Imran Khan : काय वाढून ठेवलंय इम्रान खान यांच्या पुढ्यात, कसली आहे चिंता, झुल्फिकार अली भुट्टोसारखे होतील हाल?

Imran Khan : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या पुढे आता मोठे संकट उभे ठाकले आहे. लष्करी कायद्यानुसार, त्यांना काय शिक्षा होऊ शकते...

Imran Khan : काय वाढून ठेवलंय इम्रान खान यांच्या पुढ्यात, कसली आहे चिंता, झुल्फिकार अली भुट्टोसारखे होतील हाल?
Follow us
| Updated on: May 18, 2023 | 10:19 AM

नवी दिल्ली : पाकिस्तान सध्या आर्थिक डबघाईला आला आहे. पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे. त्यातच माजी पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) आणि त्यांच्या पक्ष कार्यकर्त्यांनी सरकारला वेठीस धरण्याचा प्रयत्न सुरु केल्याने अराजकता माजली आहे. शहबाज शरीफ सरकार आणि पाकिस्तानी लष्कर (Army) इम्रान खान यांना धडा शिकविण्याच्या तयारीत आहे. तर इम्रान खान आता माघार घेण्याच्या मानसिकतेत नाही. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी लष्कर आणि सरकारविरोधात बंडाचा झेंडा फडकावत ठेवला आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, लष्कर प्रमुख असीम मुनीर आणि शहबाज सरकार लष्करी कायद्यानुसार (Army Act) कारवाईच्या तयारीत आहे. त्यामुळे इम्रान खान यांच्या पुढ्यात काय वाढून ठेवलंय, या अंदाजाने समर्थक हादरले आहेत.

कशामुळे चिंता इम्रान खान यांना अडचणीत आणण्यासाठी आता त्यांच्यावर लष्करी कायद्यानुसार कारवाईची तयारी सुरु आहे. इम्रान खान यांच्यावर लष्करी न्यायालयात खटला चालविण्यात येणार आहे. कडक शिक्षा होईपर्यंत ही सुनावणी सुरु राहिल. इम्रान खान यांचे समर्थक, चाहते, त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते यांना पूर्व प्रधानमंत्री झुल्फिकार अली भुट्टो यांच्या सारखेच इम्रान खान यांचे हाल होण्याची भीती सतावत आहे.

सरकारचा रोष पाकिस्तानी मीडियानुसर, इम्रान खान यांच्या अटकेनंतर देशभरात असंतोषाचे आणि अराजकतेचे वातावरण आहे. त्यामुळे लष्कर आणि सरकाराचा त्यांच्यावर मोठा रोष आहे. लष्कर प्रमुख असीम मुनीर यांनी यांनी पीटीआय समर्थकांची ही हुल्लडबाजी सहन करणार नसल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनी त्यासाठी बळाचा वापर करण्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे इम्रान खान यांच्या जीवाला बरेवाईट होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हे सुद्धा वाचा

काय आहे लष्करी कायदा पाकिस्तानी मीडियानुसार, इमरान खान यांच्यावर लष्करी कायदाचे कलम 59 आणि 60 अंतर्गत कारवाई होऊ शकते. यामध्ये कलम 59 नुसार मृत्यूदंडाची शिक्षा आहे. तर इम्रान खान यांच्याविरोधात पुराव्या जमा करुन त्यांना एकतर आजीवन तुरुंगावासात टाकण्यात येईल अथवा थेट फासावर लटकविण्यात येईल, अशी भीती समर्थकांना वाटत आहे. पाकिस्तानच्या सिमरी कोर्टात इम्रान खान यांच्याविरोधात सुनावणी होईल.

झुल्फिकार अली भुट्टो यांच्याविरोधात काय झाले पाकिस्तानचा इतिहास हा रक्तरंजित आहे. येथील राज्यकर्त्यांना एकतर देश सोडून जावा लागला अथवा त्यांना जीव गमवावा लागला. पाकिस्तानमध्ये नामधारी सरकार आहे, सर्व सत्ता लष्कराच्या हाती असते. झुल्फिकार अली भुट्टो, लियाकत अली खान आणि बेनजीर भुट्टो यांना संपविण्यात आले तर परवेज मुशर्रफ आणि नवाज शरिफ यांना पाकिस्तानातून जीव मुठ्ठीत घेऊन पळून जावं लागलं. झुल्फिकार अली भुट्टो यांना 4 एप्रिल 1979 रोजी फाशीवर लटकविण्यात आले होते.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.