इस्त्रायलचा पुन्हा मास्टर स्ट्रोक; हिजबुल्लाहला मोठा झटका, नवीन प्रमुख सफिद्दीन पण नाही वाचला, नवीन अपडेट काय?
Hezbollah Hasan Saffiedine : इस्त्रायलने सर्वात अगोदर हमास विरोधात मोर्चा उघडला होता. त्यानंतर लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटना आणि तिला मदत करणाऱ्या इराणविरोधात आता इस्त्रायलने आघाडी उघडली आहे. हिजबुल्लाह संघटनेच्या प्रमुखाला ठार केल्यानंतर आता पुन्हा मोठा झटका दिल्याचे वृत्त आहे.
मध्य-पूर्व देशात युद्धाने तोंड उघडले आहे. गाझा पट्ट्यात हमास या दहशतवादी संघटनेचे कंबरडे मोडल्यानंतर लेबनॉनमधील हिजबुल्लाह संघटनेला इस्त्रायलने टार्गेट केले आहे. तर हिजबुल्लाह या संघटनेला आर्थिक पाठबळ, शस्त्रास्त्र पुरवणाऱ्या इराणविरोधात सुद्धा इस्त्रायलने मोर्चा उघडला आहे. मोसादने हेरगिरीचा अचूक नमुना दाखवला. त्यात हिजबुल्लाह संघटनेचा म्होरक्या हसन नसरल्लाह हा बंकरमध्ये ठार झाला. त्याला बैरुत या गडातच इस्त्रायलने टिपले. हिजबुल्लाहने हाशिम सफिद्दीन ( Hashim Saffiedine) याची प्रमुख पदी नियुक्ती केली. त्याचा पण इस्त्रायलने खात्मा केल्याचे वृत्त समोर येत आहे. हा हिजबुल्लाह संघटनेला मोठा झटका मानण्यात येत आहे.
Israel Media चा दावा काय?
इस्त्रायलमधील मीडियाने हा दावा केला आहे. त्यानुसार, नसरुल्लाहचा उत्तराधिकारी हाशिम सफिद्दीन हा या इस्त्रायलच्या हल्ल्यात ठार झाला आहे. लेबनानी वृत्तांचा आधार घेत इस्त्रायलमधील मीडियाने हा दावा केला आहे. IDF ने बैरुत शहराच्या दहिह या उपनगरावर जोरदार हल्ला केला. त्यात हाशिम सफीद्दीन याला टार्गेट करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. नसरल्लाह याच्यापेक्षा पण यावेळचा हल्ला अधिक तीव्र असल्याचा दावा इस्त्रायलच्या मीडियाने केला आहे. अर्थात इस्त्रायल सरकारने अथवा हिजबुल्लाहाने या वृत्ताला अद्याप दुजोरा दिलेला नाही.
द न्यूयॉर्क टाईम्सने केलेल्या दाव्यानुसार, गुरूवारी मध्यरात्री इस्त्रायलने बेरूत शहरावर भीषण हल्ला चढवला. हवाई हल्ले केले. त्यावेळी नसरुल्लाहचा उत्तराधिकारी सफीद्दीन हा जमिनीखालील बंकरमध्ये हिजबुल्लाहच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठकीत होता. नसरल्लाह ज्या ठिकाणी मारल्या गेला. तेथून हे ठिकाण जास्त दूर नसल्याचा दावा करण्यात येत आहे. इस्त्रायलने नवीन प्रमुखाला ठार करण्यासाठी तीव्र हल्ला चढवला. बॉम्बस्फोट केले. त्यात नवीन प्रमुख सुद्धा मारल्या गेल्याचा दावा करण्यात येत आहे. ताज्या हल्ल्यात काही नागरिक आणि हिजबुल्लाहचे अनेक अधिकारी मारल्याचा दावा करण्यात येत आहे.
सफिद्दीन अमेरिकेच्या पण हिटलिस्टवर
हिजुबल्लाहचा नवीन प्रमुख हाशिम सफिद्दीन हा अमेरिकेच्या पण हिटलिस्टवर होता. 2017 मध्ये त्याने अमेरिकेने दहशतवादी म्हणून जाहीर केले होते. तो गेल्या काही दिवसांपासून हिजबुल्लाहची राजकीय विंग सांभाळत होता. तो या दहशतवादी संघटनेच्या जिहाद परिषदेचा सदस्य पण होता. सफिद्दीन हा नसरल्लाह आणि नईम कासिम यांच्यानंतरचा संघटनेतील तिसरा सर्वात मोठा नेता होता.
इस्त्रायलने हल्ले तीव्र केल्यापासून तो संघटनेचे काम अंडरग्राऊंड राहत, ठिकाणे बदलत करत होता. तो संघटनेचे राजकीय धोरण निश्चित करत होता. राजकीय भूमिका मांडत होता. तो या संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीचा प्रमुख सुद्धा होता. तो जिहाद परिषदेचा अध्यक्ष होता. ही परिषद लष्करी कारवायांची तयारी करत होती.
हाशिम स्वतः ला पैगंबर मोहम्मद यांचा वंशज असल्याचा दावा करत होता. हाशिम नेहमी काळी पगडी बांधत होता. त्याने इराक येथील नजफ आणि इराणमधील कुम येथील धार्मिक मदरशातून शिक्षण घेतले होते. 1994 मध्ये तो लेबनॉनमध्ये परतला. लवकरच त्याने हिजबुल्लाह संघटनेत स्वतःचे नवे स्थानच तयार केले नाही तर झरझर वरिष्ठ पदावर पोहचला. 1995 साली तो या समुहाच्या सर्वोच्च मजलिस अल शुरामध्ये सहभागी झाला.