ऐन रमजानच्या महिन्यात महागाईने पाकिस्तानला रडवले, मटण 1100 रुपये किलो

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट अधिकच तीव्र होत आहे. पाकिस्तान सरकारने महागाई रोखण्यासाठी केलेले प्रयत्नही सपशेल फसले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून जीवनावश्यक वस्तुंसह दैनंदिन खाण्याचे पदार्थही प्रचंड महाग झाले आहेत. विशेष म्हणजे रमजानचा महिना सुरु असतानाही पाकिस्तान सरकार नागरिकांना माफक दरात जीवनावश्यक वस्तू पुरवू शकलेले नाही. त्यामुळे महागाईने तेथील नागरिकांना अक्षरशः रडवले आहे. पाकिस्तानमध्ये मटण […]

ऐन रमजानच्या महिन्यात महागाईने पाकिस्तानला रडवले, मटण 1100 रुपये किलो
Follow us
| Updated on: May 21, 2019 | 8:26 PM

इस्लामाबाद : पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट अधिकच तीव्र होत आहे. पाकिस्तान सरकारने महागाई रोखण्यासाठी केलेले प्रयत्नही सपशेल फसले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून जीवनावश्यक वस्तुंसह दैनंदिन खाण्याचे पदार्थही प्रचंड महाग झाले आहेत. विशेष म्हणजे रमजानचा महिना सुरु असतानाही पाकिस्तान सरकार नागरिकांना माफक दरात जीवनावश्यक वस्तू पुरवू शकलेले नाही. त्यामुळे महागाईने तेथील नागरिकांना अक्षरशः रडवले आहे.

पाकिस्तानमध्ये मटण 1100 रुपये किलो

पाकिस्तानमध्ये दूध 190 रुपये लिटरने विकले जात आहे. सफरचंदाचे दर 400 रुपये किलो, संत्रा 360 रुपये किलो आणि केळी 150 रुपये डझन झाले आहेत. एवढेच नाही तर मटणाच्या किमतीनेही उच्चांक गाठला आहे. पाकिस्तानमध्ये मटण 1100 रुपये किलो झाले आहे. मार्च महिन्यातील तुलनेत मे महिन्यात कांदा 40%, टोमॅटो 19% आणि मुग दाळ 13% जास्त किमतीने विकली जात आहे. गुळ, साखर, मासे, दाळ, मसाले, तुप, तांदुळ, पीठ, तेल, चहा, गहू या सर्वांच्याच किमती 10% वाढली आहे. पाकिस्तानी नागरिक सरकारच्या या अपयशामुळे चांगलेच संतापले आहेत.

सोशल मीडियावर पाकिस्तान सरकारच्या धोरणांवर उघडपणे टीका

पाकिस्तानमधील नागरिकांचा असंतोष सोशल मीडियावरही पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावर सरकारच्या धोरणांवर उघडपणे टीका केली जात आहे. पाकिस्तान सरकारच्या धोरणांमुळे व्यापाऱ्यांच्या बाजारावरील विश्वास उडत आहे, असे मत पाकिस्तानच्या बाजारावर संशोधन करणाऱ्या एका संस्थेने व्यक्त केले आहे. अर्थतज्ज्ञांनुसार, “पाकिस्तानी रुपयाचे मुल्य घसरल्याने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या (IMF) 6 अरब डॉलरच्या पॅकेजवर सहमती व्हावी म्हणूनही प्रयत्न सुरु आहेत. जो काही निर्णय होईल तो लोकांसमोर आणायला हवा. कारण जेव्हापासून या या पॅकेजवर चर्चा सुरु झाली, तेव्हा पाकिस्तानी रुपयाची किंमत घसरत आहे.

एका डॉलरची किंमत 150 पाकिस्तानी रुपयांपर्यंत

पाकिस्तानचा शेअर बाजारही कोसळला आहे. येथील शेअर बाजार मागील 17 वर्षांमधील सर्वात वाईट स्थितीत आहे. व्यापाऱ्यांनी पाकिस्तान सरकारला ‘मार्केट सपोर्ट फंड’ बनवण्याचीही मागणी करण्याची वेळ आली आहे. आशिया खंडाचा विचार केला तर पाकिस्तानचा रुपया सर्वात वाईट स्थितीत आहे. पाकिस्तानी रुपयाचे मुल्य मे महिन्यात 29% कमी झाले आहे. त्यामुळे पाकिस्तानी रुपया सर्वात जास्त अवमुल्यन झालेल्या स्थितीत आहे. डॉलरच्या तुलनेत पाकिस्तानी रुपयाची किंमत जवळजवळ 150 पर्यंत पोहचली आहे. दुसरीकडे भारताचा विचार केला तर भारताचे 70 रुपये एका डॉलरएवढे आहेत.

बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...