भारत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत चीनलाही मागे टाकण्याची भीती

सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या देशांमध्ये भारताचा 12 वा क्रमांक लागतो. भारतात 5 दिवसांतच रुग्णसंख्या 60 हजारांवरुन 80 हजारांचा टप्पा पार करुन गेली. (India Feared to surpass total number of Corona COVID19 Patients in China)

भारत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत चीनलाही मागे टाकण्याची भीती
Follow us
| Updated on: May 15, 2020 | 8:04 AM

नवी दिल्ली : भारत कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत चीनला मागे टाकण्याची भीती आहे. भारतात आतापर्यंत 82 हजार 85 रुग्णांची नोंद झालेली आहे. आजच्या दिवसात 850 पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास एकूण कोरोना बाधितांचा आकडा आजच (15 मे) चीनमधील एकूण कोरोनाग्रस्तांपेक्षाही अधिक होईल. (India Feared to surpass total number of Corona COVID19 Patients in China)

चीनमध्ये आतापर्यंत 82 हजार 929 रुग्णांची नोंद झाली आहे. तर भारतात आतापर्यंत 82,085 रुग्ण सापडले आहेत. म्हणजेच दोन्ही देशातील रुग्णसंख्येत केवळ 844 चा फरक आहे. भारतात कालच्या दिवसात 3 हजार 995 रुग्णांची भर पडली. हा वेग पाहता आजच्या दिवसातच कोरोनाबाधितांचा आकडा चीनला मागे टाकेल.

सर्वाधिक कोरोना रुग्णसंख्या असलेल्या देशांमध्ये भारताचा 12 वा क्रमांक लागतो. भारतात 5 दिवसांतच रुग्णसंख्या 60 हजारांवरुन 80 हजारांचा टप्पा पार करुन गेली.

भारतात काल 3995 रुग्णांची भर पडली. सलग सहाव्या दिवशी देशात 3500 हून अधिक रुग्ण सापडले आहेत. भारतात काल 99 कोरोना रुग्ण दगावले. देशात कोरोनाचे आतापर्यंत 2646 बळी गेले आहेत. सुदैवाने भारतात 27,686 रुग्ण बरेही झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 36.16% वर जाणे ही दिलासादायक बाब आहे.

जगात काय स्थिती?

– जगात कोरोनाबळींचा आकडा 3 लाखांच्या पार – आतापर्यंत 3 लाख 03 हजार 065 कोरोनाग्रस्त दगावले – कालच्या दिवसात जगात 5 हजार 300 रुग्णांचा मृत्यू – जगभरात काल 95 हजार 31 नव्या रुग्णांची नोंद – एकूण कोरोना रुग्ण 45 लाख 20 हजार 686

अमेरिकेत कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढला

– अमेरिकेत काल 25 हजार 925 नव्या रुग्णांची नोंद – 1698 रुग्णांचे काल बळी, एकूण बळी 86 हजार 895 वर – अमेरिकेत एकूण रुग्ण 14 लाख 56 हजारांच्या पुढे

युरोपात कोरोना काहीसा आटोक्यात

– युरोपात काल 1695 बळी, तर 22 हजार 352 नवे रुग्ण – ब्रिटनमध्ये काल 428, इटलीत 262, तर स्पेनमध्ये 217 जणांचा मृत्यू – फ्रान्समध्ये काल 351, जर्मनीत 67, रशियात 93 कोरोनाबळी – युरोपात एकूण बळी 1 लाख 59 हजार 068 (Corona Patients) – युरोपात एकूण रुग्ण 17 लाख 18 हजार 673

महाराष्ट्रात कोरोनाची स्थिती काय?

– महाराष्ट्रात कोरोनाबळींनी ओलांडला एक हजाराचा टप्पा – राज्यात काल 44 बळी, एकूण बळी 1019 वर – काल 1602 नवे रुग्ण, सलग नवव्या दिवशी हजारहून अधिक रुग्ण – महाराष्ट्रात कोरोनाचे आता 27 हजार 524 रुग्ण – 20 हजार 441 रुग्णांवर उपचार सुरु – राज्यात एकूण कोरोनाबळींपैकी 55% मृत्यू 14 दिवसांत – राज्यात 61% अर्थात 16,738 नवे रुग्ण मे महिन्यात सापडले

(India Feared to surpass total number of Corona COVID19 Patients in China)

देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.