शत्रूचं अणूबॉम्ब षडयंत्र हाणून पाडणार, भारताच्या सीमेवर RDE सिस्टीम सुसज्ज होणार
भारतीय सीमांवर रेडीओ एक्टीव पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आरडीई यंत्रणेसाठी पुरवठा, इंस्टॉलेशन आणि मेंटेनन्स या अटींवर गेल्यावर्षी करार केला होता.
नवी दिल्ली | 15 ऑक्टोबर 2023 : भारताने आपल्या सर्व शेजारील देशांच्या सीमांना सुरक्षित करण्याचा निर्णय घेतला आहे. आता भारताच्या सीमांवर रेडीओ एक्टीव एलिमेंट म्हणजेच अणूबॉम्ब निर्मितीसाठी लागणाऱ्या युरेनियम सारख्या किरणोत्सर्गी मुलद्रव्यांची तस्करी करता येणार नाही. भारताने आपल्या देशाला लागून असलेल्या पाकिस्तान, बांग्लादेश, म्यानमार आणि नेपाळसीमांवर आठ जागी लॅंड क्रॉसिंग पॉइंटवर रेडीएशन डीटेक्शन इक्विपमेंट – आरडीई ( RDE ) उपकरण लावण्याचा निर्णय घेतला आहे. हे तंत्रज्ञान अमेरिकन तंत्रज्ञान असून त्यामुळे अणूसामुग्रीची तस्करी लागलीच उघडीस येणार आहे.
भारतीय सीमांवर रेडीओ एक्टीव पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी आरडीई यंत्रणेसाठी पुरवठा, इंस्टॉलेशन आणि मेंटेनन्स या अटींवर गेल्यावर्षी करार केला होता. लवकरच डीलर याचा पुरवठा करणार आहेत. त्यानंतर ही यंत्रणा टप्प्या टप्प्याने बसविण्यात येईल असे म्हटले जात आहे. एक अधिकाऱ्याने सांगितले की रेडीओ एक्टीव्ह साहित्याची तस्करी रोखणे भारतासाठी खूप आव्हानात्मक आहे. कारण त्यापासून परमाणू उपकरण किंवा रेडीओलॉजिकल उपकरण तयार करता येऊ शकते. त्यामुळे देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. ट्रक आणि त्यातील कार्गोची निगराणी करण्यासाठी आरडीईला ड्राईव्ह-थ्रु मॉनिटरिंग स्टेशनमध्ये स्थापित केले जाणार आहे.
असा उपयोग होणार
पाकिस्तान आणि भारताच्या संबंध सध्या बिघडलेले आहेत, त्यामुळे अटारी बॉर्डरवरुन आता होणारी लोकांची त्यांच्या सामानाची ने-आण कमी झाली आहे. हे उपकरण तेथे उपयोगी होईल. आरडीई वेगवेगळ्या गॅमा आणि न्यूट्रॉन विकीरण अलार्म सिस्टम आणि संशयित वस्तूंना व्हिडीओ फ्रेम करण्याच्या तंत्राने सुसज्ज आहे. त्यामुळे युरेनियम सारखे अणुबॉम्बचे घटक पकडता येतील. या यंत्रणेसाठी अमेरिकेसह काही परदेशी संस्थांची मदत घेतली आहे.