Russia-Ukraine War: आम्ही खूप घाबरलोय, आमची परिस्थिती गंभीर, युक्रेनच्या बंकर्समध्ये अडकलेल्या ‘त्या’ विद्यार्थीनीची आर्त हाक

युक्रेनमध्ये वारंवार स्फोटाचे आवाज येत आहेत. त्यामुळे आम्हाला बंकर्समध्ये ठेवण्यात आलं आहे. आमच्यासोबत काही पाकिस्तानी विद्यार्थीही आहेत. दुसऱ्या बंकर्समध्ये भारतीय विद्यार्थ्यांना ठेवण्यात आलं आहे. हे बंकर्स कोंदट आहे.

Russia-Ukraine War: आम्ही खूप घाबरलोय, आमची परिस्थिती गंभीर, युक्रेनच्या बंकर्समध्ये अडकलेल्या 'त्या' विद्यार्थीनीची आर्त हाक
वॉशरुमला जाण्यासाठीही एकएकट्यांनाच सोडलं जातं, युक्रेनच्या कोंदट बंकर्समध्ये अडकलेल्या प्रचितीचा थरारक अनुभव
Follow us
| Updated on: Feb 25, 2022 | 6:43 PM

क्यीव: युक्रेनमध्ये (Russia-Ukraine War) वारंवार स्फोटाचे आवाज येत आहेत. त्यामुळे आम्हाला बंकर्समध्ये ठेवण्यात आलं आहे. आमच्यासोबत काही पाकिस्तानी विद्यार्थीही आहेत. दुसऱ्या बंकर्समध्ये भारतीय विद्यार्थ्यांना ठेवण्यात आलं आहे. हे बंकर्स कोंदट आहे. या ठिकाणी वारंवार स्फोटाचे आवाज येत असल्याने आम्हाला बाहेर जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तसेच वॉशरुमला जायचं असेल तर एकाएकालाच जाण्यास सांगितलं आहे. आमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी इथली परिस्थिती अत्यंत बिकट आहे. कृपया आम्हाला मदत करा. भारताचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमची ही विनंती आहे… हे आवाहन केलं आहे. प्रचिती धांगणे (prachiti dhangane) हिने. प्रचिती युक्रेनमध्ये (Ukraine) शिकत असून तिथे ती अडकली आहे. एका व्हिडीओद्वारे तिने ही विनंती केली आहे.

प्रचिती धांगणे ही मुंबईहून युक्रेनला एमबीबीएससाठी आली होती. 7 फेब्रुवारी रोजीच ती युक्रेनला गेली होती. एमबीबीएसला ती पहिल्या वर्षाला आहे. खारकीव नेशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये ती शिकायला आहे. युक्रेनमध्ये ती हॉस्टेल-5 मध्ये राहते. तिच्यासोबत 300 विद्यार्थी हॉस्टेलमध्ये राहतात.

आमची परिस्थिती समजून घ्या

युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालं आहे. रशियाने युक्रेनवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे प्रचितीसहीत काही विद्यार्थ्यांना बंकर्समध्ये ठेवण्यात आलं आहे. या बंकर्समध्ये आल्यानंतर प्रचितीने एक व्हिडीओ तयार करून भारत आणि महाराष्ट्र सरकारकडे मदतीची हाक दिली आहे. आम्हाला बंकर्समध्ये ठेवलंय. भारतीय आणि पाकिस्तानी विद्यार्थी या बंकर्समध्ये आहेत. यूपीचे विद्यार्थीही आमच्यासोबत आहेत. महाराष्ट्रातील इतर विद्यार्थी दुसऱ्या बंकर्समध्ये आहेत. संध्याकाळी 4 वाजता आम्हाला या बंकर्समध्ये आणलं. आम्हाला खायला दिलंय. आम्ही सुरक्षित आहोत. पण भीतीदायक परिस्थिती आहे. ब्लास्टचे आवाज अधूनमधून ऐकायला येत आहेत. कुठेही जाण्यास आम्हाला मज्जाव करण्यात आला आहे. आम्हाला वॉशरुमलाही एकएकट्या पाठवलं जातंय. परिस्थिती खूपच खराब होत चालली आहे. आमची भारताचे पंतप्रधान आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की, आम्हाला लवकरात लवकर बाहेर काढा. आमची परिस्थिती समजून घ्या, आम्ही खूप घाबरलो आहोत, असं प्रचितीने म्हटलं आहे.

काय आहे बंकर्समध्ये?

एक हॉल टाईप हे बंकर्स आहे. या बंकर्सची हाईट खूप छोटी आहे. बंकर्समध्ये खुर्च्या-टेबलासह अनेक अडगळीतील सामान अस्तव्यस्त पडलं आहे. बंकर्समध्ये लाईट आहे, पण अंधुक प्रकाश आहे. या बंकर्समध्ये या विद्यार्थ्यांना ठेवण्यात आले आहे. काही विद्यार्थी जमिनीवर अंथरुन टाकून झोपले आहेत. तर काही विद्यार्थी भीतीने जागरण करताना दिसत आहेत. एखाद्या खुराड्यात कोंबड्या कोंबाव्यात अशा पद्धतीने या विद्यार्थ्यांना बंकर्समध्ये ठेवलेलं आहे.

संबंधित बातम्या:

Russia Ukraine War Live : यूक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांच्या सूटकेसाठी IMA चं मोदींना पत्र

Russia Ukraine War : रशियाचा शरण येण्याचा इशारा, जीव गमावला पण 13 बॉर्डर गार्डसचं जिव्हारी लागणारं प्रत्युत्तर; स्नेक बेटावर नेमकं काय घडलं?

युक्रेनमध्ये अमरावतीतील आठ विद्यार्थी अडकले; मायदेशी परत आणण्यासाठी संपर्क साधण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.