अडीच महिन्यात भारताने चीनला दोनवेळा गुडघ्यावर आणलं, जिनपिंग चिनी सैन्यातल्या कमांडर्सवर नाराज
लडाखमध्ये दोन वेळा चिनी सैन्यांना मागे हटावं लागलं आणि तिकडे जिनपिंग यांच्या तळपायातली आग मस्तकापर्यंत गेली
नवी दिल्ली : प्रत्येक मोहिमेवर चीनची पिछेहाट होते आहे (Xi Zinping Angry On China Army). त्यामुळे शांघायपासून बिजिंगपर्यंत जिनपिंग यांच्या कम्युनिस्ट पक्षात सन्नाटा पसरला आहे. जिनपिंग यांच्या चेहऱ्यावरचे भाव तसे चटकन लक्षात येत नाही. मात्र, लडाखमध्ये दोन वेळा चिनी सैन्यांना मागे हटावं लागलं आणि तिकडे जिनपिंग यांच्या तळपायातली आग मस्तकापर्यंत गेली (Xi Zinping Angry On China Army).
लडाखमध्ये मार खाल्ल्यामुळे रागानं लालबुंद झालेले जिनपिंग चिनी सैन्यातल्या कमांडर्सवर नाराज आहेत. जिनपिंग यांच्या कम्युनिस्ट पक्ष सुद्धा चीनच्या सैन्य अधिकाऱ्यांवर प्रश्न उभे करु लागला आहे.
फक्त अडीच महिन्यातच भारतीय सैन्यानं चीनला दोनवेळा गुडघ्यावर आणलं. 15 जूनला जिनपिंग यांचा वाढदिवस होता. नेमक्या त्याचदिवशी अनेक चिनी जवानांना जीव गमवावे लागले. भारतीय जवानांनी प्राणाची बाजी लावून असंख्य चिनी सैनिकांना मारलं. चीनचं सरकार त्या धक्क्यातून सावरतच होतं. तेवढ्यात पँगाँगच्या ब्लॅक टॉपवरुन चिनी सैनिकांना पळ काढावा लागला. हे दोन्ही धक्के जिनपिंग यांच्या जिव्हारी लागले. म्हणूनच या महिन्याच्या सुरुवातीलाच चीननं अरुणाचल आणि कैलास मानसरोवरात दुप्पटीनं सैन्य वाढवलं.
जिनपिंग यांच्या नाराजीनंतर चिनी कमांडर्सनी एलएसीजवळ मिलिट्री डील सुरु केल्या. दिवस-रात्र युद्धाचा सराव सुरु झाला. भारतानं केलेल्या दोन वारांमुळे चीन किती चवळताळून उठला. वेगवेगळ्या भागातून चिनी सैनिकांना अरुणाचल, सिक्कीमच्या बॉर्डरवर आणलं गेलं. 100 हून जास्त गाड्यांमध्ये चिनी सैन्य तातडीनं सीमेवर पाठवलं गेलं. मिलिट्री ड्रिलमध्ये चीनच्या 1 हजारांहून जास्त सैन्याचा समावेश होता. लाईव्ह फायर ड्रिलमध्ये असंख्य रणगाडे, मिसाईल्सचा वापर केला गेला (Xi Zinping Angry On China Army).
खरं तर मागच्या 3 महिन्यांपासून चिनी सैन्य सीमेवर उभं आहे. मात्र भारतीय सैन्यापुढे चीन 2 वेळा तोंडावर पडला. त्यामुळे लडाखनंतर आता पूर्वेकडच्या सीमेवर चिनी सैन्य स्वतःची ताकद आजमावून पाहतो आहे. अरुणाचल प्रदेशच्या 5 लोकांचं चिनी सैन्यानं अपहरण केलं. अपहरणानंतर पुन्हा एकदा चीन अरुणाचल प्रदेशावर स्वतःचा दावा सांगू लागला.
काही दिवसांपूर्वी अरुणाचल प्रदेशच्या सिबनसिरी जिल्ह्यातून 5 लोक बेपत्ता झाले. चिनी सैन्यानंच पाचही लोकांचं अपहरण केल्याचा आरोप आहे. मिळालेल्या माहितीनुसार हे पाचही लोक शिकारीसाठी जंगलात गेले होते. जंगलातूनच चिनी सैन्यानं 5 भारतीयांचं अपहरण केलं. भारताच्या गृहखात्यानं याबाबत चीनकडून उत्तर मागितलं. मात्र चीननं नेहमीप्रमाणे हात वर केले. चीननं फक्त आरोपच फेटाळले नाहीत. तर अरुणाचलवर पुन्हा दावा सांगण्याचा प्रयत्न केला.
रुणाचल प्रदेशला चीननं कधीच मान्यता दिलेली नाही. अरुणाचल तर चीनच्या दक्षिणी तिबेटचाच एक भाग आहे. मात्र, भारत सुद्धा चीनला त्यांच्याच भाषेत उत्तर देतोय ज्या तिबेटसाठी भारत नेहमी मित्रासारखा उभा राहिला. ते तिबेटचे वीर भारतासाठी प्राणाची आहुती देत आहेत.
आजपर्यंत सिक्रेट स्पेशल फोर्सबाबत कधीच फार चर्चा झाली नाही. मात्र, ज्या फोर्सनं चीनला हुसकावून लावलं. त्या फोर्सच्या शहीद जवानाला तिरंग्यात लपेटून निरोप दिला गेला. अंत्यविधीवेळी भारत माता की जयच्या घोषणांबरोबर तिरंगा आणि तिबेटचा झेंडा एकत्रित फडकत होते. चीनला हीच गोष्ट सलत आहे. म्हणूनच चवताळलेला चीननं लडाखनंतर आता अरुणाचल प्रदेशकडे मोर्चा वळवला आहे.
भारतीय सैन्याकडून LAC ओलांडून गोळीबार, चीनचा कांगावाhttps://t.co/xN2qt1Gvzk#IndiaChinaFaceOff #LAC #India #China #Firing
— TV9 Marathi (@TV9Marathi) September 8, 2020
Xi Zinping Angry On China Army
संबंधित बातम्या :
डोनाल्ड ट्रम्प यांना जिनपिंग यांची धमकी, चीनचं अमेरिकेला विध्वंसक युद्धाचं आव्हान?
चिनी विमानाचा सर्वनाश, दक्षिण चीन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांना हायअलर्ट