फॉरेन फंडिंग प्रकरणात इम्रान खान दोषी, भारतासह अनेक देशांकडून घेतल्या अब्जावधींच्या देणग्या, 13 बँक अकाऊंटमध्ये लपवला काळा पैसा

भारतासह अनेक देशांकडून अब्जावधी रुपयांच्या देणग्या घेतल्या आणि त्या देणग्यांची माहिती सरकार, निवडणूक आयोग आणि अर्थ मंत्रालयाला देण्यात आली नाही. असा आरोप इम्रान खान आणि त्यांच्या पक्षावर आहे. विशेष म्हणजे चार महिन्यांपूर्वी इम्रान खान ज्या मुख्य निवडणूक आयुक्त सिंकदर सुल्तान राजा यांचे कौतुक करत होते, आता त्यांनाच काढण्याची मागणी इम्रान खान करीत आहेत.

फॉरेन फंडिंग प्रकरणात इम्रान खान दोषी, भारतासह अनेक देशांकडून घेतल्या अब्जावधींच्या देणग्या, 13 बँक अकाऊंटमध्ये लपवला काळा पैसा
इम्रान खान यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी
Follow us
| Updated on: Aug 02, 2022 | 6:52 PM

इस्लामाबाद : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान(Imran Khan) आणि त्यांचा पक्ष तहरीक-ए-इन्साफ (PTI)यांना 8 वर्षे जुन्या फॉरेन फंडिंग प्रकरणात दोषी( Convicted in Foreign Funding Case) ठरवण्यात आलेले आहे. पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाने इम्रान खान यांना नोटीस पाठवत, ही सर्व अकाऊंट्स सील का करु नये, अशी विचारणा केली आहे. इम्रान खान आणि त्यांचा पक्ष PTI यांनी या प्रकरणात उत्तरे दिलेली नव्हती. निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानुसार, PTI ने 34 विदेशी नागरिक आणि 351  कंपन्यांकडून देणगी घेतली होती. हे पैसे ठेवण्यात आलेल्या केवळ 8 बँक अकाउंट्सची माहिती देण्यात आली. 13 अकाऊंटमध्ये काळा पैसा ठेवण्यात आला आणि तो लपवण्यात आला. याच्याव्यतिरिक्त असलेल्या ३ खात्यांची सखोल चौकशी अद्याप सुरु आहे. इम्रान खान हे खोटारडे असल्याचे पाकिस्तान निवडणूक आयोगाने म्हटले आहे. पाकिस्तान निवडणूक आयोगाच्या कागदपत्रांनुसार, पाकिस्तानीतल वृत्तपत्र द न्यूजने असा दावा केला आहे की, इम्रान आणि पीटीआय या त्यांच्या पक्षाने अमेरिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाच्या उद्योगपती रोमिता शेट्टी यांच्याकडून 14 हजार डॉलर्स देणगी घेतली.

कसे अडकले इम्रान खान?

भारतासह अनेक देशांकडून अब्जावधी रुपयांच्या देणग्या घेतल्या आणि त्या देणग्यांची माहिती सरकार, निवडणूक आयोग आणि अर्थ मंत्रालयाला देण्यात आली नाही. असा आरोप इम्रान खान आणि त्यांच्या पक्षावर आहे. विशेष म्हणजे चार महिन्यांपूर्वी इम्रान खान ज्या मुख्य निवडणूक आयुक्त सिंकदर सुल्तान राजा यांचे कौतुक करत होते, आता त्यांनाच काढण्याची मागणी इम्रान खान करीत आहेत. इम्रान खान आणि त्यांच्या पक्षाची सर्व खाती सध्या जप्त करण्यात आली आहेत. यात दोषी आढळल्याने आता इम्रान खान यांना आजन्म निवडणूक लढण्यावर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या पक्षावरही बंदी येण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. पाकिस्तानात परदेशातून राजकीय देणग्या जमा करणे हे बेकायदेशीर मानण्यात येते.

इम्रान यांच्या पक्षाच्या नेत्यानेच दाखल केली होती केस

इम्रान खान यांनी १९९६ साली पीटीआय़ या पक्षाची स्थापना केली होती. त्यातील संस्थापक सदस्यांमध्ये अकबर एस बाबर यांचाही समावेश होता. बाबार यांना इमानदार आणि इम्रान खान यांचे विश्वासू समजण्यात येत असे. याच बाबर यांनी २०१४ साली अम्रान खान यांच्याविरोधात कोर्टात फॉरेन फंडिंग प्रकरणात तक्रार दाखल केली होती. कोर्टाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे पाठवले होते. १४ नोव्हेंबर २०१४ पासून या खटल्याची सुनावणी सुरु होती. पाकिस्तानी सैन्याचे लाडके असलेल्या इम्रान यांना यातून वाचवण्याचे अनेक प्रयत्न यापूर्वी करण्यात आले आहेत. आता इम्रान यांची सत्ता गेल्यानंतर, या प्रकरणाची दररोज सुनावणी होते आहे. यामुळे इम्रकान खान घाबरलेले आहेत.

काय आहे फॉरेन फंडिंग केस

हे प्रकरण २०१० साली सुरु आहे. त्यावेळी इम्राम खान यांचा राजकीय पक्ष तहरिक ए इन्साफ देशात पाय रोवत होती. त्याकाळी पक्ष चालवण्यासाठी पैसे नव्हते आणि मित्र मदत करत होते, याची कबुली इम्रान यांनीच यापूर्वी दिली आहे. याबाबत २०१४ साली तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीत अकबर बाबर यांनी दावा केला आहे की, एकूण १.६४ अब्ज पाकिस्तानी रुपयांची देणगी पक्षाला मिळाली. ३१ कोटी पाकिस्तानी रुपये यात गायब करण्यात आल्याचा आरोप आहे.

Non Stop LIVE Update
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.