Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इस्रायलविरुद्ध लढण्यासाठी जमले पण, मुस्लिम देशांची आपापसांतच जुंपली

अनेक देशांनी इस्रायलबाबत वेगळे मत मांडले. त्यामुळे या बैठकीत इस्लामी देशांमध्ये काही मतभेद पाहायला मिळाले. | IOC

इस्रायलविरुद्ध लढण्यासाठी जमले पण, मुस्लिम देशांची आपापसांतच जुंपली
Follow us
| Updated on: May 17, 2021 | 12:22 PM

नवी दिल्ली: सध्या गाझा पट्टीत इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात सुरु असलेल्या संघर्षाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. अत्यंत प्रगत लष्करी तंत्रज्ञान असलेला इस्रायल (Israel) पॅलेस्टाईनवर एकापाठोपाठ एक हल्ले करत आहे. या पार्श्वभूमीवर इस्लामी देशांनी एकत्र येऊन पॅलेस्टाईनविरुद्ध लढण्याची तयारी सुरु केली होती. (IOC meeting on israel palenstine conflict)

त्यासाठी इस्लामी देशांची संघटना असलेल्या IOC ची बैठक बोलावण्यात आली होती. या संघटनेत एकूण 57 इस्लामी देशांचा सहभाग आहे. या बैठकीत इस्रायलवर जोरदार टीका करण्यात आली. मात्र, अनेक देशांनी इस्रायलबाबत वेगळे मत मांडले. त्यामुळे या बैठकीत इस्लामी देशांमध्ये काही मतभेद पाहायला मिळाले.

गेल्यावर्षी संयुक्त अरब अमिराती (UAE), बहारीन, मोरोक्को आणि सुदान या राष्ट्रांनी इस्रायलला असणारा टोकाचा विरोध कमी केला होता. तर जॉर्डननेही इस्रायलसोबत शांती करार केला होता. IOC च्या बैठकीत इतर देशांनी याच गोष्टीवर आक्षेप नोंदवला.

तसेच या बैठकीत पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्राचा दर्जा आणि त्याची राजधानी जेरुसलेमच असावी, अशी मागणी करण्यात आली. संयुक्त अरब अमिरातीने यापूर्वीच इस्रायलकडून पॅलेस्टाईनवर करण्यात येणाऱ्या हल्ल्यांचा निषेध केला होता. जागतिक समुदायाने हा संघर्ष थांबवावा, अशी मागणी युएईचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैजल बिन फरहन अल सउद यांनी केली होती.

पाकिस्तान आणि तुर्की इस्रायलविरोधात आक्रमक

या बैठकीत पाकिस्तान आणि तुर्की हे दोन देश इस्रायलविरोधात प्रचंड आक्रमक होताना दिसले. मलेशिया, इंडोनेशिया आणि ब्रुनेई यांनीही संयुक्त राष्ट्रसंघाला इस्रायल-पॅलेस्टाईन वादात हस्तक्षेप करण्याविषयी सुचविले आहे. या भागात कोणताही संघर्ष होणार नाही, शांती कायम राहील, यासंदर्भात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्त्वाखाली करार झाला होता. या कराराचे पालन केले जावे, अशी मागणी ‘यूएई’कडून करण्यात आली.

संबंधित बातम्या:

भाजपच्या अनेक नेत्यांचा इस्राईलला पाठिंबा, मग नेतन्याहूंकडून आभार मानताना भारताचा उल्लेख का नाही?

PHOTOS : इस्राईल-हमास युद्धाचे अंगावर काटा आणणारे प्रसंग, असा विद्ध्वंस पाहिलाय?

इस्राईलचा गाझावर घातक हल्ला, एअर स्ट्राईकमध्ये 13 मुलांसह 33 जणांचा मृत्यू

(IOC meeting on israel palenstine conflict)

मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले
मारामारी थापड थुपडीची झाली, पण..; धस नेमकं काय म्हणाले.
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली
लाडकी बहीणबंद होणार?सरकारकडे पैसे नाहीत?सत्ताधारी-विरोधकांमध्ये जुंपली.
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण
घरात वडील आजारी अन् काढणीला आलेलं पीक; चिमुकला करतोय शेताची राखण.
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा
देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या? दमानियांचा दावा.
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड
कराडला बीड तुरूंगात मारहाण? नेमकं काय घडलं? अखेर प्रशासनाकडून सत्य उघड.
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला
'मी मंत्री झालो हे पवारांना मान्यच नाही', जयकुमार गोरेंचा खरमरीत टोला.
कराडला मारणारा महादेव गीते कोण?
कराडला मारणारा महादेव गीते कोण?.
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्..
तोच राग मनात म्हणून बेदम मारहाण, 'हे' दोघे कराडच्या अंगावर धावले अन्...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,...
कराड, घुले मारहाण प्रकरणात धसांची मोठी मागणी, म्हणाले त्यांना,....
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी..
कराडला मारहाण? दमानियांची पहिली प्रतिक्रिया; या टोळ्यांमध्ये दुश्मनी...