मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रस्त्यावरचे खड्डे दाखवायचे नव्हते, काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प ?
सुपरपॉवर अमेरिका जेथील दरडोई उत्पन्न भारताच्या दरडोई उत्पन्नांपेक्षा कित्येक पटींनी अधिक आहे. त्या अमेरिकेलाही रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न भेडसावत असल्याचे उघड झाले आहे. कारण राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यासंदर्भात एका कार्यक्रमात केलेले विधान चर्चेत आले आहे.

जेव्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी , फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्युन्युअल मॅक्रो, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर मला भेटायला अमेरिकेत आले होते. तेव्हा आपण त्यांच्या ताफ्याचा मार्ग वळविला होता, कारण मला आपल्या संयुक्त अमेरिकेच्या इमारतींसमोरील खड्डे आणि तंबू दाखवायचे नव्हते असा खुलासा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनच्या साफसफाई संदर्भातील एक विधान चर्चेत आले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जगभरातील दुसऱ्या मोठ्या नेत्यांसमोर वॉशिंग्टनच्या रस्त्यावरील खड्डे दिसू नये अशी आमची धडपड होती. त्यामुळेच त्यांचा रुट मला डायवर्ट करावा लागला असे डोनाल्ड ट्रम्प यांनी कबूल केले आहे. गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी जगभरातील इतर नेतेही आले होते.
भारताचे पंतप्रधान मोदी, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इम्युन्युअल मॅक्रो, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर मला भेटायला आले तेव्हा मी रुट डायवर्ट केला होता. कारण माझी इच्छा नव्हती की आपल्या सरकारी इमारती भोवतालचे खड्डे आणि लावलेले तंबू या नेत्यांना दिसू नयेत. रस्त्यांवरील तुटलेले बॅरियर, खड्डे आणि भित्ती चित्र त्यांना दिसू नयेत अशी माझी इच्छा होती. आम्ही त्याला सुंदर बनवले. मी राजधानीच्या साफसफाईचे आदेश दिले होते असे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.




वाशिंग्टनला आणखी सुंदर बनविणार
न्याय आणि विधी विभागाच्या एका कार्यक्रमांदरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले की आम्हालाा आमच्या शहरांची स्वच्छता करायची आहे. आम्ही आमच्या या राजधानीची साफ सफाई करीत आहोत आणि गुन्ह्यांवर अंकुश आणणार आहोत. आम्ही गुन्हेगारांना पाठीशी घालणार नाही. आम्ही भिंती चित्रांना हटविणार आहोत. आम्ही आधीच तंबू हटविण्यास सुरुवात केली आहे. आणि प्रशासनाच्या सोबतीने हे काम करणार आहोत असेही डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
आतापर्यंत वॉशिंग्टनचे महापौर म्युरियल बोसर यांनी राजधानीच्या स्वच्छते संदर्भात चांगले काम केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्यासमोरच अनेक तंबू लावलेले आहेत. त्यांना हटवावे लागणार आहे. आम्हाला एक अशी राजधानी हवी जी जगभरात चर्चेला येईल असेही अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.