Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एका प्रवाशासाठी भारतीय विमानाचं थेट पाकिस्तानात लँडिंग; पायलटने निर्णय घेतला, पण…

इंडिगो एअरलाईन्सच्या 6E 1412 विमानातील प्रवाशाची प्रकृती बिघडल्यामुळे विमानचालकाला आपले विमान चक्क पाकिस्तानमध्ये उतरवावे लागले. (indigo airplane emergency landing pakistan)

एका प्रवाशासाठी भारतीय विमानाचं थेट पाकिस्तानात लँडिंग; पायलटने निर्णय घेतला, पण...
लस घेतलेल्या प्रवाशांना ही विमान कंपनी देतेय 10% विशेष सवलत
Follow us
| Updated on: Mar 02, 2021 | 12:46 PM

कराची : विनाम प्रवास करताना अपघात किंवा इतर आकस्मिक घटना अनेकदा घडल्या आहेत. या घटना घडू नयेत म्हणून अनेकदा विमानांची इमर्जन्सी लँडिंग करावी लागते. तसाच एक प्रकार भारतीय विमानासोबत झाला आहे. इंडिगो एअरलाईन्सच्या 6E 1412 विमानातील प्रवाशाची प्रकृती बिघडल्यामुळे विमानचालकाला आपले विमान चक्क पाकिस्तानमध्ये (Pakistan) उतरवावे लागले. भारतीय विमानाच्या पायलटने पाकिस्तानी एयर ट्रॅफिक कंट्रोलरशी बातचित करुन हे विमान पाकिस्तानमधील करीची विमानतळावर उतरवले. मात्र, दुर्देवाने प्रवाशाचा जीव वाचू शकला नाही. पाकिस्तानात उतरलेले विमान इन्डिगो एअरलाईनचे (Indigo Airlines) होते. (Indigo airplane makes emergency landing in Pakistan Karachi to save the passenger but he not survived)

प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी पाकिस्तानमध्ये लँडिंग

भारत आणि पाकिस्तानचे ताणलेले संबंध सर्वांनाच माहिती आहेत. मात्र, 6E 1412 हे विमान संयुक्त अरब अमीरातीतील शारजाह (Sharjah) येथे जात असताना एका प्रवाशाची प्रकृती अचाकन बिघडली. हा प्रकार पायलटला समजल्यामुळे त्याने विमानाला उतरवण्याचा निर्णय घेतला. पण भारताच्या भूमिपासून कित्येक किलोमिटर लांब आल्यामुळे नेमकं कुठं उतरावं हे त्याला समजत नव्हते. शेवटी पायलटने निर्णय घेत पाकिस्तानमधील कराची विमानतळावर विमान उतरवण्याचे ठरवले.

विमान उतरवण्यासाठी विशेष परवानगी

विनातील प्रवाशाची प्रकृती बिघडल्यामुळे विमानचालकाने विमान पाकिस्तानमध्ये उतरवण्याचा निर्णय घेतला. मात्र, कोणत्याही देशात विमान उतरवायचे असेल, तर त्यासाठी पूर्वपरवानगी लागते. त्यामुळे विमानातील पायलटने एअर ट्रॅफिक कंन्ट्रोलशी (ATC) चर्चा करुन विमानाची इमर्जन्सी लँडिंग करण्यासाठी परवानगी मागितली. एटीसीने परवानगी देताच भारतीय पायलटने पाकिस्तानमधील कराची येथील जिन्ना आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय विमान उतरवले.

पण जीव वाचू शकला नाही

विमानातील प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी पायलटने विमान थेट पाकिस्तानमध्ये उतवरण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याआधीच तो प्रवाशी मृत्यू पावला होता. ज्याला वाचवण्यासाठी एवढा खटाटोप केला, तोच या जगात नसल्यामुळे शेवटी सर्वांची निराशा झाली. पाकिस्तानच्या स्थानिक वेळेनुसार इंगिडो कंपनीचे हे विमान पाकिस्तानमध्ये पहाटे 5 वाजता उतरले होते. पण विमानातील प्रवासी वाचू न शकल्यामुळे सर्वांची निराशा झाली. त्यानंतर सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करुन 6E 1412 या विमानाने सकाळी 8.46 वाजता पाकिस्तानमधून पुन्हा उड्डाण केले.

इतर बातम्या :

ग्लोबल वॉर्मिंगमुळे नवं संकट; लॉस एंजालिस शहरापेक्षाही मोठ्या आकाराचा हिमनग झाला वेगळा

अंगावर काटा आणणारा पुतिन यांचा ‘तो’ तुरुंग, येथे येण्या ऐवजी कैदी रक्ताची नस कापू घेतात

अल-कायदासोबत मिळून ‘मोठी कारवाई’ करण्याचा तुर्की दहशतवाद्यांचा डाव, भारत-नेपाळ सीमेवर ‘जिहादी नेटवर्क’साठी प्रयत्न

(Indigo airplane makes emergency landing in Pakistan Karachi to save the passenger but he not survived)

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.