Locking Graves : या देशात मुली मेल्यानंतरही सुरक्षित नाहीत, थडग्यांना लावावे लागत आहे कुलूप
Locking Graves : या देशात महिला आणि मुली मेल्यानंतर ही सुरक्षित नाहीत. त्यामुळे कब्रस्तानातील मुली, महिलांच्या थडग्यांना ताळे लावण्याची वेळ आली आहे.
नवी दिल्ली : जगात कोणत्याही देशात महिला सुरक्षित नाही. पुरुषी मानसिकतेच्या त्या सातत्याने शिकार होतात. उजाडणारा प्रत्येक दिवस या मानसिकतेचे वाईट रुप दाखवतोच. सामाजिक स्तर कोणताही असो अत्याचाराच्या घटना घडतातच. महिलांना जिवंतपणीच अनेक यातना सहन कराव्या लागतात. काही तर सातत्याने अत्याचाराच्या (Torture) बळी ठरतात. काही कंटाळून जीव देतात. तर काहींवर अत्याचार करुन त्यांना संपविण्यात येत. वासनेच्या बळी ठरलेल्या महिलांच्या अत्याचाराच्या कथा आपण रोज ऐकतो, बघतो. पण त्यापेक्षा ही नीच कृत्य या देशात सुरु आहे. या देशात मुली, महिला मेल्यानंतरही सुरक्षित नाहीत. त्यामुळे कब्रस्तानातील मुली (Graveyard), महिलांच्या थडग्यांना ताळे (Locking Graves) लावण्याची वेळ आली आहे.
मानवतेला काळीमा पाकिस्तानमध्ये पुरुषी मानसिकतेवरच प्रश्नचिन्ह लावण्यात आलं आहे. या देशातील काही शैतानांनी कब्रस्तानातील महिला, मुलींच्या शवावर अत्याचार केल्याच्या घटना घडल्या. पण या घटना कमी होण्याऐवजी सारख्या वाढत आहे. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या घटनांमुळे धास्तावलेल्या आई-वडिलांना कब्रस्तानात मुलींच्या थडग्यांना ताळे लावण्याची वेळ आली आहे.
घटनात वाढ पाकिस्तानमध्ये मुली मेल्यानंतर पण सुरक्षित नाहीत. त्यांच्या शवासोबत अत्यंत घाणेरडं कृत्य करण्यात आल्याचं उघड झालं आहे. मृत महिलांचे शव थडग्यातून बाहेर काढून त्यांच्यावर अत्याचार केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने आई-वडिलांनी संताप व्यक्त केला आहे. या प्रकाराविरोधात पाकिस्तानातील बुद्धीजीवींनी आवाज उठवला आहे. कार्यकर्ता आणि लेखक हैरिस सुल्तान यांनी तर त्यांच्या ट्विटर खात्यावरुन फोटो शेअर करत मुली थडग्यातही सुरक्षित नसल्याचा प्रकार समोर आणला. त्यामुळे पाकिस्तानच नाही तर जगभरातून त्यावर संताप व्यक्त करण्यात येत आहे.
Pakistan has created such a horny, sexually frustrated society that people are now putting padlocks on the graves of their daughters to prevent them from getting raped.
When you link the burqa with rape, it follows you to the grave. pic.twitter.com/THrRO1y6ok
— Harris Sultan (@TheHarrisSultan) April 26, 2023
समाजाच्या मानसिकतेवर कडाडून हल्ला पाकिस्तानी समाज वासनेने पछाडलेला आहे. यातील काही जण तर अत्यंत किळसवाण्या मानसकितेचे आहे. त्यामुळेच येथील पालकांवर त्यांच्या मुलीच्या थडग्याला जाळी आणि कुलूप लावण्याची वेळ आल्याचे ट्विट त्यांनी केले. अशा अत्याचाराच्या घटना का वाढत आहे, याची त्यांनी उकल केली. आतापर्यंत समाजात महिला सुरक्षित नव्हत्या. पण आता, कब्रस्तानमध्ये पण त्या सुरक्षित नसल्याचा दावा सुल्तान यांनी केला.
अनेकांनी व्यक्त केला रोष हैरिस सुल्तान हे काही एकटे नाही, पाकिस्तानमधील अनेक युझर्सने पाकिस्तानमधील कब्रस्तानातील या महापापांवर मन मोकळं केलं आहे. येथील पुरुषी मानसिकतेवर सडकून टीका केली आहे. पाकिस्तानमध्ये 2011 साली याप्रकारचा मोठी घटना उजेडात आल्यानंतर समाज हादरला होता. कराची जवळील नजीमाबाद येथील कब्रस्तानची देखभाल करणाऱ्या मोहम्मद रिजवान या तरुणाने तर 48 मृत महिलांसोबत अत्याचाराची कबुली दिली होती. पण त्यानंतर हे प्रकार थांबले नाहीत. गेल्यावर्षी मे 2022 मध्ये पुन्हा अशा घटना समोर आल्या. तर यावर्षी अनेक पालकांवर मुलीच्या मृत्यूनंतर तिच्या थडग्याला जाळी आणि कुलूप लावण्याची वेळ आली आहे. अशा गुन्हेगारांना गोळ्या घालण्याची मागणी ही काही पालकांनी केली आहे.