भारत-चीन तणाव कायम, वाद निवळण्यासाठी 6 नोव्हेंबरला आठवी बैठक
भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेला सीमावाद अद्याप संपलेला नाही. म्हणूनच येत्या 6 नोव्हेंबरला भारत आणि चीनदरम्यान कमांडर पातळीवरची सहावी बैठक होणार आहे.
नवी दिल्ली : भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये सुरु असलेला सीमावाद अद्याप संपलेला नाही. या वादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत सात वेगवेगळ्या पातळ्यांवर बैठका झाल्या आहेत. मात्र, दोन्हा देशांना मान्य होईल असा तोडगा अजूनतरी निघालेला नाही. म्हणूनच येत्या 6 नोव्हेंबरला भारत आणि चीनदरम्यान कमांडर पातळीवरची आठवी बैठक होणार आहे. लखाड परिसरातील चुशूल भागात ही बैठक होईल. (India China Border Issue continue eighth meeting will be on 6 November to resolve the dispute)
मिळालेल्या माहितीनुसार , पूर्व लखाडच्या चुशूल भागात 6 नोव्हेंबरला भारत आणि चीनदरम्यान बैठक होईल. दोन्ही देशांदरम्यान आतापर्यंत सात बैठका झाल्या असून कमांडर पातळीवरची ही आठवी बैठक असेल. या बैठकीत एप्रील-मे महिन्यापासून भारत-चीन सीमेवरुन निर्माण झालेल्या तणावावर चर्चा होईल.
यावेळी प्रामुख्याने भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे संयुक्त सचिव या बैठकीला उपस्थित असतील. तसेच, लेह येथील लेफ्टनंट जनरल मेनन, दोन किंवा तीन ब्रिगेडियर, स्थानिक कमांडर आणि आयटीबीपीचे आयजी यांचीही या बैठकीला उपस्थिती असेल. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत झालेल्या सात बैठकांमध्ये कुठलाही ठोस तोडगा निघालेला नाही. त्यामुळे 6 नोव्हेंबरला होणाऱ्या आठव्या बैठकीकडे संरक्षण तज्ज्ञांचं लक्ष आहे.
Eighth round of corps commander level talks between Armies of India and China to be held on November 6 in Chushul in eastern Ladakh. Both sides would be discussing ways of addressing the ongoing military stand-off in the eastern Ladakh sector since April-May this year.
— ANI (@ANI) November 4, 2020
संंबंधित बातम्या :
लडाख-सियाचीनमध्ये जवानांना थंडीच्या कपड्यांच्या कमतरतेची तक्रार, संसदीय समिती लडाख दौऱ्यावर जाणार
चीनी लष्कराची पुन्हा आगळीक, पूर्व लडाखमधील सीमेवरील सहमतीचे उल्लंघन, भारतीय सैनिकांचे सडेतोड उत्तर
(India China Border Issue continue eighth meeting will be on 6 November to resolve the dispute)