संयुक्त राष्ट्र संघटनेत भारताची पुन्हा चीनला धोबीपछाड, महिलांविषयक आयोगाचे सदस्यपद

संयुक्त राष्ट्र संघटनेत महिलांच्या स्थितीवर काम करणाऱ्या आयोगाचा सदस्य म्हणून भारताची सोमवारी निवड झाली.

संयुक्त राष्ट्र संघटनेत भारताची पुन्हा चीनला धोबीपछाड, महिलांविषयक आयोगाचे सदस्यपद
फोटो : टीएस तिरुमूर्ती (एएनआय)
Follow us
| Updated on: Sep 15, 2020 | 8:36 AM

वॉशिंग्टन : संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेशी (Economic and Social Council – ECOSOC) निगडीत आयोगावर भारताने चीनला धोबीपछाड दिली. महिलांच्या स्थितीवर काम करणाऱ्या आयोगाचा सदस्य म्हणून भारताची सोमवारी निवड झाली. संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी प्रतिनिधी टीएस तिरुमूर्ती यांनी माहिती दिली. (India beats China to become member of UN’s Economic and Social Council body)

“भारताने प्रतिष्ठित ECOSOC मध्ये जागा मिळवली आहे. महिलांच्या स्थितीवर काम करणाऱ्या (Commission on Status of Women – CSW) आयोगाचा सदस्य म्हणून भारताची निवड झाली आहे. ही बाब लैंगिक समानता तसेच महिला सक्षमीकरणासाठी असलेली आमची वचनबद्धता आणि कार्यतत्परता दर्शवणारी आहे. याबद्दल आम्ही सर्व सदस्यांचे आभार मानतो” असे ट्वीट टीएस तिरुमूर्ती यांनी केले.

(India beats China to become member of UN’s Economic and Social Council body)

भारत, अफगाणिस्तान आणि चीन यांनी ही निवडणूक लढवली होती. भारत आणि अफगाणिस्तानने 54 सदस्यांपैकी बहुतांश मते जिंकली, तर चीनला निम्म्या मतांचा टप्पाही ओलांडता आला नाही. पुढील चार वर्षे (2021 ते 2025) भारत या आयोगाचा सदस्य राहणार आहे.

विशेष म्हणजे, यावर्षीच चीन प्रसिद्ध “महिलांविषयक बीजिंग जागतिक परिषदे”चा (Beijing World Conference on Women) 25 वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या पार्श्वभूमीवर चीनसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.

याआधी, भारताला जून महिन्यातच संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे (UNSC) अस्थायी सदस्यत्व बहाल करण्यात आले. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदस्य देशांनी भारताला बहुमताने मंजुरी दिल्याने आशिया कालखंडातून भारत बिनविरोध निवडून आला होता. 2021-22 या कालावधीसाठी अस्थायी सदस्य म्हणून भारताची निवड झाली आहे.

संबंधित बातम्या :

UNSC | भारत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य, 184 देशांचा पाठिंबा, पाकिस्तानचा तीळपापड

(India beats China to become member of UN’s Economic and Social Council body)

गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्...
गेट वेहून एलिफंटाला जाणारी बोट उलटली, बोटीत 35हून अधिक प्रवासी अन्....
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर
दादांच्या राष्ट्रवादीला कोणती खाती? खात्यांच्या नावाची यादीच आली समोर.
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा
दादांचे दोन नेते भिडले, उन्मतपणा खपवून घेणार.., मिटकरींचा कोणाला इशारा.
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्
'आजकाल आंबेडकरांचं नाव घेणं म्हणजे...', अमित शाहांचं एक वक्तव्य अन्.
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त
मैं पुराना सिक्का, मुझे फेंक न देना... भुजबळांची शायरीतून खदखद व्यक्त.
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य
'शरद पवार शांत, याचा अर्थ वादळ निर्माण...', शिवसेना नेत्याचं वक्तव्य.
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?
“याला भेट, त्याला भेट अन् दुसऱ्या दिवशी घरी थेट”,शिंदेंचा कोणाला टोला?.
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा
लोकसभा-राज्यसभेत अमित शाह माफी मांगो अन् जयभीमच्या विरोधकांच्या घोषणा.
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार
दादा नाराज भुजबळांनी मनधरणी करणार? अजितदादांसह 'हे' दोन नेते भेट घेणार.
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'
'दादांची तब्येत बिघडते, अधून-मधून आवाज जातो मी त्यांना गोळी...'.