Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Information to ISI: पाकिस्तानी स्तंभलेखकाची कबुली; भारत भेटीची प्रत्येक माहिती आयएसआयला देत असे

भारतातील दौरा आटपून मी जेव्हा पाकिस्तानात परतल्यानंतर आयएसआय अधिकाऱ्याने त्यांना जी काही माहिती गोळा केली होती ती आयएसआयचे नवीन प्रमुख जनरल कियानी यांना देण्यास सांगितले असल्याचे सांगितले.

Information to ISI: पाकिस्तानी स्तंभलेखकाची कबुली; भारत भेटीची प्रत्येक माहिती आयएसआयला देत असे
पाकिस्तानी स्तंभलेखकाची आयएसआयला माहिती देत असल्याची कबूलीImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 2:47 PM

नवी दिल्लीः भारतातील महत्वाची माहिती, संरक्षण क्षेत्रातील घडामोडींची माहिती मिळवण्याचा प्रयत्न पाकिस्तानातील नेहमीच करत असते. त्यासाठी ती अनेक मार्गांचा वापर करते, त्यासाठी भारतात घुसखोरीही (Infiltration) केली जाते. पाकिस्तानमधील काही पत्रकारही त्यांना या कामात मदत करत असल्याचे निदर्शनास आले आहे. सुप्रसिद्ध पाकिस्तानी स्तंभलेखक नुसरत मिर्झा (Pakistani columnist Nusrat Mirza) यांनी दिलेल्या एका मुलाखतीमध्ये स्वतःहून त्यांनी कबूल केले आहे. पाकिस्तानी गुप्तचर संस्था इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स (ISI) साठी त्यांना महत्त्वाची माहिती देण्यासाठी ते काँग्रेसच्या काळात अनेकदा भारतात आले होते. त्यांच्या या खुलाशामुळे खळबळ माजली आहे.

तत्कालीन उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या कार्यकाळात त्यांना अनेकवेळा भारतभेटीचे निमंत्रण देण्यात आले होते. पत्रकार आणि राजकीय विश्लेषक शकील चौधरी यांना दिलेल्या मुलाखतीत स्तंभलेखक मिर्झा यांनी याबाबतच्या काही गोष्टी त्यांनी कबूल केल्या आहेत.

काँग्रेसच्या राजवटीत अनेकवेळा भारत भेटीवर

नुसरत मिर्झा ज्यावेळी भारत भेटीवर येत त्या-त्यावेळी त्यांनी आयएसआय अधिकाऱ्यांना भारतातील महत्वाची माहिती देत असल्याचे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले आहे. काँग्रेसच्या राजवटीत अनेकवेळा ते भारत भेटीवर येत असत, त्यावेळी त्यांच्याकडून हा प्रकार घडला असल्याचे त्यांनी सांगितले.

आयएसआय अधिकाऱ्याने माहिती पुरवली

भारताचे उपराष्ट्रपीत हमीद अन्सारी उपराष्ट्रपती असताना नुसरत मिर्झा 2011 मध्ये ते भारत भेटीवर आले होते. यावेळी त्यांनी सांगितले की,मला त्यांच्या कार्यकाळात भारतात बोलावण्यात आले होते. भारतातील दौरा आटपून मी जेव्हा पाकिस्तानात परतल्यानंतर आयएसआय अधिकाऱ्याने त्यांना जी काही माहिती गोळा केली होती ती आयएसआयचे नवीन प्रमुख जनरल कियानी यांना देण्यास सांगितले असल्याचे सांगितले.

हमीद अन्सारींचे निमंत्रण

भारताचे उपराष्ट्रपती मोहम्मह हमीद अन्सारी यांनी नुसरत मिर्झा यांना निमंत्रण दिले असल्याचे सांगितले. काँग्रेसच्या कार्यकाळात आपण पाच वेळा भारतात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावेळी मी दिल्ली, बंगळुरू, चेन्नई, पाटणा आणि कोलकाता या ठिकाणी भेटी दिल्या असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. 2011 मध्ये मी मिल्ली गॅझेटियर वृत्तपत्राचे मालक जफरुल इस्लाम खान यांनाही भेटलो. जफरुल-इस्लाम खान हे दिल्ली अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष आणि भारतीय मुस्लिमांसाठी एक प्रमुख वृत्त स्रोत असलेल्या मिल्ली गॅझेटियरचे संस्थापक-संपादक आहेत.

सात शहरांना भेट देण्यासाठी व्हिसा

नुसरत मिर्झा यांनी मुलाखतीत अनेक धक्कादायक गोष्टी सांगितले की, माझ्या भारत भेटीदरम्यान मला पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून अनेक विशेष सुविधा मिळत होत्या. साधारणपणे भारतातील व्हिसा अर्जदारांना तीन ठिकाणी जाण्याची परवानगी होती. नोव्हेंबर 2002 ते नोव्हेंबर 2007 या काळात परराष्ट्र मंत्री राहिलेल्या खुर्शीद कसुरी यांच्या मदतीने मला सात शहरांना भेट देण्यासाठी व्हिसा मिळाला. त्या आधारेच मला भारताविषयी मिळालेली माहिती मी आयएसआयच्या लोकांना दिली होती असंही त्यांनी सांगितले.

दहशतवादावरील चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी भारतात

भारतात काँग्रेसचे शासन असताना दहशतवादावरील एका चर्चासत्रात सहभागी होण्यासाठी ते भारतात आले होते. ते सांगतात की, भारतातील उर्दू वृत्तपत्रांचे सर्व संपादक त्यांचे मित्र आहेत. नुसरत यांनी सांगितले की, आयएसआयचं विशेष गट भारतीय राजकीय नेत्यांवर लक्ष ठेवून आहेत. ते भारतीय नेत्यांचा कमकुवतपणा जाणून आहेत. मात्र त्यांचा अनुभव कमी असल्याने ते त्याचा आपल्या हितासाठी वापर करु शकत नाहीत असंही ते म्हणतात. त्यांच्या या खुलाशामुळे खळबळ उडाली आहे.

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक
पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ आज डोंबिवली बंदची हाक.
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल
75 पर्यटकांची पहिली तुकडी एकनाथ शिंदेंसह मुंबईत दाखल.
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम
सुरक्षा यंत्रणांना चकवा देण्यासाठी अतिरेक्यांनी वापरले कोड नेम.
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले
टिट फॉर टॅट उत्तर द्यायला हवं; पहलगाम हल्ल्यावर जलील थेट बोलले.
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार
गिरीश महाजन श्रीनगरला रवाना; 4 पार्थिव मुंबईत, 2 पार्थिव पुण्यात येणार.
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते..
सैन्याच्या वेशात आले आतंकवादी; खरे सैन्य आल्यावर जे झालं ते...
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर
निष्पाप भारतीयांचा जीव घेणाऱ्या चार नराधमांचा फोटो आला समोर.
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी
सुरक्षा यंत्रणेकडून नराधम दहशतवाद्यांचे स्केच जारी.
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले
गृहमंत्री अमित शाह बैसरन खोऱ्यात पोहोचले.
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर
पहलगाममधील मृत कौस्तुभ गनबोटेच्या काकींना अश्रु अनावर.