Pakistan Political Crisis : इम्रान खान यांच्या अटकेची शक्यता ! पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या अटकेचे आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले (Pakistan Supreme Court) आहेत. ARY न्यूजने दिलेल्या माहितीनुसार रात्री 12 पर्यंत अविश्वास प्रस्तावावर मतदान झालं नाही तर पंतप्रधान इम्रान खान, स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर यांना अटक केली जाऊ शकते.
नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये पुन्हा एकदा मोठी अराजकता माजण्याची शक्यता आहे. कारण, पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या अटकेचे आदेश पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाने दिले (Pakistan Supreme Court) आहेत. ARY न्यूजने दिलेल्या माहितीनुसार रात्री 12 पर्यंत अविश्वास प्रस्तावावर मतदान झालं नाही तर पंतप्रधान इम्रान खान, स्पीकर आणि डेप्युटी स्पीकर यांना अटक केली जाऊ शकते. तत्पूर्वी पाकिस्तान सर्वोच्च न्यायालयाच्या चीफ जस्टीस यांनी रात्री 12 पर्यंत न्यायालय सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पाकिस्तानच्या राजकारणात सातत्याने नव्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. इम्रान खान आणि स्पीकर (Pakistan Assembly Speaker) यांच्यात चर्चा सुरु आहे. तिकडे इम्रान खान संसद भवनात पोहोचले आणि त्यांच्या कार्यालयाची सुरक्षा वाढवण्यात आलीय. तर सर्वोच्च न्यायालयाच्या चीफ जस्टिस यांनी अधिकाऱ्यांना रात्री 12 पर्यंत कोर्ट सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
तर पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्वाचा निर्णय घेण्यात आलाय. या बैठकीत धमकीवजा पत्र देण्याबाबत मंजूरी देण्यात आलीय. हे पत्र नॅशनल असेंब्ली स्पीकर, सीनेट सभापती, चीफ जस्टीस यांना देण्याबाबत मंजूरी देण्यात आलीय.
दुसरीकडे लाहोरमध्ये आता इम्रान खान यांचे समर्थक आणि कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत आहे. लोक इम्रान खान यांच्या समर्थनात नारेबाजी करताना दिसत आहेत. तर इम्रान खान हे देखील मी हार मानणार नाही असं म्हणत आहेत. एकीकडे राजकीय पटलावर इम्रान खान बॅकफुटला दिसत असले तरी रस्त्यावर, लोकांमध्ये इम्रान खान यांना मोठं समर्थन मिळताना पाहायला मिळत आहे.
इम्रान खान यांना अटक करा- मरियम शरीफ
तत्पूर्वी मरियम नवाझ शरीफ यांनी इम्रान खान यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवलाय. ‘भीतीमुळे मानसिकदृष्ट्या आजारी व्यक्तीच्या हातात माचिस असते. त्यामुळे त्याला सगळीकडे आग लावायची असते. अशावेळी तो अधिक नुकसान करण्यापूर्वी त्याला अटक करणे आवश्यक आहे. 22 कोटींची संपत्ती अशा व्यक्तीला देता येत नाही.
देशाला वाचवायचं असेल तर देशासोबत शत्रुत्व आणि देशाचं, संविधानाचं नुकसान केल्याच्या आरोपाखाली सभापती, उपसभापती आणि पंतप्रधान इम्रान खान यांना अटक करायला हवी, असंही मरियम यांनी म्हटलंय. ही संपूर्ण देशाची मागणी असायला हवी. उठा आणि पाकिस्तानला कर्जदाराच्या अवैध धंद्यापासून मुक्त करा. देशासाठी आवाज उठवा, असं आवाहनही त्यांनी पाकिस्तानातील जनतेला केलं.