देशींना विदेशी मद्याची भुरळ, भारतीयांना आता फ्रान्स ऐवजी ब्रिटीश स्कॉच व्हीस्कीचा लागला चस्का
भारतीयांना आता देशी ऐवजी विदेशी मद्याचा चस्का लागला आहे, पूर्वी फ्रान्सची व्हिस्की पसंद केली जायची आता ब्रिटनच्या स्कॉच व्हीस्कीची आयात वाढली आहे.
नवी दिल्ली : ब्रिटीशांना आपल्यावर राज्य केले होते. परंतू आता ब्रिटीश स्कॉच व्हीस्की ( whisky ) आपल्यावर राज्य करीत आहे अशी आकडेवारी समोर आली आहे. आयातीचा ( import ) आकडा हेच सांगत आहे. आयात – निर्यातीची आकडेवारी पाहता भारताने फ्रान्सला मागे टाकत ब्रिटनच्या ( britain ) स्कॉच व्हीस्कीची आयात वाढविली आहे. भारत आता ब्रिटनसाठी स्कॉच व्हीस्कीची सर्वात मोठी बाजारपेठ ठरला आहे. आतापर्यंत भारतात फ्रेंच व्हीस्की जास्त पसंत केली जात होती. परंतू आता फ्रेंच व्हीस्कीची जागा आता ब्रिटीश स्कॉच व्हीस्कीने घेतली आहे.
देशींना आता विदेशी मद्याचा चस्का लागला आहे. देशी इंडीयन आता विदेशी मद्याला अधिक पसंती देऊ लागले आहेत. स्कॉटलंडच्या प्रमुख उद्योग संस्थेच्या 2022 आकडेवारीनूसार ब्रिटनवरून भारतात येणाऱ्या विदेशी स्कॉच व्हीस्कीची आयात आश्चर्यकारक वाढली आहे. ही वाढ साठ टक्के इतकी आहे. स्कॉच व्हिस्की असोसिएशनने( एसडब्ल्यूए ) शुक्रवारी म्हटले आहे की भारताने गेल्या वर्षी स्कॉच व्हिस्कीच्या 700 मिलीलीटरच्या 21.9 कोटी बाटल्याची आयात केली आहे. तर फ्रान्सच्या 20.5 कोटी बाटल्यांची आयात केली आहे. यावरून स्पष्ट होत आहे की भारतीय स्कॉच बाजाराने गेल्या दशकात 200 टक्के जास्त वृद्धी दर्शविली आहे. यामुळे स्कॉच व्हिस्की आयातीत भारताने फ्रान्सला मागे टाकले आहे. असोसिएशनने म्हटले आहे की दोन आकडी वाढ झाली असली तरी स्कॉच व्हीस्कीची संपूर्ण भारतातील व्हीस्कीच्या बाजारातील हिस्सेदारी केवळ दोन टक्के आहे.
युरोपीय देशांतून स्कॉचच्या निर्यातीत खूपच वाढ नोंदवण्यात आली आहे. संपूर्ण जगात 6.2 अब्ज पौंड व्हीस्कीची निर्यात झाली असून हा एक विक्रम आहे. पहिल्यांदाच हा आकडी सहा अब्जापर्यंत पोहचला आहे. यात गेल्यावेळे पेक्षा 37 टक्के वाढ झाली आहे.व्हीस्की ही ब्रिटनच्या सर्वात मोठी आयातपैकी आहे. ब्रिटनमधून सर्वात जास्त अमेरीकेला स्कॉच निर्यात केली गेली आहे. स्कॉटलंडवरून अमेरीकेला 105.3 कोटी डॉलरची व्हीस्की निर्यात केली गेली आहे. तर भारताला 28.2 कोटी पौंड व्हिस्की निर्यात झाली आहे.