India vs Canada Issue | खलिस्तान्यांची इतकी हिम्मत, भारतीय अधिकाऱ्यांना घेरलं, आणि….

| Updated on: Sep 30, 2023 | 10:28 AM

India vs Canada Issue | खलिस्तान्यांची इतकी मजल गेली. खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येनंतर भारत-कॅनडा वाद टिपेला पोहोचलाय. भारताने कॅनडा विरोधात कठोर आणि आक्रमक भूमिका घेतली आहे.

India vs Canada Issue | खलिस्तान्यांची इतकी हिम्मत, भारतीय अधिकाऱ्यांना घेरलं, आणि....
indian high commissioner stopped by khalsiatni supporters outside gurudwara at scotland
Follow us on

ग्लासगो : खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरची हत्या आणि कॅनडाने भारतावर आरोप केल्यानंतर दिवसेंदिवस हा वाद वाढत चालला आहे. कॅनडानंतर आता ब्रिटनमध्येही खलिस्तान्यांची हिम्मत वाढत असल्याच दिसत आहे. स्कॉटलंडच्या ग्लासगोमध्ये काही खलिस्तान समर्थकांनी भारतीय उच्चायुक्त विक्रम दोरईस्वामी यांना अचानक घेरलं. ते गुरुद्वारा समितीच्या एका बैठकीत सहभागी होण्यासाठी चालले होते. त्यावेळी विक्रम दोरईस्वामी यांना अडवण्यात आलं. भारतीय राजदूत गुरुद्वाराच्या निमंत्रणावरुन ते तिथे गेले होते. या घटनेचा व्हिडिओ समोर आलाय. खलिस्तान समर्थकांनी भारतीय उच्चायुक्तांना त्यांच्या गाडीतून उतरु दिलं नाही. ते, जेव्हा गुरुद्वाराच्या बाहेर पोहोचले, त्यावेळी काही लोकांनी तुमच इथे स्वागत नाहीय, असं त्यांना सांगितलं. खलिस्तान समर्थकांनी भारतीय समुदायाबरोबर असं वागण्याची ब्रिटनमध्ये घडलेली ही पहिली घटना नाहीय.

भारतानंतर सर्वाधिक शिख कॅनडा आणि ब्रिटनमध्ये वास्तव्याला आहेत. ब्रिटनमध्ये सुद्धा खलिस्तान समर्थकांची संख्या मोठी आहे. काही दिवसांपूर्वी लंडनमध्ये खलिस्तान समर्थकांनी भारतीय उच्चायोग इमारतीवर हल्ला केला होता. खलिस्तान्यांनी भारताचा झेंडा उतरवून खलिस्तानचा झेंडा फडकवण्याचा प्रयत्न केला होता. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावर भारत सरकारने कठोर प्रतिक्रिया दिली होती.

भारत-कॅनडा वाद टिपेला

सध्या भारत आणि कॅनडा वाद टिपेला पोहोचला आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी दहशतवादी हरदीप सिंह निज्जरच्या हत्येवरुन भारतावर गंभीर आरोप केले. त्यानंतर भारतानेही जोरदार प्रत्युत्तर दिलं. दोन्ही देशांनी परस्परांच्या डिप्लोमॅट्सवर कारवाई केली. देश सोडून जायला सांगितलं. दोन्ही देशाच्या व्यापारी संबंधांवर सुद्धा परिणाम होण्याची शक्यता आहे. हरदीप सिंह निज्जरच्या हत्येमध्ये भारताचा सहभाग असल्याचा आरोप कॅनडाने केलाय. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्रूडो यांच्याकडे पुरावे मागितले आहेत. परराष्ट्र मंत्री जयशंकर अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री एंटनी ब्लिंकन आणि नॅशनल सिक्योरिटी एडवायजर जॅक सुविलियन यांची भेट घेतली. कॅनडाकडे काही पुरावे असतील, तर ते त्यांनी आम्हाला द्यावेत असं जयशंकर म्हणाले.