शेतकरी आंदोलनावर भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोला, भारतीय वंशाच्या अमेरिकी खासदारांचे पोम्पिओंना पत्र

अमेरिकी खासदारांनी पोम्पिओ यांच्याकडे भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशकंर यांच्याशी चर्चा करण्याची मागणी केली आहे. Mike Pompeo farmer protest

शेतकरी आंदोलनावर भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांशी बोला, भारतीय वंशाच्या अमेरिकी खासदारांचे पोम्पिओंना पत्र
भारतीय वंशाच्या खासदारांनी माईक पोम्पिओंना पत्र लिहिलंय.
Follow us
| Updated on: Dec 25, 2020 | 2:42 PM

वॉशिंग्टन: कृषी कायद्यांविरोधात पंजाबच्या शेतकऱ्यांचं आंदोलन दिल्लीच्या सीमांवर सुरु आहे. पंजाबच्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाची दखल कॅनडा, इंग्लंडनंतर अमेरिकेतील लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. अमेरिकेतील भारतीय वंशाच्या खासदारांनी परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ यांना पत्र लिहिले आहे. खासदारांनी पोम्पिओ यांच्याकडे भारताचे परराष्ट्र मंत्री एस.जयशकंर यांच्याशी चर्चा करण्याची मागणी केली आहे. भारतीय वंशाच्या खासदार प्रमिला जयपाल यांच्यासह सात खासदारांनी पोम्पिओ यांना पत्र लिहिले आहे. (Indian origin American Lawmakers wrote to Mike Pompeo about farmer protest in India )

हा अंतर्गत मुद्दा, भारताची ठाम भूमिका

भारत सरकारने या प्रकरणी इतर कोणत्याही देशाचा हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असं ठणकावलं आहे. केंद्र सरकारकडून शेतकरी आंदोलनाबाबत परराष्ट्रातील नेत्यांची वक्तव्ये अफवांवर आधारित आणि चूकीची असल्याचे सांगण्यात आलंय. भारताकडून हा देशांतर्गत विषय असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी यापूर्वीच शेतकरी आंदोलन हा भारतातील देशांतर्गत विषय आहे. असून त्यावर दुसऱ्या देशांतील नेत्यांनी वक्तव्य करणं चुकीचं असल्याचं श्रीवास्तव यांनी स्पष्ट केलं होतं.

अमेरिकेच्या 7 खासदारांनी माईक पोम्पिओ यांना पत्र लिहून शेतकरी आंदोलन हा मुद्दा पंजाबशी संबंधित असल्याचं म्हटलं होतं. पंजाबशी संबंधित मुद्दा अमेरिकेतील शीख समुदायासाठी चिंतेची बाब असल्याच पत्रात म्हटलं आहे. शेतकरी आंदोलनामुळं ‘भारतीय वशांचे लोकांवर परिणाम होत आहे, त्यांचे पंजाबमध्ये नातेवाईक आणि मूळ भूमी आहे. भारतातील त्यांच्या नातेवाईकांच्या खुशालीसाठी ते चिंतित आहेत. या गंभीर परिस्थितीत अमेरिकेच्या परराष्ट्रातील राजकीय अभिव्यक्तीसाठी आपण जबाबदार आहात, असं माईक पोम्पिओंना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे. खासदारांनी पोम्पिओ यांच्याकडे भारताच्या परराष्ट्र मंत्र्यांशी चर्चा करण्याची मागणी केलीय.’

अमेरिका भारताला सल्ला देणार?

भारतीय वंशाच्या अमेरिकी खासदारांना पोम्पिओ यांच्याकडे भारताला सल्ला देण्याची मागणी केली आहे. मात्र, भारत सरकारने यापूर्वीच हा देशांतर्गत प्रश्न असल्याचे स्पष्ट केलेय. त्यामुळे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माईक पोम्पिओ काय भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे.

पत्र लिहिणारे खासदार

प्रमिला जयपाल, डोनाल्ड नोरक्रॉस, ब्रेनडॉन एफ बॉयल, ब्रायन फिट्जपैट्रिक, मेरी गे स्कानलोन, डेबी डिंगेल, डेविन ट्रोन यांनी पोम्पिओंना लिहिलेल्या पत्रावर सह्या केल्या आहेत. भारतातील शेतकरी आंदोलनावर अमेरिकेच्या 12 हून अधिक खासदारांनी चिंता व्यक्त केली आहे.

संबंधित बातम्या:

डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘त्या’ धोरणावर जो बायडन यांचा यूटर्न म्हणाले…

‘केंद्र सरकार अडचणीत येतं, तेव्हाच मोदी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकतात’

(Indian origin American Lawmakers wrote to Mike Pompeo about farmer protest in India )

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.