दोन वर्षापूर्वी 2 आंबे चोरले, तरुणावर 96 हजारांचा दंड

दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Dubai International Airport) काम करणाऱ्या एका भारतीय व्यक्तीला चोरुन आंबा खाणे (Mango stealing in dubai) चांगलेच महागात पडले आहे.

दोन वर्षापूर्वी 2 आंबे चोरले, तरुणावर 96 हजारांचा दंड
Follow us
| Updated on: Sep 24, 2019 | 8:38 AM

अबुदाबी : आंबा म्हणजे फळांचा राजा. आंबा म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. तो खाण्याची इच्छा होते. मात्र दुबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Dubai International Airport) काम करणाऱ्या एका भारतीय व्यक्तीला चोरुन आंबा खाणे (Mango stealing in dubai) चांगलेच महागात पडले आहे. दुबई कोर्टाने आरोपी व्यक्तीला शिक्षा म्हणून 5000 दिरहम म्हणजे जवळपास 96 हजार रुपयांचा दंड (Mango stealing in dubai) भरण्यास सांगितले आहे.

खलीज टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट 2017 मध्ये दुबई एअरपोर्ट एका 27 वर्षीय तरुणावर आंबे चोरल्याचा आरोप करण्यात आला. एअरपोर्टच्या सुरक्षारक्षकाने सीसीटीव्ही कॅमेऱ्याची रिकॉर्डिंग तपासली. त्यावेळी हा तरुण एका भारतीय व्यक्तीच्या बॅग उघडून त्यातून आंबे चोरत असल्याचे दिसले. त्यानंतर भारतीय व्यक्तीने त्या व्यक्तीविरुद्ध तक्रार (Mango stealing in dubai) दाखल करत त्याला कोर्टाच्या पायऱ्या चढायला लावल्या.

त्यानंतर 2018 मध्ये या व्यक्तीला चौकशीसाठी बोलवले असता, त्याने आपला गुन्हा कबूल केला. आरोपी व्यक्तीने दिलेल्या माहितीनुसार, एअरपोर्टवर काम करत असताना मला फार तहान लागली होती. मी पाण्याच्या शोधात होते. मात्र त्यावेळी तो भारतीय व्यक्ती तिथे आला. त्याच्याकडे आंब्याची पेटी होती. मला तहान लागली असल्याने मी त्याच्या आंब्याच्या पेटीतील 2 आंबे चोरले आणि खाल्ले.

आरोपी व्यक्तीने गुन्हा कबूल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. दोन वर्षापूर्वी झालेल्या या घटनेची नुकतंच कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी कोर्टाने त्याला नुकसान भरपाई म्हणून 5000 दिरहम म्हणजेच 96000 रुपयांचा दंड भरण्यास सांगितले.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.