युनिव्हर्सिटी कँपसमध्ये तरुणीचे कपडे काढून आंदोलन, कारण काय? तरुणीची थेट मनोरुग्ण केंद्रात रवानगी; कुठे घडली घटना ?
फक्त हिजाब नीट घातला नाही म्हणून ज्या देशात जेलमध्ये पाठवले जाते, त्याच इराणमध्ये आहौ दरायीने (अंतर्वस्त्रांवर) केलेलं आंदोलन म्हणजे थेट शासनालाच आव्हान देण्यासारखं आहे.
शरिया कायद्याच्या आधारे चालणारा ईराण, असा देश जिथे धार्मिक मान्यतांचे कट्टरतेने पालन केले जाते. कपड्यांपासून पूजेपर्यंत, इराणमध्ये अनेक कठोर नियम आहेत जे लोकांच्या सार्वजनिक जीवनावर नियंत्रण ठेवतात.ठेवतं सरकार या नियमांवर बारीक नजर ठेवतं आणि त्याचं उल्लंघन केल्यास कठोर शिक्षा दिली जाते. मात्र रविवारी याच कट्टर देशातून एक असा व्हिडीओ समोर आला आहे, जो पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. दोन वर्षांपूर्वी इराणमध्ये झालेल्या हिजाब क्रांतीच्या आठवणी या व्हिडीओमुळे ताज्या झाल्या.
हातात पुस्तकं, डोक्यापासून ते पायाच्या नखांपर्यंत संपूर्णपणे कपड्यात असलेल्या मुली ज्या युनिव्हर्सिटी कँपसमध्ये आहेत, त्याच परिसरात एक मुलगी फक्त तिच्या इनरवेअरमध्ये फिरत होती. पोशाखाची सक्ती केल्याच्या निषेधार्थ मुलीने तिचे कपडे काढले आणि अंतर्वस्त्र घालून फिरत आंदोलन केल्याचा दावा करण्यात आला आहे. आहौ दरायी नावाच्या या मुलीचे सोशल मीडियावर अनेक लोकांना समर्थन केलं. दोन वर्षांपूर्वी पोलिस कोठडीत मरण पावलेल्या महसा अमिनीलाही असाच सपोर्ट मिळाला होता. ‘नीट हिजाब घातला नाही’ म्हणून इराणमधील पोलिसांनी तिला अटक केली होती.
कुठे आहे आहौ दरायी ?
फक्त हिजाब नीट घातला नाही म्हणून ज्या देशात जेलमध्ये पाठवले जाते, त्याच इराणमध्ये आहौ दरायीने (अंतर्वस्त्रांवर) केलेलं आंदोलन म्हणजे थेट शासनालाच आव्हान देण्यासारखं आहे. मात्र या आंदोलनानंतर आहौ दरायी ही कुठे गायब झाली आणि सध्या कुठे आहे, असा प्रश्न सध्या उपस्थित झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिजाब घातला नाही म्हणून युनिव्हर्सिटीच्या सुरक्षा रक्षकांनी तिला हिंसक रित्या रोखले होते, त्यानंतरच तिने निषेधार्थ हे आंदोलन केलं.
महिला मनोरुग्णालयात ?
रिपोर्ट्सनुसार, तेहरानच्या इस्लामिक आझाद विद्यापीठाच्या शाखेत ही घटना घडली. यानंतर एक व्हिडीओ समोर आला ज्यामध्ये आहौ दरायी हिला सुरक्षा रक्षकांनी घेरलं आणि धक्का देऊन कारमध्ये बसवलं. त्या महिलेला प्रथम पोलीस ठाण्यात नेण्यात आले आणि नंतर मनोरुग्णालयात पाठवण्यात आले, असे एबीसी न्यूजने म्हटले आहे. ‘आम्ही या कृत्यामागील ‘खरा हेतू’ शोधण्याचा प्रयत्न करत आहोत,असे विद्यापीठाच्या प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान आंदोलकांना मनोरुग्णालयात पाठवण्याचा इराणचा जुना इतिहास आहे.
ॲम्नेस्टी इंटरनॅशनलचे अपली काय ?
त्या महिलेला तत्काळ सोडून देण्यात यावे असे आव्हान ॲम्नेस्टी इंटरनॅशनलतर्फे करण्यात आले. जोपर्यंत त्या महिलेची ( जेलमधून) सुटका होत नाही तोपर्यंत तेथील अधिकाऱ्यांनी तिच्याशी नीट वागावे, यातना देऊ नयेत. तसेच तिला तिच्या कुटुंबाशी आणि वकिलांशी संपर्क साधू द्यावा, असेही ॲम्नेस्टी इंटरनॅशनलतर्फे लिहीण्यात आलेल्या पोस्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. ‘अधिकारी कसा प्रतिसाद देतात याकडे, तसेच या संपूर्ण घटनेवर आपले बारीक लक्ष असेल’ असे इराणमधील संयुक्त राष्ट्राच्या विशेष दूतांनी नमूद केलंय.
मात्र यासंदर्भात युनिव्हर्सिटीच्या अधिकाऱ्यांनी वेगळीच भूमिका घेतली आहे. अंतर्वस्त्रांवर फिरणाऱ्या त्या महिलेला मानसिक आरोग्याच्या समस्या असल्याचा दावा त्यांनी केला. ती ‘गंभीर मेंटल प्रेशर’ मध्ये होती आणि मानसिक विकाराशी लढा देत होती, पोलिसांच्या अहवालाचा हवाला देत असा दावाही करण्यात आला आहे. याप्रकरणी सोशल मीडियावर वेगवेगळे दावे केले जात आहेत.