट झालं. त्याचे आपल्या पत्नीशी प्रेमसंबंध असावेत, असा संशय चेनला आला. सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा होत आहे. लोक चेनला देशातील सर्वात दुखी माणूस म्हणत आहेत.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, चेनच्या उर्वरित तीन मुलींचा जन्म 2008, 2010 आणि 2018 मध्ये झाला. त्यांचा पिताही तोच वू नावाचा माणूस आहे. 2022 मध्ये चेन आणि त्याची पत्नी यांच्यात वाद सुरू झाला. तेव्हाच त्याला समजलं की आपली पत्नी फसवणूक करत आहे. चेनने फेब्रुवारी २०२२ मध्ये यूचा पाठलाग सुरू केला. एके रात्री त्याने हॉटेलमध्ये त्याने त्याची पत्नी यू हिला दुसऱ्या एका पुरुषासोबत पाहिले.
संशय आल्यावर केली डीएनए टेस्ट आणि..
धाकटी मुलगी ही आपली नाही असा संशय चेनला आला होता. कारण ती त्याच्यासारखी अजिबात दिसत नव्हती. त्यानंतर त्याची व मुलीची डीएनए चाचणी करण्यात आली. आणि त्याचा संशय खरा ठरला. त्यानंतर त्याने त्याच्या उर्वरित तीन मुलींचीही डीएनए चाचणी केली. तेव्हाच त्याला धक्कादायक सत्य समजलं की, त्या मुलींचा पिताही तो नाहीच तर दुसरा इसम आहे.
त्यानंतर चेनने थेट सासर गाठलं आणि तिकडे सगळ्या गोष्टींबाबत माहिती दिली. मात्र तेथे त्याचे सासूशी भांडण झालं. दोघांच्याही भांडणात सासू खाली कोसळली. याचा त्याच्या पत्नीला, यू हिला खूप राग आला आणि ती रागातच चेनच्या आई-वडिलांशी भांडण्यासाठी त्यांच्या घरी गेली. त्यामुळे चेनच्या वडिलांना धक्का बसला. ते हृदयरोगी असून त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
या सगळ्याचा चेनच्या मनावर खूप वाईट परिणाम झाला. माझी मुलं ही माझी नाहीतच, मी त्यांचा पिता नाही, हे जेव्हा मला समजलं तेव्हा मला प्रचंड वाईट वाटलं, मनात वेदना झाल्या, अशा शब्दात चेनने त्याच्या भावना मांडल्या,
पत्नीला खरं विचारलं तेव्हा..
या सर्व गोष्टी समजल्यानंतर चेनने पत्नीला मुलांच्या खऱ्या वडिलांबद्दल विचारले असता, ती काहीच बोलली नाही. पण आता चेनची इच्छा आहे की त्याच्या चारही मुलींचा ताबा त्याच्या पत्नीलाच ताबा मिळावा. आणि त्यांच्या पालनपोषणासाठी मी जे पैसे खर्च केले, ते मला मिळावेत असं चेनला वाटतं.
मात्र यामुळे चेनची खुश नाही. माझ्या मुली इतकी वर्ष त्यालाच (चेनला) बाबा म्हणतात. त्याने डीएनए टेस्ट करून अतिशय चुकीचं , क्रूर काम केलं आहे. मी त्यांना धोका दिला असं मला वाटत नाही. रक्ताचं नातचं हेच खरं असतं का ? , तेच सर्वस्व असतं ? का असा सवालही तिने विचारला.