23 वर्षीय भारतीय वंशाच्या डॉक्टरला ‘मिस इंग्लंड’चा किताब

भारतीय वंशाची 23 वर्षीय डॉक्टर भाषा मुखर्जी हिला 'मिस इंग्लंड'चा किताब मिळाला आहे. 146 इतका भाषाचा असामान्य बुद्ध्यांक आहे

23 वर्षीय भारतीय वंशाच्या डॉक्टरला 'मिस इंग्लंड'चा किताब
Follow us
| Updated on: Aug 03, 2019 | 2:23 PM

लंडन : भारतीय वंशाच्या तरुणीपुढे इंग्लंडमधील ललनाही फिक्या पडल्या आहेत. भारतीय वंशाची 23 वर्षीय डॉक्टर भाषा मुखर्जी (Bhasha Mukherjee) हिने ‘मिस इंग्लंड’चा (Miss England) मुकूट पटकावला.

इंग्लंडमधील डर्बीत राहणाऱ्या भाषा मुखर्जीकडे वैद्यकीय क्षेत्रातील दोन वेगवेगळ्या पदव्या आहेत. भाषा हिचा आयक्यू 146 असल्यामुळे तिची बुद्धिमत्ता अलौकिक मानली जाते. सर्वसामान्यपणे 40 ते 140 हा बुद्धयांक मानला जातो. भाषाचं आपल्या नावाला साजेसं भाषाकौशल्य आहे. तिला एकूण पाच भाषा अवगत आहेत.

मिस इंग्लंड स्पर्धेच्या निकालानंतर अवघ्या काही तासांतच ती बोस्टनमधील रुग्णालयात ज्युनिअर डॉक्टर म्हणून रुजू होणार होती. ‘सौंदर्यस्पर्धा विजेत्या तरुणींची बुद्धिमत्ता कमी असते, असा सर्वसामान्य समज आहे. मात्र आम्ही स्वतःला सिद्ध करणार आहोत’ असं भाषाने मिस इंग्लंड स्पर्धेपूर्वी सांगितलं होतं.

भाषाचा जन्म भारतातच झाला होता. ती नऊ वर्षांची असताना मुखर्जी कुटुंब यूकेला स्थायिक झालं. युनिवर्सिटी ऑफ नॉटिंगहममधून भाषाने वैद्यकशास्त्र (medical sciences) तसेच औषध आणि शस्त्रक्रिया (medicine and surgery) अशा दोन विषयात बॅचलर्स डिग्री संपादन केली आहे.

‘वैद्यकीय शिक्षण सुरु असतानाच मी सौंदर्यस्पर्धेच्या तयारीला सुरुवात केली. मला मानसिक तयारीसाठी अधिक वेळ गेला. अखेर मी शिक्षण सांभाळत स्पर्धेत भाग घेण्याचा निश्चय केला.’ असं भाषा सांगते.

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.