India-Canda Row : मोठी अपडेट, भारत-कॅनडात पुन्हा तणाव; दहशतवादी निज्जरच्या हत्येप्रकरणात तिघांना अटक, पोलिसांनी काय केला दावा

India-Canda Row : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर याच्या हत्येवरुन कॅनडाने जागतिक मंचावर मोठा आकांडतांडव केला. भारत सरकारने ही हत्या घडवल्याचा ठपका ठेवला. निज्जर प्रकरणात तीन भारतीयांना कॅनडात अटक करण्यात आली आहे. त्यावरुन पुन्हा दोन्ही देशात वाट पेटण्याची शक्यता आहे.

India-Canda Row : मोठी अपडेट, भारत-कॅनडात पुन्हा तणाव; दहशतवादी निज्जरच्या हत्येप्रकरणात तिघांना अटक, पोलिसांनी काय केला दावा
भारत-कॅनडा तणाव वाढणार
Follow us
| Updated on: May 04, 2024 | 10:59 AM

पाकिस्तानच्या चिथावणीवरुन भारताविरोधात कारवाया करणाऱ्या खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर (Hardeep Singh Nijjar) याची गेल्यावर्षी हत्या झाली होती. 18 जून 2023 रोजी तो मारल्या गेला होता. त्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रूडो यांनी भारतावर आगपाखड केली. भारत सरकारच्याच इशाऱ्यावरुन निज्जरची हत्या झाल्याचा आरोप त्यांनी केला होता. या हत्येप्रकरणात तीन भारतीयांना कॅनडा पोलिसांनी अटक केली आहे. अटक झाल्यानंतर कॅनडा पोलिसांनी केलेल्या दाव्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

तिघांवर हत्येचा ठपका

कॅनडा पोलिसांनी निज्जरच्या हत्येप्रकरणात तीन भारतीयांना शुक्रवारी अटक केली. या तिघांनी भारत सरकारच्या इशाऱ्यावरुन कॅनेडीयन नागरीक आणि खालिस्तान चळवळीचा समर्थक हरदीप सिंग निज्जर याची हत्या केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे. या तिघांवर निज्जरच्या खूनाची कलमं लावण्यात आल्याचे वृत्त स्थानिक CTV न्यूजने वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीवरुन दिले आहे.

हे सुद्धा वाचा

कोण आहेत ही भारतीय

कमलप्रीत सिंग, करणप्रीत सिंग आणि करण ब्रार अशी या तिघांची नावे आहेत. न्यायालयात याप्रकरणी पोलिसांनी कागदपत्रे सादर केली आहेत. या तिघांना Alberta आणि Ontario या दोन प्रांतातून अटक करण्यात आली आहे. हे तिघही भारतीय तात्पुरत्या व्हिसावर 2021 मध्ये कॅनडात दाखल झाले होते. हा स्टूडंट व्हिसा असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या तिघांनी कॅनडात कधी शिक्षण गिरवले नाही. त्यांचा येथे स्थायिक होण्याचा उद्देश समोर आला नाही. पंजाब आणि हरियाणामधील गुन्हेगारी टोळ्याशी त्यांचा संबंध असल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे. लॉरेन्स बिश्नोईशी संबंधित गुन्हेगारांशी या तिघांचा संबंध असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. भारत सरकारच्या गुप्तचर संस्थांच्या निर्देशानुसार, त्यांनी निज्जरची हत्या केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे.

कोण होता निज्जर

खलिस्तानी टायगर फोर्स-KTF या दहशतवादी संघटनेचा हरदीप सिंग निज्जर प्रमुख होता. तो मुळचा पंजाबमधील आहे. जालंधरजवळील भारसिंघपूर या गावचा तो रहिवाशी आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) तीन वर्षांपूर्वी त्याच्यावर खलिस्तानी चळवळीला मदत करत असल्याबद्दल आणि फुटीरतावादी कार्यात सहभागाबद्दल त्याच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. त्याने 2021 मध्ये एका हिंदू पुजाऱ्यावर हल्ला केला होता. त्याच्यावर 10 लाख रुपयांचे बक्षिस होते. बंदी घातलेल्या शिख्स फॉर जस्टिस या संघटनेतही तो सक्रिय होता. शिख तरुणांची माथी भडकवण्यासाठी तो काम करत होता. केंद्रीय गृहमंत्रालयाने 2019 मध्ये या संघटनेवर बंदी घातली आहे. कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया भागात राहत असल्याची पुष्टी झाली होती. जूनमध्ये त्याची हत्या करण्यात आली होती.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.