नवी दिल्ली : पाकिस्तानात महागाईनं उच्चांक गाठला आहे आणि जनता हैराण आहे. पाकिस्तानात जिवंत कोंबडी, चिकन आणि मटणाचे भाव अचानकपणे वाढले आहेत. इतकच नाही तर अंडी आणि अद्रकच्या भावातही अचानकपणे मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात पाकिस्तानी जनता आता राग व्यक्त करु लागली आहे. पाकिस्तानच्या रावपिंडीत अंड्याचे भाव प्रति डझन 350 रुपयांवर पोहोचले आहेत. तर एक किलो अद्रक तब्बल 1 हजार रुपयांना मिळत आहे.(Inflation peaks in Pakistan, eggs, chicken, meat, vegetables go up)
पाकिस्तान गेल्या काही दिवसांत पिठाच्या समस्येला सामोरा जात आहे. अशावेळी आता किचनमधी अन्य पदार्थांचेही भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. पाकिस्तानच्या ARY या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार जिवंत कोंडबीची किंमत 370 रुपये प्रति किलो, तर मटणाची किंमत 500 रुपये प्रती किलोवर जाऊन पोहोचली आहे. लाहोरमध्ये चिकनचा भाव 370 रुपये प्रति किलो झाला आहे. वाढत्या महागाईमुळे पाकिस्तानातील जनता मोठ्या संकटात सापडली आहे.
कराचीतील विक्रेत्याच्या हवाल्यानं माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार कच्चा माल आणि चाऱ्याच्या भावात अचानक वाढ झाल्यामुळे महागाई वाढल्याचा दावा केला जात आहे. कच्चा माल आणि चाऱ्याचे भाव वाढल्यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांना मोठा खर्च करावा लागत आहे. त्यामुळेच सध्या कोंबडी, चिकन आणि अंड्यांचे भाव वाढले आहेत. येत्या काही दिवसांत मटणाचे भाव कमी होतील असा दावा विक्रेता संघाकडून केला जात आहे. तर अनेक पोल्ट्री व्यावसायिक बाहेरुन माल आयात करण्यावर विचार करत आहेत.
गेल्या काही दिवसांत पाकिस्तानातील पंजाब आणि खैबर फख्तूनख्वा भागातून भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यावर इम्रान खान यांनी महागाई नियंत्रणात आणण्यासाठी बाजार समित्यांचा भंग केला आहे. मटण आणि भाज्यांसह पाकिस्तानी नागरिकांना गॅसच्या कमतरतेलाही सामोरं जावं लागत आहे. 2021च्या सुरुवातीपासूनच पाकिस्तानमध्ये गॅसची कमतरता जाणवते आहे. पाकिस्तानला गॅसचा पुरवठा करणारी कंपनी सुई नॉर्दन 500 मिलियन स्टॅंडर्ड क्यूबिक फुट प्रतिदिन गॅसच्या कमतरतेचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे कंपनीने पाकिस्तानला होणारा गॅसचा पुरवठा रोखला आहे.
संबंधित बातम्या :
उत्तर पाकिस्तानमध्ये रहस्यमय जीवन जगणारी जमात, तब्बल 150 वर्षांपर्यंत जिवंत राहतात
एका व्हीडिओमुळे पाकिस्तान आणि चीनमध्ये वाद, ट्विटवरून धक्कादायक सत्य समोर
पाकिस्तानात हिंदू कुटुंबावर चाकू आणि कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला, 5 जणांचा मृत्यू
Inflation peaks in Pakistan, eggs, chicken, meat, vegetables go up