Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian youth beheaded : भारतीय तरुणाचे शिर होणार कलम, खुनाच्या प्रकरणात सौदी अरेबियाच्या जेलमध्ये कैद, सोडवण्यासाठी 2 कोटी रुपयांची करण्यात येतेय मागणी

बलविंदरला वाचण्यासाठी दोन पर्याय दिलेत. त्यात एक आहे दोन कोटी देण्याचा आणि दुसरा आहे धर्म बदलण्याचा. बलविंदरने धर्म बदलला तर दोन कोटींशिवाय त्याची सुटका होणे शक्य आहे. पण बलविंदर धर्मांतरास तयार नसल्याची माहिती आहे.

Indian youth beheaded : भारतीय तरुणाचे शिर होणार कलम, खुनाच्या प्रकरणात सौदी अरेबियाच्या जेलमध्ये कैद, सोडवण्यासाठी 2 कोटी रुपयांची करण्यात येतेय मागणी
जेलImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 09, 2022 | 7:42 PM

चंदीगढ : 2 कोटी रुपयांची रक्कम दिली नाही तर 4 दिवसांत एका भारतीय तरुणाचे (Indian Youth) शिर कलम करण्यात येणार आहे. पंजाबच्या या तरुणाच्या सुटकेसाठी आता प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. पंजाबच्या मुक्तसर परिसरातील मल्लन या गावातील रहिवासी असलेला तुम बलविंदर हा सध्या सौदी अरेबियात (Saudi Arabia) जेलमध्ये बंद आहे. त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला सोडविण्यासाठी त्याच्या कुटुंबियांकडे बदल्याची रक्कम म्हणून दोन कोटी रुपये मागणी (Demand for Rs 2 crore) करण्यात आली आहे. सोमवारी बलविंदरच्या कुटुंबीयांनी चंदीगडमध्ये पंजाबी समाजाकडे याबाबत मदतीची याचना केली आहे.

सव्वा कोटींची रक्कम जमा, जमवाजमव सुरु

बलविंदरला सोडवण्यासाठी आत्तापर्यंत सव्वा कोटींची रक्कम जमा केल्याची माहिती त्याच्या कुटुंबीयांनी दिली आहे. बलविंदरचा भाऊ जोगिंदर यांनी सांगितले की बलविंदर 2008 साली सौदी अरबला गेला होता. तिथे तो एका कंपनीत नोकरीला लागला. नोकरी करताना त्या कंपनीच्या मालकांचा विश्वास त्याने संपादन केला. त्यांची कार चालवण्याचे काम नंतर त्याला देण्यात आले. बलविंदरला कोणतेही व्यसन नसल्याचेही त्याच्या भावाने सांगितले आहे.

मद्यपी कर्मचाऱ्याचा झटापटीत झाला मृत्यू

2013 साली एके दिवशी अचनाक एका निग्रो व्यक्तीने दारु पिवून कंपनीत गोंधळ घालण्यास सुरुवात केली. तोपर्यंत बलविंदर कंपनीत सुपरवायझर झाला होता. मालकांनी त्याला तातडीने कंपनीत जाण्यास सांगितले. त्याने कंपनीत जेव्हा या मद्यधुंद माणसाला थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तो चाकू घेऊन बलविंदरच्या मागे लागला. बलविंदरने त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ही निग्रो व्यक्ती जमिनीवर पडली. त्यात त्याचा मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

कंपनीनेही हात केले वर

त्यानंतर सौदीतील पोलीस घटनास्थळी आले. बलविंदरला त्यांची भाषा येत नव्हती, आणि त्याची भाषा पोलिसांना कळत नव्हती. त्याने समजावण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला अटक करुन जेलमध्ये बंद केले. त्याला सात वर्षांची शिक्षा झाली. आता 9 वर्षे उलटली तरीही त्याची सुटका झालेली नाही. कंपनीनेही त्याची काहीही मदत केली नाही. याबाबत दुबईतील एका भारतीय हॉटेल व्यावसायिकांशी त्याच्या नातेवाईकांनी स्पर्क साधला आहे, तेही यात मदतीस तयार आहेत. याबाबत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची भेट घेण्याच्या प्रयत्नात नातेवाईक आहेत, मात्र अद्याप भेट होवू शकलेली नाही.

धर्म बदलला तर जीव वाचू शकतो, मात्र बलविंदरचा इन्कार

बलविंदरला वाचण्यासाठी दोन पर्याय दिलेत. त्यात एक आहे दोन कोटी देण्याचा आणि दुसरा आहे धर्म बदलण्याचा. बलविंदरने धर्म बदलला तर दोन कोटींशिवाय त्याची सुटका होणे शक्य आहे. पण बलविंदर धर्मांतरास तयार नसल्याची माहिती आहे.

नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं..
नागपूर हिंसाचाराला कोणत्या घटना जबाबदार? फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं...
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?
होय... जयंत पाटील यांच्यासोबत चर्चा झाली, अजित पवार भडकले?.
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे....
काका-पुतण्या एकत्र... सुप्रिया सुळे स्पष्टच म्हणाल्या, पडद्यामागे.....
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?
दादा-जयंत पाटलांमध्ये बंद दाराआड बैठक, अर्धा तास काय दोघांमध्ये चर्चा?.
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच
मद्यपींकडून स्वच्छता कर्मचाऱ्यावर हल्ला, हॅप्पी होली म्हणत थेट पेटवलंच.
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा
BMC क्षेत्रातील होर्डिंग्स संदर्भात मंत्री उदय सामंतांची मोठी घोषणा.
...तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहे का?, कडूंची सरकारला औरंगजेबाची उपमा?
...तुम्ही औरंगजेबापेक्षा कमी आहे का?, कडूंची सरकारला औरंगजेबाची उपमा?.
कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्..
कबरीचा वाद सुरूच... NIA चं पथक संभाजीनगरात, 'पुरातत्व'चं संरक्षण अन्...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर...
56 वरून वाद पेटला, चित्रा वाघांचा थेट इशारा; पुन्हा नादाला लागाल तर....
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर...
रेल्वेच्या तिन्ही मार्गावर उद्या ब्लॉक, 'या' वेळात प्रवास कराल तर....